डागधब्बे…!!!
आजवर अनेक डागधब्बे चिकटले,
जळमटांसारखे इथून तिथून मिळत गेले...
न जाणताच माझ्यातल्या मला..
अमुकतमुक ठरवत गेले...
कधी धर्मद्रोही तर देशद्रोही,
अजब गजब शिक्के मिळाले....
जात, धर्म, पंथ, पलिकडचं माणूसपण,
कधीच कुणाला नाही कळाले....
ज्याला मी जसा भासलो,
त्याने तसे प्रतिमेत गुंतून टाकले...
ज्याला माझे विचार जसे वाटले,
प्रत्येकाने त्या साच्यात बांधले...
फरक एवढाच केला प्रत्येकाने,
कुणी पुसट तर कुणी पक्के मारले...
काहींचे डागधब्बे बराच काळ टिकले,
अन काही मीही मुद्दामच टिकवले...
गणेशदादा शितोळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा