मी लिहित गेलो...!!!
मला वाटलं तस तसं,
मी माझं लिहित गेलो..
कुणाला आवडलं अन कुणाला नावडलं,
मी मात्र फक्त मांडत गेलो...
कधी कुणाला बाजूचे वाटले
अन कधी कुणाला विरोधी म्हणून खटकले...
वाद अन विवाद गाजले तरीही
मी मात्र माझी भूमिका घेत गेलो...
अमुक लिहा, तमुकच लिहिले नाही,
नाना प्रकारच्या वादात अडकलो...
पादत्राणांच्या प्रसादाच्या धमक्यांना भीक न घालत,
मी शब्दांसोबत लिहीतंच गेलो....
भीती, पर्वा अन काळजी जिवाची,
किती दिवस करायची...
मुर्दाडांच्या मेंदूतील गाभाडलेल्या विचांरांना साक्ष ठेऊन,
मी एका गोळीची जागा राखून ठेवत लिहित गेलो...
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा