केवळ मैत्रीच असं नातं आहे...!!!
केवळ मैत्रीच असं नातं आहे की,
ज्यात आपण आपण राहू शकतो...
अगदी खरेखुरे...!
इतर नात्यांसारख्या अपेक्षा अन जबाबदार्या मैत्रीतही असतात ना...
पण त्याचं कधी ओझं वाटत नाही.
म्हणजे हे असं की अगदी कळूनही येत नाही.
ज्यात आपण आपण राहू शकतो...
अगदी खरेखुरे...!
इतर नात्यांसारख्या अपेक्षा अन जबाबदार्या मैत्रीतही असतात ना...
पण त्याचं कधी ओझं वाटत नाही.
म्हणजे हे असं की अगदी कळूनही येत नाही.
म्हणजे असं अनेकदा झालंय की मला कधी पहाटे कुठे जायचंय आणि सकाळी लवकर जाग येईल का नाही म्हणून मी माझ्या सभोवतालच्या मित्रमैत्रीणींना सांगून ठेवत असतो. सकाळी लवकर उठवण्याचा माझा मोबाईल वर अलार्म असला तरी ती जबाबदारी पार पाडण्यात कायम माझे मित्र मैत्रिणी आलार्मच्या पुढे राहिले आहेत. म्हणजे असं अनेकदा झाले आहे की मी इकडे घरी ढाराढूर झोपणार आणि ते बिचारे साखरझोप मोडून मला आठवणीने फोन करून उठवणार. मैत्री चं नातं हे असं आहे. यात अपेक्षा आणि जबाबदारी कधी आली आणि पूर्ण झाली हे कळूनही येत नाही. कारण तसं कधी वाटतंच नाही. मला उठवण्याची अपेक्षा मित्रमैत्रीणींकडून केली आणि ती त्यांनी जबाबदारी समजून पार पडली असं न जाणवताही जे सुरळीत पार पडते ते केवळ मैत्रीच्या नात्यातच होऊ शकते.
मैत्रीचा दाखला द्यायचाच म्हटला तर मला कायम माझे महाविद्यालयीन जीवन आठवते. अभ्यासात आपल्या पेक्षा मागे पडणार्या मित्राला आपल्याशी निगडीत नसणार्या विषयाचा आपण स्वतः अभ्यास करून मित्राचा अभ्यास करवून घेत त्याला तो विषय सोडवण्यात मदत केवळ मित्रच करू शकतो हे अनुभवलं आहे. कारण त्यात असणारं अतुट मैत्रीचं नातं. परीक्षेच्या आदल्या रात्री प्रसंगी आपल्या झोपेचं खोबरं करंन मित्राची रिविजन घेणारी मैत्रिण मी पाहिली आहे. त्या दोघांमधे मैत्री पेक्षा अधिक वेगळं नातं काय आहे या फंदात आम्ही कधीच पडलो नाही. पण तो पास झाल्यावर मनोगत व्यक्त करताना आम्हाला ते दोघं तासनतास काय बोलतात याचा आम्हाला अंदाज आला. मैत्री ही अशी असते. तिला ना व्याख्या ना बंधनं...
मैत्री म्हणजे केवळ एकमेकांवरील विश्वास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा