भोवताली असते माणसांची गर्दी,
पण माझं असं कोणीच तिथं नसतं...
ढिम्मच उभा असतो फक्त गर्दीत,
पण गर्दीतही मनाला एकटेपण भासतं...
असतो मग मी जेव्हा जेव्हा एकटा,
खरंतर खुप खुप बोलायचं असतं...
मनात साठलेलं बोचरं सर्व काही,
क्षणात रितं करायचं असतं...
गणेशदादा शितोळे
(२५ सप्टेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा