मी माझाच किनारा शोधतोय...
आयुष्याच्या समुद्रात झोकून दिलंय स्वत:ला,
कंटाळा येत नाही तोपर्यंत पोहून घेतलंय....
आता घ्यावा जरासा आराम,
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...
संकटांच्या लाटांशी भिडणं रोजचंच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता घ्यावा खळखळाटापासून शांत विराम,
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...
लहान मोठे माशांशी भेटणं रोजंचच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता घ्यावा जरासा मोकळा श्वास,
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...
मावळतीचा सूर्य पहाणं रोजचंच,
तेही जणू सवयीचंच झालंय....
आता टाकावा जरासा निश्वास,
म्हणून मी माझाच किनारा शोधतोय...
गणेशदादा शितोळे
(१४ सप्टेंबर २०१७)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा