मोठेपणा…!!!
अनेकदा वाटतं मोठेपणाचा आव आणून,
इतरांना नेहमीच का सांगतो आपण....
खरंच इतरांना जो पण सांगतो तो,
कधी तरी तोही पण मोडतो ना आपण...
कुणी ह्याची जाणीव करुन दिली की,
मनातल्या मनात पोखरून जातो आपण....
खरंतर मनातून खचून गेल्यासारखंच होतं...
पण मोठेपणा दाखवण्याकरता ताठ मानेने उभे रहातो आपण...
दुःखाच्या असंख्य वेदना मनाला ढोसत असतात,
पण उगाचंच मोठेपणाचा शहाणपणा दाखवत असतो आपण...
कोंडमारा झाला कितीही मनातल्या मनात,
मात्र जगाकरता खोटं हसत असतो आपण...
तत्व, निष्ठा आणि आपलं मत,
एवढंच टिकवण्याकरता ठाम असतो आपण...
पण मोठेपणा टिकवण्याच्या नादात,
स्वतःलाच विसरून जात असतो आपण...
गणेशदादा
शितोळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा