शुभेच्छा...
लिहायचं बरंच असतं...
पण प्रत्येक वेळी काहीतरी राहून जातं...
राहिलं की राहून जात असतं...
म्हणून पुन्हा थोडं लिहिवसं वाटत होतं...
शुभेच्छा तर दोन शब्दात द्यायला आलं असतं...
पण जुन्या आठवणीत लिहिलं जात होतं...
मिळाला उजाळा काही क्षणांना तर,
शब्दही दुसर्याला आनंद देत असतं...
जाऊद्या शुभेच्छा द्यायचं तर फक्त निमित्त होतं...
बर्याच दिवसांनी लिहायला कारण हवं होतं...
आणि तसंही लेखकाचं हेच वैशिष्टय़ असतं...
की कितीही लिहिलं तरी त्याला कमी वाटत असतं...
गणेश दादा शितोळे
(१८ नोव्हेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा