तिची चाहूल...!!!
कधी निवांत बसलो की,
तिच्या वाटेकडे बघत असतो...
डोळे पसरून अन भान विसरून,
जणू तिच्या येण्याची वाटच बघत असतो...
तिच्या आठवणी उचंबळून आल्या की,
मनाचा मोर थुईथुई नाचतो...
वीजांसारखा कडकडाट नसला तरीही,
जणू तो काळ तिची चाहूलच देतो...
सांजवेळी प्राजक्ताचा सडा पडावा तसा,
तिच्या येण्याने शब्दांचा सडा पडतो...
अन बैचेन झालेले मन आणि मी,
मनाच्या भोवती नाचू लागतो...
तिच्या आल्याची जाणीव झाली की,
मी मनमुरादपणे एकटाच हसतो...
तिच्या येण्याची अन माझ्या शब्दांची,
नवीन रेशीमगाठ बांधत जातो..
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
(टीप :- ह्यातील ती म्हणजे केवळ एक कवी लिहीतो ती
कविता आहे. उगाच ग्रह करून घेऊ नयेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा