दोन घोट रिचवले म्हणून…!!!
दोन घोट रिचवले म्हणून,
दुःख कमी होतं असं असतं का..?
खरंच का दुःख विसरणं,
इतकं सहज आणि सोपं असतं का..?
बैठकीत बसून ग्लास मोकळे झाले की,
खरंच दुःख हलकं होत असतं का..?
स्वतःच स्वतःच्या जीवाला त्रास
केली म्हणजे
दुःखाचं वादळ एका प्याल्यात शमतं
का..?
सुखदुःखात जुनं अन नवं,
काही काहीच नसतं...
फक्त जखमा जून्या असल्यातरी
नव्याने विव्हळतात
पण म्हणून घोटभर पिल्याने जखमांचं
विव्हळणं थांबतं का..?
एकमात्र नक्की खरं आहे,
दुःख एकमेकांना सांगितले की
लढण्याचं बळं येतं...
पण म्हणून दुःख एकमेकांना
सांगायलाही,
ग्लासाच्या बैठकीत रंगावंच लागतं
का..?
दुःख विसरायला खरंच,
दोन घोटांना रिचवायला लागतंच का..?
मनाचं ओझं वाटायला,
क्षणभर
का होईना बैठकीला हजर रहावंच लागतं का..?
गणेशदादा
शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा