डाग...!!!
काही डाग मुळात,
असतातच असे,
कितीही मिटवले तरीही,
दिसणाराला दिसताच...
किती पुसणार अन किती मिटवणार,
मनावरचे डाग मनाला पक्के दिसतात...
लपवायचे म्हणून जगाला दिसणार नाहीत,
स्वतःच्या मनापासून लपवायला थोडीच येतात...
काही डागांचं हे असंच असतं...
ना पुसतात ना मिटतात...
त्यांचं असणंच एवढं सवयीचं होऊन जातं की,
रोजच्या जगण्याचा भाग बनत जातात...
आपण फक्त आपल्याला सुधारत रहायचं,
बाकी काहीच नसतं आपल्या हातात....
उजाळलेल्या प्रतिमेत दिपून जाईल तोही डाग,
कारण कवडशाने प्रकाशवाटा निर्माण होतात...
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा