माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७


वळणावरचा पाऊस....!!!


खरतर तो अनेकदा यायचा,
मीच दरवेळी त्याला टाळत आलो...
अन काल अचानक तो,
पाठशिवणीच्या खेळात भेटलाच...

कालही वाटलं आजही याला टाळावे
अन क्षणभर एका झाडाखाली थांबलो...
पण त्याचा भलताच वेग पाहून, 
त्याला पुन्हा चालायला लागलो...

खूप दिवसांनी,
मी त्याला भेटलो...
एकमेकांना कवेत घेऊन,
चिंब भिजून गेलो...

त्याच्या सोबतीचा प्रवास,
कायमच मला हवाहवासा वाटतो...
कालही त्या दोन तासांच्या साथीत,
आनंदाने मी तृप्त झालो....

एवढं सगळं चांगलं चाललं असताना,
तो जसा अचानक आला तसाच गेला...
अन मी मात्र त्याच्या परत येण्याच्या आशेने, 
रस्त्याकडे टक लावून बघत राहिलो...

गणेश शितोळे
(३० सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा