सरकारी दुर्दशा
खड्ड्याची धडधड वाढली की,
गावाच्या रस्त्याची चाहूल लागते...
मातीचा गंध येण्याअगोदरंच तुंबलेल्या गटारीचा दुर्गंध,
गावाच्या वेशीचा इशारा देऊन जाते...
पारावरची उनाड पोरं पाहिली की,
हाताला काम नसल्याचे सांगून जाते...
पिचकाऱ्या अन धुराचे लोट दिसले की,
स्वच्छता अभियानाची तत्परता जाणवते...
झेंडे, फ्लेक्स अन जाहिराती पाहिल्या की,
ढोंगीपणाचं अन थापांच पीक जोमात आलेले दिसते...
पण सडलेली पिकं अन ओसाड रानं दिसली की,
शेतकऱ्याचं मरण फासासहीत उभे रहाते....
माझा देश बदलतोय,
पुढारी दिसला की आरोळी अन हाक ऐकायला येते...
अच्छे दिन म्हणून भारताचा इंडिया होतोय,
पण माझ्या भारताची कृषिप्रधान ओळख र्हास पावते...
गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा