माझी सुरवात
मी लिहायला सुरुवात कधी केली असा प्रश्न मित्रमैत्रीणींपैकी अनेकजण नेहमीच विचारतात. तसं जरा डोक्याला ताण दिला तर आठवतं. माझी लिहीण्याची सुरवात झाली तर ती डिप्लोमाच्या हॉस्टेलपासूनच. फक्त सुरवात झाली होती. व्यसन झालं नव्हतं. लिहीण्याच्या सुरवातीनं मग अवांतर वाचनाचं व्यसन जडलं. आणि सर्वात सोपं माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. आजही डिप्लोमाच्या अनेक मित्रांना माझी ही सवय माहित होती की रोज सकाळी अंघोळ करून वर्तमानपत्र विकत घेऊन कॉलेजला जायच्या वेळेपर्यंत वाचून काढणं माझं नित्याचं होतं. हा माझ्या लिहीण्याच्या सवयीचं फक्त फारसं कोणाला माहित नव्हतं.
लोकमतच्या "मैत्र" पुरवणीत तेव्हा दोन तीन लेख छापण्यात दिलेले होते. छापले गेले की नाही कळंलं नाही. पण तेव्हा खऱ्या अर्थाने ही शब्दांच्या प्रवासाला सुरवात झाली. पुढे हा प्रवास एका वळणावर थांबलेला होता. इंजिनीअरींग आणि इंजिनीअरींग वर्षे म्हणजे फक्त उनाडक्या करत जिकडे भटकावे तिकडे फिरण्याची संधी साधली. त्यामुळे ह्या सवयीचा विसर पडला. अधूनमधून प्रयत्न करत होतो. फेसबुकवर एक ग्रुपही काढला होता. पण माझंच मला कंटाळवाणं वाटल्याने सगळं थांबवलं होतं. हा अडखळणारा, थांबलेला प्रवास आता नुकताच चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाला.
जो लेख पहिल्यांदा लिहिला त्याचं नावं मी आजही विसरू शकत नाही. त्यावेळेसच्या मैत्र पुरवणीत प्यार के साईड इफेक्ट्स नावाचं सदर लिहीले जात होते. त्याच सदरात अर्थ नात्यांचा हा माझा लेख सामाविष्ट करण्याकरता दिला होता. माझ्या लेखनाची सुरवात झाली ती तेव्हापासून. त्यानंतर वरचेवर सुरवातीला फावल्या वेळात आणि नंतर कटाक्षाने न चूकता मी लिहीत गेलो. अनेकांच्या पसंतीस ते उतरतही गेलं. मी छान लिहिलंय का नाही मला माहित नव्हतं. पण एखाद्याच्या मनाचा ठाव घेणारं लिहिले आहे अशा प्रतिक्रिया अनेक मित्रमैत्रीणींकडून आल्या.
कधी ठरवून काही लिहीलेही पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्येक वेळी ते हवं असणारं कौतुक नाही मिळत म्हणून मी लिहायचं थांबवत गेलो असं नाही. मी आजही लिहतोय. दीडशे च्या आसपास कविता झाल्या आहेत. दोन पुस्तकंही लिहिलीत. अन जीवाभावाच्या मित्रांनी सांगितल्यानंतर त्यांच्यासाठी मैत्री, प्रेम यावर काही लेखही लिहिले आहेत. अनेकांना ते वाचून आपल्या आणि समोरच्याच्या चूका उमगल्या. आणि त्यातूनच नवी नाती गुंफत गेली. जवळपास १७ मित्रमैत्रीणींनी यशस्वीपणे मैत्री प्रेमातून आता आयुष्याचा जोडीदार होत लग्नंही उरकली आहेत. या मंडळींचा आजही न चूकता फोन येत असतो. दोघांच्या मधील दूवा होण्याची भूमिका बजावण्यात मला कधीही कमी वाटलं नाही. त्यात अनेकदा रात्री रात्री जागवल्या गेल्यात. झोपतो तर मी तसंही उशिराच. त्यामुळे रात्रीच्या तीन साडेतीनला काहीच नाही असं समजून मध्यांतरी एका मित्राने साखरपुड्याचं निमंत्रण दिलं होतं. आणि तसंही अनेकदा मीच म्हणत असतो एक दिवस याही मित्रासाठी. आणि ते स्विकारत आनंदाने दिवस काढत जगतोय.
अनेकदा रात्री मित्राचे अशा काही परिस्थितीनुरूप मार्गदर्शनपर लेखाचे फोन येतात पण त्यामुळे जो पर्यंत मी ते लिहीत नाही तोपर्यंत मलाच चैन पडत नाही. ते काय होतं सकाळीही लिहिले येते. पण रात्री मित्राच्या त्या फोन किंवा पोस्ट्स नंतर झोप येईपर्यंत येणारे प्रत्येक शब्द कदाचित सकाळी लिहिले जातीलच असं नाही. म्हणून रात्री लिहिण्याची सवय जडली आहे.
लेखनाच्या अनेकांना मी खटकत असतो. पण मुळात मीच सुस्पष्ट असल्याने लिहिण्यातही शक्य तितकी सुस्पष्टता आपोआप ठेवली जाते. उगाच आडेवेडे घेत जगणंही अन लिहणंही मला नाही जमत. एक जूनी सवय आहे. जिथं कमी तिथं आम्ही. डिप्लोमापासून क्रिकेटच्या मैदानवरची अंपायची भूमिका बजावत मैदानावरची निर्णय घेण्याची क्षमता आयुष्यात काही तात्काळ निर्णय घेण्यास मदतीची नक्की ठरली. जगात कोणी कितीही म्हणोत की मी सरळ आणि सुस्पष्ट आहे. मी काहीही लपवत नाही. किंबहुना माझ्याकडून काही लपून रहात नाही. तरी प्रत्येकात एक वेगळा माणूस लपलेला असतो. जो समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्याबोलण्यातून सहवासातून कदाचित कधी दिसत नाही. पण तो असतो, तो आहे याची प्रत्येकाला जाणीव असते. तसाच माझ्यातला हा कवी लेखक माणूस आहे. तुर्तास या माणसाचा निरोप घेत पुन्हा काहीतरी लिहीण्याकरता बाकी ठेवतो.
गणेशदादा शितोळे
३१ मे २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा