उत्तर....!!!
मनातल्या मनात आढेवेढे घेतले तरी,
कधीकधी अपेक्षित उत्तर मिळत नाही...
दरवेळी नवीन प्रश्नाला जन्माला घालत जाते,
उत्तर मात्र सापडत नाही....
मनाच्या गाभाऱ्यात उगीच कुढंत बसतो...
पण उत्तर मात्र सापडत नाही...
कितीही वीट आला तरीही,
मन शोध घेणे थांबवत नाही...
वाटतं मग मनाचीही अडगळ झाली पार,
कितीही उचकापाचक केली तरी उत्तर मात्र सापडत नाही....
जे असतं तेच समोर असूनही,
फक्त आपल्याला उत्तर दिसत नाही....
शेवटी मनातलं काहूर शांत झालं की,
स्थिर नजरेतून उत्तर दिसल्याशिवाय रहात नाही...
एवढ्या सगळ्या आटापिटा करून उत्तर सापडलं की,
स्वतःवर हसावं की रडाव कळत नाही....
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा