आज मी थोडा...!!!
झुगारून तुमच्या कट्टरतेच्या भिंती,
आज मी थोडा माणूसच होतो...
नाही तुमची कोणतीच भीती,
आज मी थोडा लिहूनच घेतो...
पेलून माझ्या न केलेल्या गुन्ह्यांचा भार,
आज मी थोडं विचारांना मांडतो...
फिकीर कधीच संपलीए हो,
आज मी थोडं तुमच्या विचारांशी लढतो...
भोगून सर्व झालेय आता,
आज मी थोडं तुमच्या द्वेषाला रिचवतो...
द्यूत आणि शकूनी तुमचाच असला तरी,
आज मी थोडा विचारच मांडतो...
कट करून गोळीच घालताल ना,
आज मी थोडं उरलेलं आयुष्य तुम्हाला देतो...
पण लक्षात ठेवा माणूस संपेल पण विचार तसाच राहिल,
आज मी पुन्हा तेच थोडं सांगतो...
गणेशदादा शितोळे
(२७ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा