माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७


माणसं मारून विचार थोडीच संपतो हो...!!!



माणसं मारून विचार थोडीच संपतो हो,
आज मी थोडं कलबर्गी होतो...
तुमच्या अचूक नेमाइतकाच त्वेषाने फोफावेल,
आज मी थोडे खरंच बोलतो....

सांगतो शिवाजी कोण होता पुन्हा,
आज मी थोडं पानसरे होतो...
फार तर फार एका गोळीचा प्रश्न आहे ना,
तोपर्यंत आज मी थोडं जगून घेतो....

उधळून टाकू तुमचा प्रत्येक डाव,
आज मी थोडं दाभोळकर होतो...
सांडतील ना रक्ताचे दोन थेंबच,
आज मी थोडं मनातलंच बोलतो...

असली तुमची गिधाडांची टोळी,
आज मी थोडं गौरी लंकेश होतो...
अंगार नाहीत हो शब्द माझे,
आज मी थोडे शब्दच बोलतो...



गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा