लेखकाचं शब्दांना पत्र
शब्दा, तू मित्र ना रे माझा...!
तरी मला हे असं करायला सांगतो आहेस. काय तर म्हणे
"ही माणसं लय डेंजर आहेत."
हो असतील डेंजर. डेंजर नाही तुला धोकादायक दगाबाज म्हणायचं असेल बहुतेक. पण म्हणून कोणाकडूनही बळजबरीने काही करून घेऊ शकत नाहीत.
नाही, नाही लिहीणार मी. लिहिणे ही माझी कला आहे, अन त्या कलेचा अपमान करत असेल तर मी तो मुळीच सहन करू शकत नाही. मी का विकलं जावं कोणाला. माझाही स्वाभिमान आहे. ही कला आजवर मी जपली. त्या सोबत मी जगलो. आयुष्यातला प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात ही कलाच एकमेव माझ्या सोबत होती. आणि आज तिला दोन रूपड्यासाठी विकून कोणाची हांजी हांजी नाही करू शकत मी.
अरे ज्या माणसाला लिहिण्यातली बाराखडी कळत नाही तो मला चॅलेंज देतो अन तेही ही असं अभद्र स्वत्वाचा उदोउदो करणारं. ना त्याला अर्थ आहे ना माझ्या आयुष्यात स्थान.
चालत आलं असेल आजवर पण मानत नाही. त्याच्या खरेपणावरच मला शशांकता आहे. पण मला ते पटत नाही. तू म्हणतोस की मी पटवून घेत नाही. पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मला पटावीच असंही नाही. आणि हो मला जे पटतं तेच मी लिहितो अन लिहीणार. उगाच कोणाच्या आनंदासाठी भलत्याच गोष्टींचा उदोउदो करायला मला कधी जमलं नाही अन जमणारही नाही. मी आहे हा असा आहे. कोणाला पटो ना पटो.
शब्दा, मित्र मानत होतो ना मी तुला. पण तूही त्याही माणसांसारखाच निघाला का रे...?
माझ्या चांगल्या वाईट गोष्टीत आधार देणारा सखाहोता तू. पण आज त्या मैत्रीला सुरूंग लावला तू. अरे काय करतील ते. फार तर फार जीव घेतील ना. घेऊ दे ना अरे काय उपयोग या अशा जीवाचा. जो दुसर्याच्या काय पण स्वतःच्याही उपयोगी पडत नाही.
तू म्हणशील काय फरक पडतो आपल्यात थोडा बदल करायला. एखाद्याचं गुणगान गायल्याने आपलं भलं होत असेल तर काय हरकत आहे.
अरे पण माझी बदलाला कधी हरकत नव्हतीच. पण तो असा असेल हे अपेक्षित नव्हते. लिखाण हा माझा छंद आहे. आवड आहे. व्यवसाय नव्हे. व्यापारनव्हे. मी लिहितो त्या माझ्या मनातल्या कोपर्यात साठवलेल्या भावना असतात. त्या मी उतरवत असतो. आणि हे तुला चांगलेच माहित आहे. माझ्या भावनांचाव्यापार करणे मला शक्यनाही. आणि जे माझ्या मनातच नाही ते मी कसं लिहायचं. तूच सांग.
कोणीही यावं अन सांगाव तुम्ही जा लिहिता ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही हे असं लिहा.
अरे पण प्रश्न असा आहे की मुळात यांची मान्यता घ्यायला गेलंयच कोण.? तुम्हाला काय वाटते हा तुमचा प्रश्न आहे. मला जे वाटतं, जसं वाटतं ते तसं मी लिहीतो. तुमच्या भावना दुखावतातो कशा. मला वाटलं मी हसलो दुखल्या तुमच्या भावना. तुमच्याभावनादुखावल्याजातील म्हणून आम्ही आमच्याभावनांनामुरडघालावी हे कदापि शक्यनाही. निदान मला तरी नाही जमणार. शेवटी कोणाला काय करायचं असेल ते करावं. मरणाला मी कधीच घाबरत नाही. मी ज्या दिवशी जन्मालाआलोत्यादिवशीठरलंय की मीमरणारआहे. त्यामुळे घाबरून उपयोग नाही. शब्दा हे तुलाही माहीत आहेच मी कसा आहे ते. जीवन आयुष्य या बाबतीत माझी मतं तुला माहिती आहेतच.
शेवटी काय आपलं जीवन ?
कोण आपण ?
कुणीही यावं टपली मारून जावं म्हणजेच का आपलं आयुष्य. जणू आपल्या आयुष्याला किंमतच नाही. नक्की काय करतो आपण ?
याच्या त्याच्या पैशावर खायचं प्यायचं अन जगायचं. हे असलं आयुष्य आपलं. दुसर्याला कशाला आपल्यालाच आपल्या आयुष्याची किंमत नाही. त्यामुळे कसंही जगतो. आपला जन्म होऊन पंचविशी ओलांडून पुढे गेली तरी आपण गाढ झोपेत आहोत. ना भविष्याची फिकीर ना वर्तमानाची चिंता. रोजच्या रहाटगाडग्यात जगतोय नुसतं ढिम्म बनून.
अरे आपल्या स्वप्नांनाहीगंजचढलाआहे. त्यामुळेच आजकालच्या साखरझोपेतही आपल्याला स्वप्न पडत नाहीत. जणू त्यांनीही आपल्यावर बहिष्कार घातला आहे.
काय करणार बिचारी ती. आहोतच आपण असे. स्वप्नही म्हणत असतील की अरे काय आपण कोणाच्या झोपेत येऊन करायचंय. या माणसाला आयुष्यात काही ध्येयच नाही तर मग याला स्वप्न पडून उपयोग काय. ती कधीच पूर्ण होणार नाहीत अन हाही प्रयत्न करणार नाही. मग आपण का उगाच त्याला स्वप्न रंजन करायचं.
हो हे असंच आहे आपलं आयुष्य. काय फरक पडतो का आपल्याला दिवस उगवण्या मावळण्याचा. उत्तर एकच. नाही. का ? कारण आपण आपल्या रोजच्या रूटीनमधे एवढं गुरफटून गेलो आहे की काही फरक नाही. रोज तेच तेच. सवयच झाली आहे. मन मारून जगायची.
मृत्यू सोडून फिकीर उरलीयच कशाची की आता याला घाबरावं. हा देह नाशवंत आहे. कधी ना कधी मरणार आहे. संपणार आहे. कितीसा वेळ लागतो जीव निघून जायला. ? वर्ष, दिवस, तास की मिनिटं. जास्तच होतंय ना. मग सेकंद, मिलीसेकंद. हेही नाही. त्याहून कमी. आपल्याला मोजता न येईल इतके कमी. मुर्ख आहोत आपण. जगात इतके शोध लावले पण आयुष्य नेमकं किती काळाचं असेल नाही शोधू शकलो. कारण ते प्रत्येकाला वेगळं असतं. जीव किती वेळात शरीराला सोडून जातो. ?
नाही सापडत उत्तर. कारण ते मोजण्याचे साधन उपलब्ध नाही. कारण आम्ही सदैव दुसर्यावर अवलंबून. उत्तर सोपं आहे. क्षण. जीव जाण्यासाठी केवळ एक क्षण हवा असतो. कोणासाठी तो काही वर्षांचा तर कोणाला काही मिलीसेकंदाचा असतो. आपण कितीही प्रगती केली तरी या क्षण नावच्या गोष्टीचा उलगडा करण्यात अपयशीच ठरू. कारण तो निश्चितच नसतोच. मग केवळ एका क्षणात संपणाऱ्या आयुष्याचा आपण कधीच विचार करणार नाहीत का ? किती दिवस असं मनमारूनजगायचं ?
आपला जीव तर केव्हाही कोणत्याही क्षणी जाणारच आहे. मग तो हाच क्षण म्हणून का घाबरायचं ?
का मी का मला वाटते ते लिहिणे सोडावे अन दुसर्याच्या भावनांना लिहावे ?
त्यांना वाटतं म्हणून ?
की मी असं केलं नाही तर माझा जीव घेतील म्हणून ? अरे जीव जायचाच म्हटला ना तर तो कोणाला दवंडी देत बसत नाही मी चाललो मी चाललो म्हणत. त्याला वाटलं तो जातोच. आणि समजा मी लिहिलें असं अभद्र लिखाण अन तेही त्यांना नाही आवडलं तरी ते मला मारणार आहेतच ना. मग कशाला घाबरायचं. जे होतं ते चांगल्यासाठीच ना. मग होऊ दे.
हो पण शब्दा, मित्रा तू आज या मनावर काळजावर खुप मोठा आघात केला आहे. संकटात सापडलेल्या मित्राला खंबीरपणे उभे राहून साथ करणारा खरा मित्र. अन तू तर मला संकटाला घाबरून हतबल व्हायला सांगतोय. अरे किती विश्वास होता तुझ्यावर.
मी मलाच सोडून जेव्हा आयुष्याच्या या पाऊलवाटेवर आलो तेव्हा आधाराचा हात पाठीशी घालत मला अभिमानाने उभा करणारा तू आज डगमगतोय याचंच दुःख वाटतंय. ज्या मित्रानं मला स्वाभिमानानं उभा राहिला शिकवलं तोच तो स्वाभिमान गहान टाकयला लावतोय याचंच दुःख वाटतंय.
माफ कर मित्रा. आजवर तुझं बरचसं ऐकलं. पण आज मात्र मी माझं , माझ्या मनाचं ऐकणार आहे. माझा निर्णय चूक की बरोबर माहित नाही पण मी तो घेतलाय. सर्व परिणामांची जाणीव ठेवून. तू कितीही म्हटलं तरी मी माझी कला माझा स्वाभिमान गहान ठेऊन आज लिहीणार नाही. मग पुढे काही होऊ. झालंच माझं काही बरं वाईट तर आपली भेटच कधी झाली नव्हती असं समजून जा. वाटलं की नाही आपला मित्र बरोबर होता अन आपण त्याच्यासोबत असायला हवं तर पुढच्या लेखनापासून एक ओळ माझ्याही नावाची आठवण म्हणून ठेव.
मी एकटा आहे.
ना इथं माझा कोणी मित्र आहे ना कोणी शत्रू. असलाच तर फक्त सहप्रवासी. तरीही कोणाला वाटत असेल तर त्याला माझं सांगणं आहे. आहेत माझेही मित्रमैत्रीणी. कारण त्याशिवाय कोणीही असू शकत नाही. जगू शकत नाही. मित्र हा असतोच. या तुमच्या व्याख्येनुसार आहेत माझे मित्रमंडळी.
पहिलं माझं मन. हो माझं मनच आहे माझा पहिला खरा मित्र.
दुसरा माझा अनुभव. हो माझा अनुभव आहे माझा मित्र.
तिसरा क्रमांक आहे आठवणी. हो आठवणी आहेत माझ्या मैत्रिणी.
खरंतर या सर्वांअगोदर शब्दा तुझा क्रमांक होता. तो तू गमावला की टिकवला तूच ठरवं. माझी अपेक्षा आहे की तो क्रम तू पुन्हा एकदा घेशील. तू म्हणतोस की आपण कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नसतात. कारण अपेक्षाभंगाचं दु:ख अधिक वेदनादायक असतं. पण तू कायम माझ्या सोबत असशील ही माझी अपेक्षाच होती. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही मी भोगतोय.
पण म्हणतात ना अगर जख्म देनेवालाही मरहम लगा ले.
तो जख्म का दर्द मिट जाता है.
वरना कितना भी मरहम लगा .लो
जख्म भरने के बाद भी दर्द होता है.
म्हणून ही अपेक्षा आहे की तू त्या क्रमांकावर यावं. नाहीतर अशा कितीतरी अपेक्षाभंगाच्या वेदना मनात आहेतच. तशीच ही पण राहिल. विव्हळत.
तोपर्यंत केवळ मन, अनुभव अन आठवणी हेच आणि हेच आहेत माझे खरे मित्र. खरे सखे. हो. कारण चांगला असो की वाईट, आनंदी असो की दुःखी, काळ परिस्थिती कशीही असली तरी फक्त त्यांनीच मला शेवटपर्यंत साथ दिली आहे. असेल ऋणी कोणाचा तर फक्त यांचाच. आजवर मी जगलो आहे यांच्या सोबतीनेच. अन पुढेही मी असाच जगत राहणार. माझं मन, माझे अनुभव अन माझ्या आठवणीं सोबत...
एकटाच...
गणेश दादा शितोळे
(२० नोव्हेंबर २०१५)
(२० नोव्हेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा