तुला कळणार नाही आणि मी...
काही दिवस झाले चालेलेल्या तुला कळणार नाही ट्रेण्डवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना नेमकं काय चालंल आहे याचा प्रश्न पडला. पण सगळ्यांना हे कोड्यात टाकणारं होतं. हा ट्रेण्ड ज्यांच्याकरता होता त्यांच्याकडून नेहमीसारखंच काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. खरंतर अशा माणसांच्या प्रतिक्षेत होतो. आजवर आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटली. काही आपली झाली तर काही आपली होऊन दुरावली देखील. यात दोष कोणाचा या वादात मला पडायचे नाही. कारण त्यातून फक्त वाद निर्माण होतात. खरंतर या दूरावलेल्लाय मनांना जोडण्याकरताच हा सगळा खटाटोप होता.तुला कळणार नाही चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुलाखतीतून एकंदरीत चित्रपटामागची भूमिका लक्षात आली. वाचक मित्रांची चर्चासत्रात दूरावलेल्या नात्यांना रिफ्रेश करून पुन्हा एकदा पालवी फुटावी म्हणून तुला कळणार नाही हा ट्रेण्ड करण्याची कल्पना सुचली. आणि याच कल्पनेतून गेल्या आट दिवसांपासून फेसबुक पेजच्या माध्यमातून चारोळ्या लिहीण्याचा प्रयत्न सुरू होता. ८ सप्टेंबर ला चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो कसा आहे हे लक्षात येईलच. पण मुळात हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा काहीही भाग नव्हता.
एकूण तुला कळणार नाही ह्या ट्रेण्डमागची भूमिका मांडताना खरंतर दुरावलेल्या माणसांना भेटण्याचा प्रयत्न करायचा होता. पण कामाअभावी ते जमेल की नाही यावर शंकाच आहे. तरीही ज्या होईल त्या माध्यमातून तो प्रयत्न केला जाईल. पदविका अभ्यासक्रमापासून प्रत्येक वळणावर मैत्रीच्या कक्षा रूंदावत राहिल्या. पण या कक्षांमधे फक्त माणसांचा भरणा झाला. प्रत्यक्ष दोन तीन वर्षात फक्त मोजक्याच माणसांच्या संपर्कात राहिलो. पण मेकॅनिकल की कंप्युटर की इ अॅण्ड टिसी अशा वादात अडकलो नाही कधीच. ज्या माणसांसोबत जगलो वाढलो तीही आभियंत्रिकीच्या प्रवासात दूरावली. एकूणच काय तर ना इकडचा ना तिकडच्या ह्याच भूमिकेत राहिलो याची सल कायम आहे.
पदवीचे शिक्षण घेतानाचा प्रवासही सुखकर होताच. घरंच महाविद्यालय असल्याने सुरवातीचा आपलं राज्य करण्याचं स्वप्न अल्पावधीत साकार झालं. भांडण तंटे करून भीतीचं अधिराज्य गाजवता येतं. पण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची ताकद फक्त मैत्रीतच होती आणि ती असतेही. पदविका अभ्यासक्रमासारखीच इथंही अनेक माणस कमावली. मैत्रीची ओंजळ अगदी ओसांडून वाहिली. पण सरते शेवटी महाविद्यालय सोडताना हिशोब केला तर वाळूच्या कणांसारखी ओंजळीत सामावलेली मैत्री ओघळून गेली. आजही अनेकदा प्रश्न पडतो की आपला सर्वात जवळची व्यक्ती कोण. जुन्या आठवणीत उत्तरे शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी हाती काहीच लागत नाही. कारण उत्तर सोपं होतं. आजवर भेटलेली माणसं मला कायम समांतर राहीली. आमच्यात ओढ होती मैत्रीची. संवाद होता. पण तो सैल गाठीतच गुंतलेला. वास्तवाने अंतर आलं आणि ती सैल गाठ आपसूकच सुटली.
आज पदवीचं शिक्षण घेतलेले महाविद्यालय सोडून दोन अडीच वर्षे उलटली. प्रत्येक जण आयुष्याची लढाई लढत झगडत पाय रोवण्याचा प्रयत्न करतोय. सोशल नेटवर्कींग साईट्स ने नात्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला असं कितीही वरवर वाटत असलं तरीही वास्तविक नात्यांमधील संवाद संपण्याचं कारणही सोशल नेटवर्किंग साईट्सच ठरल्यात. नात्यांमधील अंतर कमी झाले असे वरवर दिसत असले तरीही नाते दूरवल्याची खंत प्रत्येक मनाला आहे.
व्हाट्सअप आणि फेसबुकवरील रोजच्या संवादाने माणसातली समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याची शक्तीच हरवली आहे. कोणतंही नातं गरजेशिवाय जन्माला येत नाही अन वाढतंही नाही. आपल्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे नातं असतं. पण आजकाल ह्याच भावना सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यामातून व्यक्त करताना नात्यांची ती खोल जाणीव आढळत नाही. माणसांसोबतच्या नात्यांची जागा आता सोशल साईट्सने घेतली आहे. याला मीही अपवाद नाही हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच त्याच सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून सुरू केलेला तुला कळणार नाही हा ट्रेण़्ड तीच हरवत चाललेली नाती पुन्हा रूजवण्याच प्रयत्न करणार आहे.
खरंतर हा उपक्रम वैयक्तिक पातळीवर होता. पण चर्चासत्रातून सार्वजनिक करण्यात आला. म्हणूनच या ट्रेण्डच्या माध्यमातून आपल्या नात्यांना रिफ्रेश करून आपल्या जवळच्या व्यक्तींची आपल्या आयुष्यातील किंमत कळणार नसली तरी तिचं मोल जाणवून द्या. एखाद्या विषयी इतके दिवस मनात असणारे गैरसमज बाजूला सारून घ्या एक गळाभेट. राहून गेला असेल फोन तर आज करू उद्या करू म्हणण्यापेक्षा मनात आलं तर मन मोकळं करून टाका. बोलायचं असेल खूप पण समोरून बोलता येत नसेल तर लिहा सोशल नेटवर्कींग साईटसवर. पुन्हा एकदा सुरू करा थांबलेला संवाद.
तुला कळणार नाही च्या माध्यामातून करूया
आपलीच नाती आपणच रिफ्रेश
जोडू या नवीन दूवा जून्याच नात्यांना.
घेऊया नात्यांच्या मुरांब्याची चव पुन्हा एकदा.
गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा