माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

रक्त म्हणजे...?


आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
आपलेच विचार आपणच मांडल्याचं,
चुकवलेलं मोल असतं...

आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
विचारांच्या लढाईत
गोळीच अंतिम लक्ष्य असतं...

आज मी दाखवतो
रक्त म्हणजे नक्की काय असतं...
लढण्यासाठी उमेद देणारं,
जाज्वल्य प्रेरणेचं प्रतिबिंब असतं...

गणेश शितोळे
(१५ सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा