माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

आमचे आभियांत्रीकीला असतानाचे मित्रासारखे असणारे मार्गदर्शक असणाऱ्या चि. अविनाश घोलप सर यांचा साक्षगंध झाला. त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता ही कविता. 

नवीन नात्यात प्रवेश करताना आमच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा




योग घडवून भेटला आहात तुम्ही,
पतीपत्नी पेक्षा एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण रहा...
आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक वळणांवर,
एकमेकांचे सखे सोबती रहा...

काचेवरच्या ओघाळत्या थेंबासारखे,
आनंदाच्या ओघात रहा...
मनातल्या भावनांचे दवबिंदू असून तुम्ही,
नात्यांच्या मैफिलीत चमकून रहा...

जमिनीवरती रोवून घट्ट पाय अन घेऊन हाती हात,
आयुष्यात गगनभरारी घेत रहा...
यशोशिखरांची उघडतील दारे अनेक,
स्वप्नांच्या मार्गावर दोघे पादाक्रांत करत रहा...

नवीन नात्यात प्रवेश करताना आमच्या शुभेच्छा,
आयुष्याभर एकत्र सोबत रहा...
थोरमोठ्यांचा घेऊन वर अन आशिर्वाद,
नवीन जबाबदार्‍यांचा ओलांडून उंबरठा पुढे जात रहा....


गणेशदादा शितोळे
(३ सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा