माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

ती...!!!

कधीही स्पर्श न होता,
हळूवारपणे जाणवणारी...
कधीही बंध न ठेवता,
अलगद ओढ लावणारी...

अबोल असतानाही,
नजरेने बोलणारी...
भाषा तिची भलतीच असूनही,
डोळे मिटूनही उमलणारी....

शब्दाविना ती काहीच नसूनही,
जगण्याचं बळं देणारी...
सगळं काही ठप्प झाले की,
धडपडण्याची जिद्द देणारी...

कितीही सांगितलं तिच्याबद्दल तरीही,
आकाशासारखीच न मावणारी...
आता इथे ती संपली वाटलं तरी,
क्षितिजासारखीच अथांग भासणारी...
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)

(टीप :- ह्यातील ती म्हणजे केवळ एक कवी लिहीतो ती कविता आहे. उगाच ग्रह करून घेऊ नयेत.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा