एलफिन्स्टन्सची दुर्दैवी घटना, वाढदिवस आणि मी
नुकताच ऑफिस मध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं. महिनाभरातील सर्वांच एकत्रित. एकतर हाफ डे घेऊन पण कामाअभावी ऑफिसमधेच दिवस गेल्यानं कंटाळा आला होता. त्यातच आपलाही याच महिन्यात वाढदिवस असतो याचा विसरंच पडला होता. त्यामुळेच अनेकदा बोलावून पण मी निघायला तयार नव्हतो. नंतर लक्षात आले पण मुंबईत घडलेली सकाळीची घटना डोळ्यासमोरून हटली नव्हती. दुपारच्या वेळी जेव्हा बातमी वाचली तेव्हा क्षणभर हायसं वाटलं. पण पुढच्या क्षणी मनाला धस्स होऊन गेलं. कारण काही काळाकरता का होईना मो पण मुंबईकर म्हणुन जगलो होतो. मुंबई लोकल च्या गर्दीचा भाग होतो. पण जेव्हा जेव्हा मुंबईत अशा काही घटना घडतात तेव्हा तेव्हा मुंबईकरांचं स्पिरीट वाखाणण्याजोगं असतं. अन ते त्या दिवशीही दिसलं.
एलफिन्स्टन्सची दुर्दैवी घटना मनाला चटका लावून जाणारी होती. त्यात ऑफिसात हे असं सेलिब्रेशन करणं माझ्याच्याने कदापि शक्य नव्हतं. पण ही वेळ अशी असते की अनेकांच्या वेगवेगळ्या भावना आणि दृष्टीकोन असतो. त्यात आपण आडकाठी घालण्यापेक्षा मी सहजपणे वाढदिवस साजरा करत नाही सांगून टाकलं. पण एलफिन्स्टन्ससारखी दुर्दैवी घटना घडली असताना मीही त्या गर्दीचा एक भाग असतो त्या गर्दीतीलच एका व्यक्तीवर बळावलेला हा दुःखद प्रसंग आणि सेलिब्रेशन करणं माझ्या तत्वात बसणारं नव्हतंच. त्यामुळेच मनोजच्या आग्रहानंतरही मी त्यापासून दूर झालो नाही. क्षणभर त्याच्या मनात प्रतिक्रिया उमटली असेल. पण त्यापेक्षा ही हे अधिक महत्वाचे वाटलं.
गणेशदादा शितोळे
(२९ सप्टेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा