माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

काॅलेज संपून वर्ष उलटत आलं...
पहिल्यांदा मित्र सोडून नवीन वर्षांचं सेलिब्रेशन करणार आहे.
दिवाळीही विना पुस्तक परीक्षा शिवाय साजरी केली. पण दरवेळेस सोबत असणारे मित्र नसल्याचं दुःखही त्या आनंदात होते. तसंच काहीसं या वर्षाचा निरोप घेतना झालं आहे. मनातल्या त्या जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. त्यांनाच वाट करून देण्याचा हा एक प्रयत्न....

                         हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...


आठवतोय तो कॉलेजचा पहिला दिवस,
चिखलातून वाट काढत केलेला तो प्रवास...
पहिल्या लेक्चर नंतचा तो मोकळा श्वास,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय ती सबमिशनच्यावेळी झालेली ओळख,
अन काही दिवसात जुळलेली घट्ट मैत्री...
आणि तो तयार झालेला जीवलग मित्रांचा ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय आपला कॅन्टीनशेजारचा तो हक्काचा कट्टा,
लेक्चर बुडवून त्यावर बसून मारलेल्या गप्पा...
अन मस्तीत केलेली एकमेकांची खेचाखेची,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय कोण जायचं फार्मसीच्या मुलींना पहायला,
तर कोणाची लाईन मॅडमवरच होती...
अन कोणी मुलींना फलटणचा टॉन्ट मारायचं
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणं,
कधी सिद्धटेक तर कधी शिर्डी,
कधी मोरगाव तर कधी भुलेश्वरला जाणं...
आठवतात पळवलेल्या गाड्या अन उडवलेली धूळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय कधी तोंडावर केक फेकून मारणं,
तर कधी केक लावता लावता पाण्यात पडणं...
विडंबनाचं गीत म्हणत वाढदिवस साजरे करणं,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय मैदानावरचे क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉलचे खेळ,
मधेच घातलेले वाद अन केलेला तो राडा...
आठवतात ती भांडणं अन कॅन्टीनवर खालेल्ला वडा,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो न चूकवलेला,
दरवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा...
गडकोटांचा दऱ्याखोऱ्यातला प्रवास,
अन दीव दमणच्या ट्रीपची धमाल....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय गोपाळवाडीची भेळ अन रुचिराचा चहा,
कधी योगराजचा नाश्ता तर कधी कावेरीला पार्टी...
कारण असो वा नसो चहा, नाश्ता, पार्टी मात्र होणारच,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय मित्राची गर्लफ्रेण्ड होण्याआधी ग्रुपच्या वहीनी,
कुणी पांढऱ्या बुटावरून लक्षात ठेवलेली...
कुणी होती नुसती नजरेत साठवलेली,
तर कुणी डिप्लोमालाच पटवलेली...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय

आठवतंय कॅम्पला केलेली धमाल मस्ती,
गॅदरींगच्या मैदानात जिंकलेली कुस्ती...
जिएस वरून झालेलं वेगळंच राजकारण,
अन मिळवलेलं हक्काचं सेक्रेटरी पद....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो अंतरंगमधला बे जुबान परफॉर्मन्स,
खुद को तेरे चं ड्युएट अन फॅशन शोचा दरारा...
बक्षीसांचा पाऊस अन जमलेला एकत्र ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय गोव्याची अविस्मरणीय ट्रिप,
कोलंगुटला घेतलेला समुद्रकिनाऱ्याचा आनंद...
चर्च, किल्ला, क्रुज अन पाहिलेला मावळतीचा सूर्य,
अन आयुष्यात जगलेलो काही भन्नाट दिवस...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय इपिटॉमचा पहिला वहिला इव्हेन्ट,
रोबोकॉनचा ट्रॅकवर रंगलेला खेळ...
झालेली तारांबळ अन प्रयत्नांचा फसलेला मेळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो सेण्डॉफचा मंतरलेला दिवस,
भेट देण्यात आलेली आगळीवेगळी गिफ्ट...
सांगितलेले अनुभव अन कॉलेजचा घेतलेला निरोप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय... 

गणेशदादा शितोळे
(२८ डिसेंबर २०१५)


गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

एक आठवण २६/११/२००८ ची...


आजही तो दिवस तसाच आठवतो. जणू कालपरवाच घडून गेलेला.

मी डिप्लोमा काॅलेजच्या दुसर्‍या वर्षाला होतो. पेपरचाच काळ होता. बहुतेक पहिलाच पेपर असावा त्यादिवशी. इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स (एम थ्री)चा. गारठून टाकणार्‍या थंडीत पेपर असल्याने पहाटेच उठलेलो होतो. त्यामुळे साडेनऊच्या पेपरच्या वेळेपर्यंत बर्‍यापैकी अभ्यास झालेला होता. पहिला पेपर असल्याने जरासं टेन्शन होतंच. पण रिव्हिजन झाल्याने त्यादिवशी हाॅस्टेलवरून लवकरच काॅलेजला आलो होतो. काॅलेजमधल्या नेहमीच्या कट्ट्यावर फाॅर्मुलाची रिव्हिजन सुरू होती. हाॅस्टेलवरचे काही मित्रही होते. काहीवेळ गेला असाच गेला.
साडे आठ नऊ वाजण्याच्या सुमारास काॅलेजमधे हळूहळू मुलं यायला सुरवात झाली होती. काही कट्ट्यावर येऊन अभ्यासाच विचारत होती. तितक्यात कोठून तरी ऐक बातमी येऊन धडकली. कोणीतरी आम्हाला कट्ट्यावर बसलेल्यांना आवाज दिला.
"अरे अभ्यास काय करता..? पेपर कॅन्सल झालाय.."
या आवाजासरशी आम्ही त्या मुलाकडे माना वळवल्या. गाडीवर होता बहुतेक. त्यामुळे तो बोलला अन निघून गेला. आम्हाला पाठमोराच दिसला.
पेपर कॅन्सल झाल्याच्या बातमीने एक आनंदाचा धक्का दिला. ही बातमी काॅलेज परिसरात झपाटय़ाने पसरली. जो तो एकमेकांना पेपर खरंच का कॅन्सल झालाय का याची खात्री करत होता. काॅलेज समोरच्या आवारातल्या गर्दीत एवढा एकच विषय सुरू होता. तितक्यात गेटमधून सरांची एक गाडी आली. काॅलेजमधील दोन मित्रांची जोडी होती. एका सरांकडे पिशवी होती. त्यात काही स्वीट आणलं होतं. बहुतेक वाटायचं असावं काॅलेजमधे. ते दोघेही आम्हाला शिकवायला होते. त्यामुळे गर्दीचा रोख सरांच्या दिशेने गेला. सरांनी एवढी गर्दी पाहून पार्किंग कडे जाणारी गाडी मधेच थांबवून मुलांना गर्दीविषयी विचारणा केली. मुलांकडून पेपर कॅन्सल झालाय, पोस्टपोन झाल्याच्या बातम्या पोहचल्या. मुलांनी खात्री करण्यासाठी सरांना विचारलं पण त्यांनाच माहिती नव्हती. लगबगीने ते काॅलेजमधे गेले.
काही वेळातच एकेक शिक्षक काॅलेजमधे आले. सव्वा नऊ वाजले तरी एन्ट्री बेल झाली नव्हती. प्रिन्सिपल केबिनमध्ये मिटींग सुरू होती. थोड्या वेळाने मिटींग संपली अन पेपर कॅन्सल झाल्याची नोटीस नोटीसबोर्डवर लावण्यात आली. पेपर कॅन्सल झाल्याची पुष्टी झाल्यावर आम्ही मुलं आनंदात काॅलेजबाहेर गप्पा मारत निघालो. जो तो पेपर कॅन्सल झाल्याने आनंदी होता. काही वेळातच त्याचं कारणही कळाल.

"मुंबई मधल्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. "

ऐकल्यानंतर तंस आमच्या कोणाच्याही मनात दुःख भिती काही जाणवलं नाही. उलट पेपर पोस्ट्पोन झाले याचा खुपच आनंद झाला होता. कारण अशा घटना नेहमीच घडत असल्यासारखं आम्हाला गांभीर्य नव्हते.
दुपारी मेसला जेवायला गेल्यावर टिव्हीवर जेव्हा ही बातमी बघितली. दहशतवादी रेल्वे स्टेशनवर बेछूट गोळीबार करत होते. लहान मुलांचाही विचार करत नव्हते. त्याचवेळी ताज हॉटेलमध्ये एनडीएची फोर्स चाॅपरमधून उतरत होते. अन दहशतवाद्यांशी दोन हात करत होते. काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर शहीद झाले होते. सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता.

"मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दोन दहशतवादी गाडीतून अंधाधुंद गोळीबार करत होते. नाकाबंदीत गाडीचे टायर फोडल्याने गाडी थांबली होती. पोलीसांनी शरण येण्याची वॉर्निंग दिली तरी गाडीतून उतरून कोणीच खाली येत नव्हते. पोलीसांनी त्या गाडीवर फायरिंग केली. त्यात दहशतवादी ठार झाले समजून पोलीसांनी गाडी घेरली. दहशतवादी मेले समजून दार उघडण्यासाठी तुकाराम ओंबळे पुढे सरसावले. एक दहशतवादी जिवंत होता. एके 47 घेऊन ट्रिगर दाबत अंधाधुंद गोळीबार करण्यासाठी त्याने बंदूक उचलली. ते पाहून त्या दहशतवाद्याशी दोन हात करण्यासाठी सह्याद्रीचा वाघ छाती ठोकून ऊभा ठाकला. ट्रिगर दाबली गेली अन गोळ्या संपेपर्यंत तुकाराम ओंबळे यांच्या छातीवर मोकळी झाली. सह्याद्रीचा वाघ मराठी मातीचा लेख छातीठोकपणे मरणाला सामोरा गेला अन पोलिसांचे प्राण वाचवले. गोळ्या संपल्या अन अलगद तो दहशतवादी पोलिसांच्या हाती जिवंत सापडला. नाव होतं अजमल कसाब. "

टिव्हीवर हा ह्रदयद्रावक व्हिडिओ पाहताना गांभीर्य नसणार्‍या शरीरावरही काटा उभा राहिला. आपसूकच शहीद वीरांना मानवंदना देण्यासाठी हात डोक्यावर गेला. डोळ्यात पाणी ओघाळू लागले.

आजही तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला की कसाबच्या गोळ्या झेलणार्‍या तुकाराम ओंबळेंना सॅल्युट करायला हात उभा रहातो.
कामटे करकरे साळसकर सरांच्या बलिदानाचा अभिमान वाटतो.

आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने ९/११ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.

.
 गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)



एक सलाम पोलीसांना...




 
काल सकाळीचीच काष्टी मधली अपघाताची घटना.
वाघजाई भरधाव निघालेली गाडी शिवनेरी हाॅटेलसमोर दोघांना धडक देऊन निघून गेली होती. दुचाकीवरचे ते दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बघ्याची गर्दी वाढत होती. पण त्या दोन व्यक्तींना उचलून हॉस्पिटलमधे घेऊन जाण्याची हिम्मत होत नव्हती. नुसती एकमेकांना विचारत चर्चा झाडल्या जात होत्या.
त्याचवेळेस रस्त्यावरून एक पोलीस अधिकारी पुण्यात आपली नाईट ड्युटी संपवून आपल्या स्विफ्ट गाडीतून घरी गावाकडे निघालेला होता. हाॅटेलसमोरच्या गर्दीने वाहनांची गती मंदावली होती. गाडीतल्या त्या पोलीस अधिकार्‍याला गर्दी पाहून शंका आलीच. त्या अधिकार्‍याने गर्दीतून वाट काढत आपली गाडी त्या अपघात झाला त्या ठिकाणी घेतली. सुरवातीला गाडी बघून लोक ओरडायला लागले. पण त्यात खाकी वर्दीतला माणूस पाहून गर्दीत शांतता पसरली.
त्या पोलीस अधिकार्‍याने क्षणाचाही विलंब न करता त्या जखमी व्यक्तींना आपल्या गाडीच्या शिटावर बसवले. पण त्या ढीगभर बघ्यांच्या गर्दीतला एकही माणूस मदतीसाठी पुढं आला नाही. जखमींना घेऊन उपचारासाठी गाडी जवळच्याच हॉस्पिटलमधे निघून गेली. बघ्यांची गर्दीही पांगली. जणू काही झालं नव्हतेच.
गाडी हॉस्पिटलच्या दाराशी आली. पोलिस अधिकार्‍याने इमर्जन्सी म्हणताच वाॅर्डबाॅय नर्स पटापट बाहेर धावले. त्या जखमींना अॅडमिट करून घेतले. खुद्द पोलीसच सोबत असल्याने डॉक्टरांनीही आढेवेढे न घेता जखमींना दाखल करून घेतले. जखमी अवस्थेत असलेल्या त्या दोन व्यक्तींना उपचार मिळालेले पाहून पोलीस अधिकार्‍याने गाडी हॉस्पिटलमधून फिरवली. जवळच्या पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देऊन तो अधिकारी आपल्या गावाच्या दिशेने निघून गेला.

सलाम त्या पोलीस अधिकार्‍याला.

ही घटनेवरून आपल्या समाजातून माणूसकी हरवली आहे का असंच वाटतं. अपघात झाला की बघ्यांची गर्दी होती. पण त्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची कोणाचिही इच्छा होत नाही. कारण काय तर ही आपली जबाबदारी नाही. हे आपलं काम नाही. ही आपली ड्युटी नाही. अनेकांना वाटतं की आपढ अपघातात जखमी व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतील. पण कोणालाही वाटत नाही की जखमी व्यक्तीच्या ठिकाणी कोणी आपली व्यक्ती असती तर आपण मदत केली असतीच ना. त्यावेळी अशीच भूमिका बघ्यांनी घेतली अन आपल्या व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाला तर किती राग आला असता. दुःख वाटलं असतं. मग जखमी असणारी व्यक्ती आपलीच आहे समजून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची भावना बघ्यांच्या मनात का येत नाही हीच एक शोकांतिका आहे.
त्याचवेळी पोलीस अधिकार्‍याच्या या कृतीतून आपढ काही बोध घेणार आहोत का.?
आपल्याला समजणार्‍या ड्युटी ड्युटीच्याच भाषेत समजा त्या पोलीस अधिकार्‍याला वाटलं असतं, मी आत्ताच माझी नाईट ड्युटी संपवून घरी चाललोय. दरम्यान रस्त्यावर कुठे अपघात घडला तर मी का पुढे जावं. आता माझ्या ड्युटीचा टाईम नाही म्हणून तो अधिकारी बघ्यांच्या गर्दीतून निघून गेला असता तरी ना बघ्यांना काही फरक पडला असता ना पोलीस अधिकार्‍याला. पण त्या पोलीस अधिकार्‍यात समाजभावना माणूसकी होती. तो पोलीस नंतर अगोदर एक माणूस आहे. भले त्या अंगावरच्या खाकी वर्दीने ती भावना जागी केली. पण त्याने आपल्या कामाची ड्युटी संपवून समाजाचीही ड्युटी व्यवस्थित पार पडली.
त्याचवेळी आपण हे विसरतो की आपणही समाजाचा भाग आहोत अन कधी आपणही साजाप्रती आपली माणूसकीची, बंधूभावाची ड्युटी पार पाडली पाहिजे.
आजच्या 26/11 निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांमधे आजही तोच तुकाराम ओंबळे जिवंत आहे याचीच जाणीव होते. साळसकर, कामटे, करकरे ओंबळे उन्नीकृष्णन शहीद झाले. पण महाराष्ट्रातल्या कोपर्‍याकोपर्‍यात ते जिवंत आहेत.

26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या देशबांधवांना भावपूर्ण आदरांजली.

आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने 9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.

.
.
गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)


बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

अन आमचा देश बदनाम झाला....


ह्याच मुलाखतीमधील एका मनोगताने आमचा देश बदनाम झाला....


                          देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणार्‍या खुन्याला याच देशात बलिदानी, शहीद म्हणून उदोउदो केला जातो. त्याचा जयंती पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
एका खुन्याला देशासाठी लढणार्‍या सैनिक म्हणणे हा देशातील सैनिकांचा अपमान होत नाही का..?
गांधीहत्या घडवणार्‍या व्यक्तीला शहीद म्हणून उदोउदो केल्याने आमच्या देशाची बदनामी नाही होत...
आमच्या देशात एका खुन्यालाही शहीदाचा सन्मान मिळतो ही अभिमानाची गोष्ट आहे. 
.
.
                          १९९३ साली आमच्या देशात बाँबस्फोट घडला अन आमचे देशबांधव मरण पावले. बाँबस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवा म्हणून आमच्या न्यायालयाची दारं सुट्टीच्या दिवशी रात्री उशिराही उघडली जातात ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. कुमार वयात झालेल्या अत्याचाराचा न्याय आमच्या देशातील आजीला वार्धक्यातही मिळत नाही. तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत..
वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायर्‍या चढूनही आम्हाला न्याय मिळत नाही ही गोष्ट आमच्या देशाच्या राजमुकुटात एक मानाचा तुरा रोवतेय...
.
.
                          आमच्या देशात बाँबस्फोट घडला अन आमचे देशबांधव मरण पावले. तरी बॉम्बस्फोट करणारे फाशी देण्याइतके दोषी नाहीत. त्यामुळे त्यांना फाशी दिली जावू नये अशा मागण्या आम्ही ज्यांच्या चित्रपटांना चित्रपटगृहात उत्तम प्रतिसाद देत सुपरस्टार लोकप्रिय केले ते पडद्यावरचे हिरो करतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. उलट आमच्या देशात बॉम्बस्फोट केले. दहशतवादी हल्ले केले तरी आम्हाला तुम्ही दोषी वाटणार नाहीत. काय केलंत आहोत तुम्ही. आमचे फक्त एवढेच देशबांधव मारले. काळजी नका करु आमच्या देशातील बडय़ा हस्ती, सुपरस्टार तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही काही करा वो. नका भिऊ. आहो अशा घटनांनी आमच्या देशाचं बघा जगात किती नाव झालं. आपल्याच देशबांधवांना मारूनही दोषी नसल्याचे प्रमाणपत्र देणारे सुपरस्टार फक्त आमच्या देशात आहेत यासारखी देशाच्या गौरवाची गोष्ट नाही. 
.
.
                          दिल्ली तीन चार वर्षांपूर्वी येथे निर्भया बलात्कार प्रकरण घडले. अशा हजारो निर्भया रोजच अत्याचाराला बळी पडतात. महिला अत्याचाराच्या अशा घटना रोजच घडल्या तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. महिलांवर अत्याचार तर आमच्या देशात नित्याचे आहेत. आमच्या देशबांधवांना त्याची सवय झाली आहे. रोज रोज काय महिला अत्याचार वाढलेत म्हणून कौतुक करुन घ्यायचंय. आमच्या इथं अशा कित्येक निर्भया आहेत. 
.
.
                          आमचा देश कृषिप्रधान. शेती हा निम्म्याहून अधिक लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय. दुष्काळ,  कर्ज, उत्पादित मालाला कवडीमोल भाव यासारख्या गोष्टींनी याच अन्नदात्याच्या आत्महत्या वाढत आहेत. कृषिप्रधान असणाऱ्या आमच्या देशात शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागतात अशा घटना रोजच घडल्या तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. शेतकरी तर आहे तो. काय फरक पडतो आम्हाला तो मेला काय अन जगला काय.? फारतर फार काय होईल अन्नधान्य कमी होईल ना. मागवू की आम्ही शेजारच्या राष्ट्रांकडून. तसंही आम्हाला मॅकडोनाल्ड, मॅगी, केएफसीची सवय झालीच आहे. जगातील कोणत्याही देशातकडे आहे का असा उपाय. आहो चीनकडेही नाही असा लोकसंख्या कमी करण्यासाठी उपाय. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे जगात आम्ही झपाटय़ाने लोकसंख्या कमी करत असल्याने किती नाव काढतात लोक. 
.
.
                          प्रेमप्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे जावईशोध लावून शेतकऱ्याच्या मरणाला कवडीमोल ठरवणारे कृषीमंत्री असतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. शेतकरी आत्महत्या करीत राहिले तर लवकरच आमच्या देशातल्या मंत्र्यांना यासाठी नोबेल पारितोषिक मिळेल.
.
.
                          आमच्या देशात दलित बहुजन वर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. आमच्या दलित बांधवांना आमच्या देशातील उच्च वर्णीय जाळून मारतात. (खैरलांजी) समाजातील बहिष्कार तर पूर्वापार चालत आलेला आहेच. तरी मधे काही प्रमाणात तो थांबला होता पण आता पुन्हा सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार होतंच आहे. आमच्या देशात दलित अत्याचाराच्या घटना रोजच घडतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. दलित अत्याचाराच्या घटनांनी आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फोकस रहातो. सामाजिक बहिष्कार कसा टाकायचा याचे धडे घ्यायला अनेक विदेशी नागरिक आमच्या देशात येतात ही किती अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या लक्षात नाही यायची पण हे खरं आहे. .
.
                          आम्ही सर्व भारतीय या देशाचे नागरिक आहोत. आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी देशाच्या सरकारमधे मंत्री म्हणून स्वतःला मिरवतात. तेच मंत्री आमच्यावर कधी अन्याय झाला अत्याचार झाला तर आमची तुलना प्राण्याशी करतात.
"रास्ते मैं कही कुत्ते मरे तो भी बवाल कर के हम को पुछोगे क्या.?" (हरियाणा राज्यातील दलित हत्याकांड)
                          भारतात भारतीयांना कुत्र्याची वागणूक देणारे मंत्री असले तर तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. कशी बदनामी होणार जगात प्राण्याला मतदानाचा अधिकार देणारे एकमेव राष्ट्र आहे आमचं. काय करणार आहो आमच्या देशातील बहुसंख्य देशबांधवांना मेंदू नाहीत बहुतेक. अनेक खुनी, लुटारू, घोटाळेबाज, अत्याचारी माणसं आम्ही खुन, लूट करणे, अत्याचार करणे यासारख्या विविध गुन्हांकरीता शिक्षा कायदे करण्यासाठी निवडून देतो. सत्ताधारी बनवतो. आणि त्यांचा अन्याय सहन करतो. कारण आमची कातडी गेंड्याची आहेत हो. हा गेंड्याचाही अपमान आहे की त्याच्या कातड्यापेक्षाही आमची कातडी मजबूत आहेत. आता आम्हाला नव्हते माहीती की हे काताडे कुत्र्याचे आहे. बरं झालं आमच्या मंत्री महोदयांना समजले. यासाठी त्यांना रेमन मॅगसेसे किंवा ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे. हो कारण त्यामुळे आमच्या देशाची प्रतिमा जगात चांगल्याहून उत्तम झाली आहे. 
.
.
                          आमच्या देशाच्या केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार आमच्या देशात मागील वर्षी ऑक्टोबर पाचशेच्या आसपास धार्मिक दंगलींची संख्या होती. ती यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहाशेचा पल्ला ओलांडून पुढे गेली आहे. धार्मिक दंगली वाढल्यानेही आमच्या देशाची बदनामी नाही होत. किती अभिमानाची गोष्ट आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांपैकी एक असणार्‍या आमच्या राष्ट्राला ऑलिंपिक मधे बळच एखादं सुवर्णपदक मिळतं. आता धार्मिक दंगलीच्या प्रकारात आमच्या देश एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड करत पदकांची लयलूट करत आहे या गोष्टीने आम्ही तमाम देशप्रेमींची छाती गर्वाने फुलली आहे. अशा प्रकारे आमच्या देशाचं नाव रोशन होताना पाहून डोळ्यातून पाणी आलं पार....
.
.
                          पण गेल्या काही दिवसांपासून मलाही जरा भिती जाणवायला लागली आहे. यावर मी पत्नीशी चर्चा केली. त्यावर तिचं म्हणणं होतं की आपण दोघे तर येथेच वाढलो. पण आजकालच्या वातावरणातून मला माझ्या मुलाच्या सुरक्षितीतेचीच भिती वाटते आहे. मला वाटतं आपण परदेशात जाऊन स्थानिक व्हावं. या वाक्यातून आमचा देश बदनाम झाला. आमच्या देशाच्या या बदनामीचं आम्हाला दुःख आहे. एका आईने आपली काळजी बोलावून दाखवली अन आमचा देश बदनाम झाला. आमच्या देशाच्या या बदनामीचं आम्हाला दुःख आहे.
कारण ही आमची मानसिकता आहे...
आम्हाला मनंही आहे हे आत्ता कळलं. 
कुत्र्यांनाही मन असतं....

गणेश दादा शितोळे 
(२५ नोव्हेंबर २०१५)


मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

मैत्रीची अणूसंज्ञा....
 
मोदी आणि मार्क झुगेरबर्ग यांच्या भेटीनंतर डिजिटल इंडियाला पाठिंबा दर्शवत फेसबुकवर प्रोफाईल पिक्चर डिजिटल इंडियाच्या नेटवर्क पिक्चरचा वाॅटरमार्कसह दिसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तेव्हा भरपूर नोटीफिकेशन यायचे. प्रोफाईल पिक्चर चेंज केल्याचे...ते बदलेले प्रोफाईल पिक्चर पाहून अनेकदा मनात आलं की यावरून आपल्याला काहीतरी सूचणार. त्या नेटवर्किंग शेलवरून आपण लिहिणार अन त्याच विचारातून आला हा लेख....


FRIENDSHIP IS ANALOGUES WITH ATOM...

मैत्री फ्रेन्डशीप नुसतं नाव घेतलं तरी मनाला आधार देणारं कुणीतरी आहे असंच वाटतं. ही मैत्री ही फ्रेन्डशीप आयुष्यभर टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे असं नातं आहे की जे रक्ताच्या नात्याहून अधिक प्रिय असते. हवेहवेसे वाटणारे भासते.

खरंतर या नात्याला मैत्री म्हणतात याची ओळख होती ती आपल्या शाळेत. त्याअगोदरही आपले अनेक मित्र असतातच पण तरीही मित्र म्हणजे नेमकं काय..? मैत्री म्हणजे काय..? हे शाळेत गेल्यावरच कळतं. शाळेत गेल्यावर म्हणजे शाळेत शिकवतात असं नाही. पण शाळेत पहिल्यांदा आपली नवीन मित्रांशी भेट होती. काही दिवसांनी ओळख, मग काही दिवसांनी सहवास वाढला की त्या सहवासातून मैत्री या नव्या नात्याचा अनुभव येतो.

पुढे हळूहळू शाळेतून हायस्कूल, मग काॅलेज, मग पुढेचे शिक्षण घेत बदलत जाणारी काॅलेजस असा हळूहळू हा प्रवास वाढत जातो. या प्रवासासोबतच आपल्याला येणारा मैत्रीचा अनुभव वाढत जातो अन आयुष्यात मित्रमैत्रीणी असा एक वेगळा परिवारच जोडला जातो. शाळा ते काॅलेज ते पुढे आपलं करीअर करताना आयुष्यात अनेक माणसं भेटतात. त्यातलीच काहींशी आपली मैत्री होते. अन त्यातूनच ही हक्काची माणसं असणारा मित्र परिवार जमतो.
एकंदरीत या वरील लिखाणातून मैत्रीच्या नात्याबद्दल काय कळतं..?
आजच्या विज्ञानावादी युगात कधी विचार केला आहे का की आपली मैत्री अन विज्ञान याचा काही संबंध असेल का...?
नाही केला कधी विचार. कसला विचार करताय, तुमच्या डोक्यातही असं यायचं नाही. पण हे खरं आहे. मैत्रीचीही एक वेगळीच अणूसंज्ञा असते. तुम्ही म्हणाल काही सांगतो पण हो मैत्रीच्या नात्याची संरचना एका अणू सारखी असते. आपण स्वतः या नात्यातला न्यूट्रॉन असतो. आपले मित्रमैत्रीणींबाबतीत असणारे विचार म्हणजे प्रोटॉन असतात. मग इलेक्ट्रॉन कोण...?
तर आपल्या ह्या मित्रमैत्रीणी, हा परिवार म्हणजे इलेक्ट्रॉन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अणूला क्रियाशील करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं वॅलेन्स इलेक्ट्रॉन असतं आपलं मन. कधी अन कुठेही धाव घेणारं. प्रत्येक वेळी आपल्याला पुर्णतः यावी म्हणून नवीन काही शोधणारं.

आपली लहानपण ते मोठेपणापर्यंत नवीन मित्र जोडण्याचे काही टप्पे आहेत. पहिला म्हणजे आपण उभा राहून खेळायला सुरुवात केली तेव्हा आपल्या सोबत खेळणारे आपले पहिले मित्र. आपल्या भाषेत लंगोटी यार. पुढे आपली शाळा, काॅलेज, क्लासेस, कंपनी अशा विविध ठिकाणी आपल्याला नवीन मित्र परिवार जोडला जातो. प्रत्येक वेळी आपण म्हणतो अमुक माझा मित्र तमुक माझा मित्र. असे करत करत ही यादी वाढत जाते. माझी आई कायम म्हणते काय लावलंय सारखं अमक्या मित्राकडं जायचंय, तमक्या मित्राला भेटायचंय...पायलीचे पन्नास मित्र आहेत तुला..
कोणी चार दो चांगले मित्र असावेत बाकी कशाला...?
आईच्या या म्हणण्याला एकदा मी विचार केला. तेव्हा लक्षात आलं आणि मी जे म्हणातोय ना तसं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपलं हे मनं ते काम करायला सुरू झालं. प्रत्येक मित्राचा चेहरा डोळ्यासमोर उभा करायचा अन विचार सुरू. यात काय चांगले आहे..? याबरोबर आपलं जमतंय का..? कोण कसा वागतो बोलतो.? कोण कसा आहे..? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. अमुक चांगला आहे ना. मग हा पहिल्या यादीत. या बरोबर आपला फारसं संबंध आला नाही. पण आपलं जमू शकतं. मग हा नंतरच्या यादीत. असं करत करत शेवटी ही यादी वाढतंच गेली. हे शाळेतले चार पाच मित्र, हे काॅलेजमधले हे इथले अन हे तिथले आहेत असं होतं. यातून नेमकं काय होतं तर कोण आपल्या जवळचं आहे कोण दूरचं लक्षात येत.
आपल्या मनाचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकेक करत अमुक एक आपला मित्र झाला ना तर आपण परफेक्ट होऊ शकतो. त्याच्यातला अमुक गुण घेता येईल. मग आपण मित्र परिवाराचं आपल्या पॅरामिटरने कंपॅरिझन करतो अन ठरवतो. आमुक मला जवळचा मित्र आहे. तमुक माझा जरा लांबच रहणारा मित्र. हे असं जवळ लांब करत आपण मैत्री या काॅमन शब्दांखाली एकत्र जमवलेला परिवार विविध कक्षेत विभागाला जातो. अगदी अणूला जश्या कक्षा असतात तशाच. आपलं मन हे मग पहिल्या जवळच्या कक्षेशी संपर्क ठेवून रहातं. अन हळूहळू बाकी मित्र दूरवले जातात. दूरवले म्हणण्यापेक्षा ते दूरच्या कक्षेत फिरत असतात.
अणू आणि मैत्री यांच्या या कक्षांत मात्र बदल आहे. अणू सारखी मैत्रीच्या कक्षा स्थिर फिक्स नसतात. त्या इतक्या लवचिक असतात की या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे मित्रांची संख्या कधीही कमीजास्त होत रहाते. कोण कधी कोणत्या जवळ लांबच्या कक्षेत येईल अन कोण दूर होईल सांगता येत नाही. तर ही आहे अशी मैत्रीची अणूसंज्ञा.

आपण कितीही ठरवलं की मैत्री मधे कोण जवळचा कोण लांबचा असा नसतो. कोण लहान कोण मोठा असा नसतो तरी मैत्रीच्या नात्यात ते तसं असतं. मीही ठरवलं होतं की मला सगळे सारखेच आहेत. पण हळूहळू मीही भरकटत गेलो. आणि त्यातूनच मग मित्रातही एक वेगळा ग्रुप असं होत गेलं.

डिप्लोमा काॅलेजमधे मी मेकॅनिकलचा असल्याने आमचा मेक मेक असा मित्रांचा ग्रुप होता. तेव्हा आम्ही सर्व जण मैत्रीच्या एकाच कक्षेत होतो. मग त्यातही आमचा हाॅस्टेलच्या मुलांचा वेगळा ग्रुप झाला. म्हणजे इतरांच्या तुलनेत हाॅस्टेलचे मित्र जवळचे झाले. पुढे हाॅस्टेलच्याही आमच्या मित्रालांमधे ग्रुप झाले. क्रिकेट खेळणारे अन न खेळणारे. खेळणारे माझे जास्त क्लोज फ्रेण्ड झाले.
एक दीड वर्ष हे असंच राहिलं. हळूहळू इतर ब्रॅण्चसोबत ओळख झाली. मैत्री झाली. मग हाॅस्टेलच्या मेकॅनिकलच्या ग्रुपसोबतच काँप्युटरच्याही ग्रुपमध्ये आऊट ऑफ ब्रॅन्च सदस्य झालो. त्यातही मग काही चार पाच मित्रांसोबत आमचा वेगळा ग्रुप झाला. म्हणजे मला इतर सर्व मित्रांपेक्षा जवळचे मित्र झाले. त्यांचाही काॅलेजमधे मुलामुलींचा एकत्र ग्रुप होता. त्या सर्वांसोबत मैत्री झाल्यावर ते सर्व एका नव्या कक्षेत माझे जवळचे मित्रमैत्रीण झाले. या प्रवासात डिप्लोमा काॅलेज संपले...

जसा प्रत्येक अणू वेगळा असतो तशीच प्रत्येकाची मैत्री वेगळी असते. मी ज्या मित्रमैत्रीणींना माझ्या जवळचे मानत होतो म्हणजे ते माझ्या पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन होते. पण त्यांची मैत्री तिची अणू संज्ञा वेगळी होती. त्यांच्या दृष्टीने मी त्यांच्या दूरवरच्या कक्षेत होतो. परिणामी आम्ही एकत्र होतो तरी मी कधीही त्यांच्या ग्रुपचा भाग होऊ शकलो नाही. पण ते सर्व जण माझ्या ग्रुपमध्ये होते.
काॅलेज संपलं. नवीन अॅडमिशन. इंजिनियरींगचं नवीन कॉलेज. नवीन काॅलेजसोबत नवीन मित्र भेटत गेले. जुन्या मित्रांची जागा नवीन मित्रांनी घेतली. मैत्रीच्या कक्षा बदलल्या. या पहिल्या कक्षेत डिप्लोमाच्या मित्रमैत्रीणींसोबत नवीन भर पडली. प्रत्येक सेमिस्टरमधे जसं नवनवीन शिकत गेलो तसे नवीन मित्र भेटत गेले. त्यांची पहिल्या कक्षेत ये जा सुरू राहिली. गॅदरींगच्या काळात याच पहिल्या कक्षेत इतकी गर्दी झाली की माझं मलाही कळले नाही.

काॅलेज संपले. सोबत ही गर्दीही कमी होत गेली. अनेकदा असं घडलं की खूप दिवसांनी एखाद्या मित्राचा फोन आला की ती पहिली कक्षा पुन्हा क्रियाशील होते. डिप्लोमा काॅलेजनंतर अनेक दिवसांनी अचानक एके दिवशी दोन मित्र भेटायला आले. खुप बरं वाटलं. त्यादिवसापासून त्यांचीही त्या जवळच्या कक्षेत भर पडली. नुकतेच एका मित्राने कविता लेख आवडतात हवेत म्हणून मेसेजेस केला. डिप्लोमा नंतर बर्‍याच दिवसांनी. आनंद झाला. तोही आता जवळचा वाटतो. असे अनेकदा घडले. ही अशी नव्याने भेटणारी जूनीच माणसं माझ्या जवळच्या कक्षेत येतात. ती हक्काची आहेत. पण मी कुठेय...? मी त्यांच्या एका कक्षेत हरवून गेलेला आहे बहुतेक. पण काही जे पाय रोऊन राहिले ते आजही माझ्या पहिल्या कक्षेत तसेच आहेत. हो पण मी त्यांच्या कोणत्या कक्षेत आहे माहीत नाही. अनेकदा मला म्हणतात की तू जवळ आहे. पण मला तसं कधी जाणवलं नाही. म्हणूनच की काय आजवर मला विश्वासाने कोणी सांगितले नाही की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. जवळचा मित्र आहे.

म्हणून हे मन हा व्हॅलंस इलेक्ट्रॉन अजूनही भिरभिरत आहे. शोधत आहे. तो पर्यंत ज्यांना मी आपलं मानलंय अशा मित्रांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या आठवणींसह मी जगतोय....
एकटाच मी एकटाच आयुष्याची पाऊलवाट चालतो आहे....

गणेश दादा शितोळे
(२४ नोव्हेंबर २०१५)



सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५








अर्थ नात्यांचा....




नाती. नाती नेहमीसारखाच एक शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामवला जातो. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.

कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. प्रत्यक्षात भेट नंतर झाली तरी हा दैवी योगायोग आहे अजूनही मानला जातो. आपल्या भेटी झाल्या, सहवास वाढला की त्या त्यावेळी येणार्‍या प्रत्येक अनुभवावरून एकमेकांच्या स्वभावाचे न उलगडलेले अनेक कांगोरे समजतात. अन हे सर्व लक्षात आलं की नात्यातलं "पुढचंपाऊल" टाकलं जातं. दोन चार भेटी अन ओळख संपून नात्यातला "मैत्री" नावाचा एक नवीन पल्ला गाठला जातो.

हळूहळू हे नवलाईचे हवहवेसे मैत्रीतले दिवस अगदी आनंदात जातात. एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जातात. स्वभावातला सालसपणा, अबोलपणा, समजावून घेत मैत्रीच्या स्टेशनवर गाडी रेंगाळत राहते. नात्यातले समज गैरसमज जाणवायला लागतात. आपण कसे एकमेकांसाठी "मेडफॉरइचऑदर" आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते. एकमेकांना समजून घ्यायला जो वेळ लागतो तो या मैत्रीच्या टप्प्यात पुर्ण मिळाला की प्रत्येक बाबतीत अनुरूपता येते अन नात्याचा एक नवीन पदर वाट बघत असतो. "प्रेम". बरेच दिवस मैत्रीच्या स्टेशनावर रेंगाळलेली गाडी मग प्रेमाच्या मार्गावर धावू लागते.

मैत्रीची गाडी प्रेमाच्या मार्गाने धावते तोपर्यंत सगळं मनासारखं आनंदी आनंद वाटतं. पण काही काळाने जेव्हा ही गाडी थांबते तेव्हा जणू आयुष्यच थांबल्याचाही भास होतो. पण हे असं का होतं. ?
कारण खुप साधं सोपं आहे. गाडी धावायला तिची दोन्ही चाकं पळायला हवी असतात. पण कधी कधी एक चाक मैत्री च्या स्टेशनवर अडकून पडलेले असते अन दुसर्‍याला तर पुढे जायची घाई असते. अन मग ही प्रेमाची गाडी मधेच थांबते. अशा अवेळी थांबलेल्या गाडीचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नात्यात प्रत्येक वेळी नव्याने पदर उलगडताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या पेक्षा आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे ही गाडी सुसाट वेगाने धावलीच म्हणून समजा.

काहीवेळा असंही होतं की ही गाडी प्रेमाच्या मार्गावर चालली आहे अन ही गोष्ट दोघांना माहिती आहे तरी एखादा पार्टनर ते माहित नसल्याचा आव आणतो. खरंतर मनातून त्याचं समोरच्या व्यक्तीवर प्रेम असतं. पण प्रत्येक वेळी तो ते दाखवण्याचं टाळतो.
असंच काहीसं माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत झालं होतं. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे दोघांनाही माहिती होतं. पण ती नेहमी त्याला ते प्रेम नसल्याचं दाखवायची. त्यानं त्याबतीत काही बोललं तरी तिच्या उलट्या बोंबाच. सगळा दोष त्या बिचार्‍याच्या माथी.

या अशा परिस्थितीने पुढे काय होणार आहे याचा त्या दोघांना कदाचित अंदाजही नसतो. प्रत्येक वेळी असंच घडत राहिले की नात्यात हळूहळू गैरसमज वाढायला सुरवात होते. नेहमीच्या संवादात आता वाद येऊ लागतात. वाद वाढले की भांडणं होतात अन पुढे इतके दिवस नात्यातले गुंफलेले विश्वासाचे रेशमी दोर सूटू लागतात. परिणाम शेवटी एकच. नात्याचा शेवट. हे म्हणजे कसं झालं की आपल्याच नात्याचा आपणच खुन करणे. आपल्या पायवर धोंडा मारून घेणे.

प्रत्येक वेळी आपण जे समजत असतो ना "मेड फॉर इच अदर", तसं प्रत्यक्षात कोणतेच कपल्स खर्‍या अर्थाने "मेड फॉर इच अदर" नसतंच. अनेकदा ती बोलकी असते तर तो अबोल. ती फटकळ तर तो समंजस. त्याला संगीताची आवड तर तीला एकही गाणं ऐकायला आवडत नाही. अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

आपण एकत्र असलो, आपले नाते एका नव्या उंबरठ्यावर असलं तरी आपल्यात म्हणजे दोघांतही सगळ्याच गोष्टी एकच असतील असं काही नसतं. आणि ते असावंही. नाहीतर कधी असं होतं आपल्यात खूप साम्य होतं अन मग काहीदिवसांनी मित्र परिवार शेजारी यांच्या कडून ऐकायला मिळतं की "हाकायजोरूकागुलाम", "हा बघा सगळं तिचंच ऐकतो. " हो असं नक्की घडतं. तुम्हाला वाटत नसलं तरी. कारण आपलं आयुष्य वेगळं आहे. आपण एकमेकांच्या आयुष्यात सहभागी असलो तरी प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावं लागतंच. म्हणून आपल्या दोघांमध्ये भिन्नता असेल तर चांगलेच आहे. या भिन्न गुणधर्मांमुळे एकमेकांना समजून घेण्याची क्षमता, सहन करण्याची पात्रता येत जाते. कधीकधी समोरच्या व्यक्तीकरीता आपल्या अपेक्षांना मुरड घालता आली की याच भिन्न गुणधर्मांचा नात्याचा सुरेख धागा विनला जातो.

"GreatRelationships Are NeverBecome,
When PerfectPeople Are Come Together....
It is Become When Two ImperfectPeople Learn To Enjoy Each Other'sDifferences."

"नाती तेव्हा कधीच उत्तम बनत नाहीत जेव्हा योग्य माणसं एकत्र येतात.
नाती तेव्हाच उत्तम बनतात जेव्हा भिन्न माणसं एकमेकांच्या वेविध्याचा आनंद घ्यायला शिकतात."

नाती जपण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद. नात्यात संवाद असावा अन सोबत वादही. हो नात्यात वाद भांडणं ही हवीतच. तुम्हाला हा प्रश्न छळत असेल की हा असं काय बोलतोय. पण हो हे खरं आहे ही भांडणं हा वाद असावा, पण एका मर्यादेत. आपण हे गृहीत धरतो की मला असं वाटतंय ना मग त्याला पण असंच वाटलं पाहिजे. कारण नात्यातील दोन व्यक्तींची वेगळी मतं वेगळा दृष्टीकोन असला की वाद होणारच. भांडणंही होणारच. एखाद्या गोष्टीच्या अनेक बाजू असू शकतात. एखादी बाजू पटेल एखादी खटकेलही. प्रत्येक बाबतीत मत पटायलाच हवं असं नसतं. नायतर संपलंच की सगळं. नात्यात संवाद असला की याच प्रत्येक वादविवादातून, भांडणातून नातं अधिक खुलून जातं. एखाद्या चेहराखुललेल्यानिरागसमुली सारखं. या भांडणात आपण कितीही चिडलो रागवलो तरी ते आपल्या भल्यासाठी आहे याची जाणीव असते. त्यामुळे एकमेकांवर अविश्वासाचा संशयही मनात येत नाही..

तिचा मुड बरा नाही, तिला उदास वाटतंय. भांडा तिच्याशी कोणत्याही विषयावर. असंच। काही वेळानं तिलाही जाणवेल आपढ उगाच भांडतोय. त्यानंतर बघा सुंदर स्मितहास्य येईल. त्या हास्यासाठी तरी भांडत जा. पण तेही मर्यादेत.

नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे विश्वास. एकमेकांवरचा विश्वास. एकमेकांवर विश्वास आहे ना मग जगातली कोणतीही ताकद तुमच्या नात्याला तोडू शकत नाही. अगदी कितीही मोठा घाव घातला तरी. पण कधीतरी आपल्या कडून नकळतपणे आपल्या पार्टनरवर अविश्वासाची भावना व्यक्त होऊ लागते. म्हणजे कसं काहीवेळा आपलं इन्टेशन तसं म्हणायचं नसलं तरी त्याचा अर्थ तसा जावू शकतो.

त्याग- सॅक्रिफाईस. खरंतर हा शब्द खूप मोठा आहे. पण रिलेशनशीप मधे असणारी माणसं सारखा वापरत असतात. काही झालं की मी अमूक त्याग केला अमक्या साठी अमूक सॅक्रिफाईस केलं. वारंवार आपल्या पार्टनर वर अशा मोठ्या शब्दाचा भडिमार केला जातो. पण खरंतर यातून अविश्वासाची भावना व्यक्त केली जात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या हातून सॅक्रिफाईस नावाच्या गाण्याने आपला जोडीदार दुखावला असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे. सर्वात मोठी यासाठी की आपल्या हातून चूक झाली हे जाणवतंही नाही.

सॅक्रिफाईस च्या तुणतुणं म्हणजे अविश्वास हे म्हणजे कसं. ?
हे असं की आपण रिलेशनशीप मधे आहोत, अन आपण काही झालं की आपल्या पार्टनरला म्हणतो की मी आपल्या नात्यासाठी अमकं सॅक्रिफाईस केलं, तमकं सॅक्रिफाईस केलं, हा त्याग केला. तेव्हा खरंतर हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या जोडीदाराला माहिती आहे की आपण आपल्या नात्याला जपण्यासाठी काय केलंय अन काय करतोय. प्रत्येक वेळी सॅक्रिफाईस म्हणून आपल्या जोडीदारावर हा अविश्वास दाखवला जातो की, "हे बघ, तूझं तर प्रत्येक वेळी असंच असतं. पण प्रत्येक वेळी आपलं नातं टिकवण्यासाठी मीच सॅक्रिफाईस करतेय, " करतेय यासाठी खास की ही गोष्ट मुलींच्या बाबतीत अधिक होते. म्हणजे बहुतेकदा मुलीच सॅक्रिफाईस नावचं गाणं म्हणतात. आपण लक्षात घेतले पाहिजे की टाळी एका हाताने वाजत नाही. तर दोन्ही हात वापरावे लागतात. तसंच नात्याचं आहे. नातं जपण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाला पाहिजे. नुसते सॅक्रिफाईस नावचं तुणतुणं वाजवून उपयोग नाही. आपल्या हातून नकळत ही चूक झाली आणि आपल्या जोडीदाराचे मन दुखावले असल्यास आपल्याला जाणवलं की ताबडतोब माफी मागितली पाहिजे आणि नात्यातला हा अविश्वासाचाढग दूर केला पाहिजे.

कधीकधी काय होतं आपण रिलेशनशीप मधे आहोत हे समजतं. नात्यातले नऊ दिवस संपले की एकमेकांचे स्वभाव समजतात. काही गोष्टी जशा आवडतात तशा काही बोचतातही. अगदी किरकोळ गोष्टी खटकतात. अन मग चिडचिड होते. आपण म्हणत जरी असलो की आता आम्ही एका जीवाचे झालो म्हणजे आपण एक होत नसतो. दोघांनाही वेगळेपण आहे. कदाचित दोघांची मनं एक झाली असतील. भावना जुळल्या असतील. पण म्हणून एकच आहोत म्हणणं चूक आहे. प्रत्येकाला आपापली मतं असतात. आपल्या आवडी निवडी सवयी असतात. त्याचा समोरच्या व्यक्तीने आदर ठेवला पाहिजे. उगाच हे आवडत नाही ते खटकले म्हणून प्रत्येक वेळी दुसर्‍याला दोष देणे चुकीचं आहे. मला हवं तसं समोरच्या व्यक्तीनं वागावं म्हणजेच प्रेम हा समज जरा डोक्यातून काढता आला पाहिजे.


नात्याचे विविध कंगोरे उलगडताना आपल्याला नाती मॅनेज करता आली पाहिजेत. जसं प्रत्येक गोष्ट सक्सेस होण्यासाठी कोणी मॅनेजर हवा असतो. तसाच आपली नाती चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी आपल्यात नात्याचं मॅनेजमेंट आणि मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे. कोणत्याही नात्यात मग ते कोणत्याही दोन व्यक्तींमधलं असो. दोघांनीही एकमेकांच्या स्वभावाचे पैलू समजून घेतले की नाती आपोआप सांभाळली जातात. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दोघांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो हे मान्य करा.

प्रत्येक नाते एकमेकांमधे कितीही मिसळून गेले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र असतेच. हे मान्य करून आपण नात्यात पझेसिव्हपणा न ठेवता एकमेकांना हवी असणारी "स्पेस" दिली पाहिजे. नाती घट्ट करण्यासाठी हीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही स्पेसही एका प्रमाणात देण्यात आली पाहिजे. म्हणजे आपढ रिलेशनशीप मधे आहोत पण एकमेकांच्या आयुष्यात काय घडतंय हे माहीत न करून घेणेही घातकच आहे. नाती टिकवण्यासाठी स्पेस हवी. पण तिचा अतिरेकही नको नाहीतर फुकटचा "का रे दुरवा येतो."

नात्यात समतोल साधणे महत्त्वाचे असते. एकमेकांच्या आयुष्यात नको इतकंही लक्ष घालणं चूक आहे. भविष्यात आपण एकत्र येणार आहोत म्हणून प्रत्येक खासगी गोष्ट माहितीच हवी हा आग्रहही चूकीचाच. एकमेकांमधे लक्ष घालणे अन एकमेकांना स्पेस देणे याचा समतोल साधला की नाती अधिक घट्ट होतात.

आजपर्यंतच्या आयुष्यात झाल्या असतील काही नकळत चूका तर एकदा त्या मनाचा मोठेपणा दाखवत मान्य करा.
आपल्या अविश्वासाच्या घावाने तूटले असेल नाते तर एक विश्वासाचीफुंकर घाला.
सॅक्रिफाईस, त्याग या गोष्टी मोठ्या आहेत. तिथपर्यंत पोहण्यासाठी अवकाश आहे. उगाच आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवू नका.
नात्तातला नाटकीपणा संपवून नात्यात वास्तविकतेत अन खरेपणानं जगा.
नात्यात परस्परांना स्पेस द्यायला शिकत विश्वास आपुलकी प्रेम अन व्यक्तीस्वातंत्र्य यांचा समतोल साधत नात्यांचा हा खरा अर्थ समजावून घेतला की बघा एका उत्तम नत्याची वीण कशी आपोआपच गुंफली जाते.
नाती टिकावणं अन निभावणं खरंतर हा खूप अवघड प्रश्न आहे. पण काही सोप्या गोष्टी असतात की ज्यांचा आपण नीट विचार केला की नात्याचे अंतरंग आणि त्या अंतरंगाल्या प्रत्येक रंगातली उर्जा कायम तशीच रहायला मदत होते. या नात्याच्या जुळून आलेल्या रेशमगाठी घट्ट झाल्या म्हणून समजाच....

धन्यवाद.




गणेश दादा शितोळे
(२३ नोव्हेंबर २०१५)



शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

लेखकाचं शब्दांना पत्र

शब्दा, तू मित्र ना रे माझा...!
तरी मला हे असं करायला सांगतो आहेस. काय तर म्हणे
"ही माणसं लय डेंजर आहेत."
हो असतील डेंजर. डेंजर नाही तुला धोकादायक दगाबाज म्हणायचं असेल बहुतेक. पण म्हणून कोणाकडूनही बळजबरीने काही करून घेऊ शकत नाहीत.

नाही, नाही लिहीणार मी. लिहिणे ही माझी कला आहे, अन त्या कलेचा अपमान करत असेल तर मी तो मुळीच सहन करू शकत नाही. मी का विकलं जावं कोणाला. माझाही स्वाभिमान आहे. ही कला आजवर मी जपली. त्या सोबत मी जगलो. आयुष्यातला प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात ही कलाच एकमेव माझ्या सोबत होती. आणि आज तिला दोन रूपड्यासाठी विकून कोणाची हांजी हांजी नाही करू शकत मी.

अरे ज्या माणसाला लिहिण्यातली बाराखडी कळत नाही तो मला चॅलेंज देतो अन तेही ही असं अभद्र स्वत्वाचा उदोउदो करणारं. ना त्याला अर्थ आहे ना माझ्या आयुष्यात स्थान.

चालत आलं असेल आजवर पण मानत नाही. त्याच्या खरेपणावरच मला शशांकता आहे. पण मला ते पटत नाही. तू म्हणतोस की मी पटवून घेत नाही. पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मला पटावीच असंही नाही. आणि हो मला जे पटतं तेच मी लिहितो अन लिहीणार. उगाच कोणाच्या आनंदासाठी भलत्याच गोष्टींचा उदोउदो करायला मला कधी जमलं नाही अन जमणारही नाही. मी आहे हा असा आहे. कोणाला पटो ना पटो.

शब्दा, मित्र मानत होतो ना मी तुला. पण तूही त्याही माणसांसारखाच निघाला का रे...?

माझ्या चांगल्या वाईट गोष्टीत आधार देणारा सखाहोता तू. पण आज त्या मैत्रीला सुरूंग लावला तू. अरे काय करतील ते. फार तर फार जीव घेतील ना. घेऊ दे ना अरे काय उपयोग या अशा जीवाचा. जो दुसर्‍याच्या काय पण स्वतःच्याही उपयोगी पडत नाही.
तू म्हणशील काय फरक पडतो आपल्यात थोडा बदल करायला. एखाद्याचं गुणगान गायल्याने आपलं भलं होत असेल तर काय हरकत आहे.

अरे पण माझी बदलाला कधी हरकत नव्हतीच. पण तो असा असेल हे अपेक्षित नव्हते. लिखाण हा माझा छंद आहे. आवड आहे. व्यवसाय नव्हे. व्यापारनव्हे. मी लिहितो त्या माझ्या मनातल्या कोपर्‍यात साठवलेल्या भावना असतात. त्या मी उतरवत असतो. आणि हे तुला चांगलेच माहित आहे. माझ्या भावनांचाव्यापार करणे मला शक्यनाही. आणि जे माझ्या मनातच नाही ते मी कसं लिहायचं. तूच सांग.

कोणीही यावं अन सांगाव तुम्ही जा लिहिता ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही हे असं लिहा.

अरे पण प्रश्न असा आहे की मुळात यांची मान्यता घ्यायला गेलंयच कोण.? तुम्हाला काय वाटते हा तुमचा प्रश्न आहे. मला जे वाटतं, जसं वाटतं ते तसं मी लिहीतो. तुमच्या भावना दुखावतातो कशा. मला वाटलं मी हसलो दुखल्या तुमच्या भावना. तुमच्याभावनादुखावल्याजातील म्हणून आम्ही आमच्याभावनांनामुरडघालावी हे कदापि शक्यनाही. निदान मला तरी नाही जमणार. शेवटी कोणाला काय करायचं असेल ते करावं. मरणाला मी कधीच घाबरत नाही. मी ज्या दिवशी जन्मालाआलोत्यादिवशीठरलंय की मीमरणारआहे. त्यामुळे घाबरून उपयोग नाही. शब्दा हे तुलाही माहीत आहेच मी कसा आहे ते. जीवन आयुष्य या बाबतीत माझी मतं तुला माहिती आहेतच.

शेवटी काय आपलं जीवन ?
कोण आपण ?
कुणीही यावं टपली मारून जावं म्हणजेच का आपलं आयुष्य. जणू आपल्या आयुष्याला किंमतच नाही. नक्की काय करतो आपण ?
याच्या त्याच्या पैशावर खायचं प्यायचं अन जगायचं. हे असलं आयुष्य आपलं. दुसर्‍याला कशाला आपल्यालाच आपल्या आयुष्याची किंमत नाही. त्यामुळे कसंही जगतो. आपला जन्म होऊन पंचविशी ओलांडून पुढे गेली तरी आपण गाढ झोपेत आहोत. ना भविष्याची फिकीर ना वर्तमानाची चिंता. रोजच्या रहाटगाडग्यात जगतोय नुसतं ढिम्म बनून.

अरे आपल्या स्वप्नांनाहीगंजचढलाआहे. त्यामुळेच आजकालच्या साखरझोपेतही आपल्याला स्वप्न पडत नाहीत. जणू त्यांनीही आपल्यावर बहिष्कार घातला आहे.
काय करणार बिचारी ती. आहोतच आपण असे. स्वप्नही म्हणत असतील की अरे काय आपण कोणाच्या झोपेत येऊन करायचंय. या माणसाला आयुष्यात काही ध्येयच नाही तर मग याला स्वप्न पडून उपयोग काय. ती कधीच पूर्ण होणार नाहीत अन हाही प्रयत्न करणार नाही. मग आपण का उगाच त्याला स्वप्न रंजन करायचं.

हो हे असंच आहे आपलं आयुष्य. काय फरक पडतो का आपल्याला दिवस उगवण्या मावळण्याचा. उत्तर एकच. नाही. का ? कारण आपण आपल्या रोजच्या रूटीनमधे एवढं गुरफटून गेलो आहे की काही फरक नाही. रोज तेच तेच. सवयच झाली आहे. मन मारून जगायची.

मृत्यू सोडून फिकीर उरलीयच कशाची की आता याला घाबरावं. हा देह नाशवंत आहे. कधी ना कधी मरणार आहे. संपणार आहे. कितीसा वेळ लागतो जीव निघून जायला. ? वर्ष, दिवस, तास की मिनिटं. जास्तच होतंय ना. मग सेकंद, मिलीसेकंद. हेही नाही. त्याहून कमी. आपल्याला मोजता न येईल इतके कमी. मुर्ख आहोत आपण. जगात इतके शोध लावले पण आयुष्य नेमकं किती काळाचं असेल नाही शोधू शकलो. कारण ते प्रत्येकाला वेगळं असतं. जीव किती वेळात शरीराला सोडून जातो. ?

नाही सापडत उत्तर. कारण ते मोजण्याचे साधन उपलब्ध नाही. कारण आम्ही सदैव दुसर्‍यावर अवलंबून. उत्तर सोपं आहे. क्षण. जीव जाण्यासाठी केवळ एक क्षण हवा असतो. कोणासाठी तो काही वर्षांचा तर कोणाला काही मिलीसेकंदाचा असतो. आपण कितीही प्रगती केली तरी या क्षण नावच्या गोष्टीचा उलगडा करण्यात अपयशीच ठरू. कारण तो निश्चितच नसतोच. मग केवळ एका क्षणात संपणाऱ्या आयुष्याचा आपण कधीच विचार करणार नाहीत का ? किती दिवस असं मनमारूनजगायचं ?

आपला जीव तर केव्हाही कोणत्याही क्षणी जाणारच आहे. मग तो हाच क्षण म्हणून का घाबरायचं ?
का मी का मला वाटते ते लिहिणे सोडावे अन दुसर्‍याच्या भावनांना लिहावे ?
त्यांना वाटतं म्हणून ?
की मी असं केलं नाही तर माझा जीव घेतील म्हणून ? अरे जीव जायचाच म्हटला ना तर तो कोणाला दवंडी देत बसत नाही मी चाललो मी चाललो म्हणत. त्याला वाटलं तो जातोच. आणि समजा मी लिहिलें असं अभद्र लिखाण अन तेही त्यांना नाही आवडलं तरी ते मला मारणार आहेतच ना. मग कशाला घाबरायचं. जे होतं ते चांगल्यासाठीच ना. मग होऊ दे.

हो पण शब्दा, मित्रा तू आज या मनावर काळजावर खुप मोठा आघात केला आहे. संकटात सापडलेल्या मित्राला खंबीरपणे उभे राहून साथ करणारा खरा मित्र. अन तू तर मला संकटाला घाबरून हतबल व्हायला सांगतोय. अरे किती विश्वास होता तुझ्यावर.
मी मलाच सोडून जेव्हा आयुष्याच्या या पाऊलवाटेवर आलो तेव्हा आधाराचा हात पाठीशी घालत मला अभिमानाने उभा करणारा तू आज डगमगतोय याचंच दुःख वाटतंय. ज्या मित्रानं मला स्वाभिमानानं उभा राहिला शिकवलं तोच तो स्वाभिमान गहान टाकयला लावतोय याचंच दुःख वाटतंय.

माफ कर मित्रा. आजवर तुझं बरचसं ऐकलं. पण आज मात्र मी माझं , माझ्या मनाचं ऐकणार आहे. माझा निर्णय चूक की बरोबर माहित नाही पण मी तो घेतलाय. सर्व परिणामांची जाणीव ठेवून. तू कितीही म्हटलं तरी मी माझी कला माझा स्वाभिमान गहान ठेऊन आज लिहीणार नाही. मग पुढे काही होऊ. झालंच माझं काही बरं वाईट तर आपली भेटच कधी झाली नव्हती असं समजून जा. वाटलं की नाही आपला मित्र बरोबर होता अन आपण त्याच्यासोबत असायला हवं तर पुढच्या लेखनापासून एक ओळ माझ्याही नावाची आठवण म्हणून ठेव.

मी एकटा आहे.

ना इथं माझा कोणी मित्र आहे ना कोणी शत्रू. असलाच तर फक्त सहप्रवासी. तरीही कोणाला वाटत असेल तर त्याला माझं सांगणं आहे. आहेत माझेही मित्रमैत्रीणी. कारण त्याशिवाय कोणीही असू शकत नाही. जगू शकत नाही. मित्र हा असतोच. या तुमच्या व्याख्येनुसार आहेत माझे मित्रमंडळी.

पहिलं माझं मन. हो माझं मनच आहे माझा पहिला खरा मित्र.
दुसरा माझा अनुभव. हो माझा अनुभव आहे माझा मित्र.
तिसरा क्रमांक आहे आठवणी. हो आठवणी आहेत माझ्या मैत्रिणी.

खरंतर या सर्वांअगोदर शब्दा तुझा क्रमांक होता. तो तू गमावला की टिकवला तूच ठरवं. माझी अपेक्षा आहे की तो क्रम तू पुन्हा एकदा घेशील. तू म्हणतोस की आपण कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नसतात. कारण अपेक्षाभंगाचं दु:ख अधिक वेदनादायक असतं. पण तू कायम माझ्या सोबत असशील ही माझी अपेक्षाच होती. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही मी भोगतोय.

पण म्हणतात ना अगर जख्म देनेवालाही मरहम लगा ले.
तो जख्म का दर्द मिट जाता है.
वरना कितना भी मरहम लगा .लो
जख्म भरने के बाद भी दर्द होता है.
म्हणून ही अपेक्षा आहे की तू त्या क्रमांकावर यावं. नाहीतर अशा कितीतरी अपेक्षाभंगाच्या वेदना मनात आहेतच. तशीच ही पण राहिल. विव्हळत.

तोपर्यंत केवळ मन, अनुभव अन आठवणी हेच आणि हेच आहेत माझे खरे मित्र. खरे सखे. हो. कारण चांगला असो की वाईट, आनंदी असो की दुःखी, काळ परिस्थिती कशीही असली तरी फक्त त्यांनीच मला शेवटपर्यंत साथ दिली आहे. असेल ऋणी कोणाचा तर फक्त यांचाच. आजवर मी जगलो आहे यांच्या सोबतीनेच. अन पुढेही मी असाच जगत राहणार. माझं मन, माझे अनुभव अन माझ्या आठवणीं सोबत...
एकटाच...











गणेश दादा शितोळे
(२० नोव्हेंबर २०१५)



लेखकाचं शब्दांना पत्र



शब्दा, तू मित्र ना रे माझा...!
तरी मला हे असं करायला सांगतो आहेस. काय तर म्हणे 
"ही माणसं लय डेंजर आहेत."
हो असतील डेंजर. डेंजर नाही तुला धोकादायक दगाबाज म्हणायचं असेल बहुतेक. पण म्हणून कोणाकडूनही बळजबरीने काही करून घेऊ शकत नाहीत.

नाही, नाही लिहीणार मी. लिहिणे ही माझी कला आहे, अन त्या कलेचा अपमान करत असेल तर मी तो मुळीच सहन करू शकत नाही. मी का विकलं जावं कोणाला. माझाही स्वाभिमान आहे. ही कला आजवर मी जपली. त्या सोबत मी जगलो. आयुष्यातला प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात ही कलाच एकमेव माझ्या सोबत होती. आणि आज तिला दोन रूपड्यासाठी विकून कोणाची हांजी हांजी नाही करू शकत मी.

अरे ज्या माणसाला लिहिण्यातली बाराखडी कळत नाही तो मला चॅलेंज देतो अन तेही ही असं अभद्र स्वत्वाचा उदोउदो करणारं. ना त्याला अर्थ आहे ना माझ्या आयुष्यात स्थान.

चालत आलं असेल आजवर पण मानत नाही. त्याच्या खरेपणावरच मला शशांकता आहे. पण मला ते पटत नाही. तू म्हणतोस की मी पटवून घेत नाही.  पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मला पटावीच असंही नाही. आणि हो मला जे पटतं तेच मी लिहितो अन लिहीणार. उगाच कोणाच्या आनंदासाठी भलत्याच गोष्टींचा उदोउदो करायला मला कधी जमलं नाही अन जमणारही नाही. मी आहे हा असा आहे. कोणाला पटो ना पटो.

शब्दा, मित्र मानत होतो ना मी तुला. पण तूही त्याही माणसांसारखाच निघाला का रे...?

माझ्या चांगल्या वाईट गोष्टीत आधार देणारा सखा होता तू. पण आज त्या मैत्रीला सुरूंग लावला तू. अरे काय करतील ते. फार तर फार जीव घेतील ना. घेऊ दे ना अरे काय उपयोग या अशा जीवाचा. जो दुसर्‍याच्या काय पण स्वतःच्याही उपयोगी पडत नाही.
तू म्हणशील काय फरक पडतो आपल्यात थोडा बदल करायला. एखाद्याचं गुणगान गायल्याने आपलं भलं होत असेल तर काय हरकत आहे.

अरे पण माझी बदलाला कधी हरकत नव्हतीच. पण तो असा असेल हे अपेक्षित नव्हते. लिखाण हा माझा छंद आहे. आवड आहे. व्यवसाय नव्हे. व्यापार नव्हे. मी लिहितो त्या माझ्या मनातल्या कोपर्‍यात साठवलेल्या भावना असतात. त्या मी उतरवत असतो. आणि हे तुला चांगलेच माहित आहे. माझ्या भावनांचा व्यापार करणे मला शक्य नाही. आणि जे माझ्या मनातच नाही ते मी कसं लिहायचं. तूच सांग.

कोणीही यावं अन सांगाव तुम्ही जा लिहिता ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही हे असं लिहा. 

अरे पण प्रश्न असा आहे की मुळात यांची मान्यता घ्यायला गेलंयच कोण.? तुम्हाला काय वाटते हा तुमचा प्रश्न आहे. मला जे वाटतं, जसं वाटतं ते तसं मी लिहीतो. तुमच्या भावना दुखावतातो कशा. मला वाटलं मी हसलो दुखल्या तुमच्या भावना. तुमच्या भावना दुखावल्या जातील म्हणून आम्ही आमच्या भावनांना मुरड घालावी हे कदापि शक्य नाही. निदान मला तरी नाही जमणार. शेवटी कोणाला काय करायचं असेल ते करावं. मरणाला मी कधीच घाबरत नाही.  मी ज्या दिवशी जन्माला आलो त्यादिवशी ठरलंय की मी मरणार आहे. त्यामुळे घाबरून उपयोग नाही. शब्दा हे तुलाही माहीत आहेच मी कसा आहे ते. जीवन आयुष्य या बाबतीत माझी मतं तुला माहिती आहेतच.

शेवटी काय आपलं जीवन ?
कोण आपण ?
कुणीही यावं टपली मारून जावं म्हणजेच का आपलं आयुष्य. जणू आपल्या आयुष्याला किंमतच नाही. नक्की काय करतो आपण ?
याच्या त्याच्या पैशावर खायचं प्यायचं अन जगायचं. हे असलं आयुष्य आपलं. दुसर्‍याला कशाला आपल्यालाच आपल्या आयुष्याची किंमत नाही. त्यामुळे कसंही जगतो. आपला जन्म होऊन पंचविशी ओलांडून पुढे गेली तरी आपण गाढ झोपेत आहोत. ना भविष्याची फिकीर ना वर्तमानाची चिंता. रोजच्या रहाटगाडग्यात जगतोय नुसतं ढिम्म बनून.

अरे आपल्या स्वप्नांनाही गंज चढला आहे. त्यामुळेच आजकालच्या साखरझोपेतही आपल्याला स्वप्न पडत नाहीत. जणू त्यांनीही आपल्यावर बहिष्कार घातला आहे. 
काय करणार बिचारी ती. आहोतच आपण असे. स्वप्नही म्हणत असतील की अरे काय आपण कोणाच्या झोपेत येऊन करायचंय. या माणसाला आयुष्यात काही ध्येयच नाही तर मग याला स्वप्न पडून उपयोग काय. ती कधीच पूर्ण होणार नाहीत अन हाही प्रयत्न करणार नाही.  मग आपण का उगाच त्याला स्वप्न रंजन करायचं.

हो हे असंच आहे आपलं आयुष्य. काय फरक पडतो का आपल्याला दिवस उगवण्या मावळण्याचा. उत्तर एकच. नाही.  का ? कारण आपण आपल्या रोजच्या रूटीनमधे एवढं गुरफटून गेलो आहे की काही फरक नाही. रोज तेच तेच. सवयच झाली आहे. मन मारून जगायची.

मृत्यू सोडून फिकीर उरलीयच कशाची की आता याला घाबरावं. हा देह नाशवंत आहे. कधी ना कधी मरणार आहे. संपणार आहे. कितीसा वेळ लागतो जीव निघून जायला. ? वर्ष, दिवस, तास की मिनिटं. जास्तच होतंय ना. मग सेकंद, मिलीसेकंद. हेही नाही. त्याहून कमी. आपल्याला मोजता न येईल इतके कमी. मुर्ख आहोत आपण. जगात इतके शोध लावले पण आयुष्य नेमकं किती काळाचं असेल नाही शोधू शकलो. कारण ते प्रत्येकाला वेगळं असतं. जीव किती वेळात शरीराला सोडून जातो. ?

नाही सापडत उत्तर. कारण ते मोजण्याचे साधन उपलब्ध नाही. कारण आम्ही सदैव दुसर्‍यावर अवलंबून. उत्तर सोपं आहे. क्षण. जीव जाण्यासाठी केवळ एक क्षण हवा असतो. कोणासाठी तो काही वर्षांचा तर कोणाला काही मिलीसेकंदाचा असतो. आपण कितीही प्रगती केली तरी या क्षण नावच्या गोष्टीचा उलगडा करण्यात अपयशीच ठरू. कारण तो निश्चितच नसतोच. मग केवळ एका क्षणात संपणाऱ्या आयुष्याचा आपण कधीच विचार करणार नाहीत का ? किती दिवस असं मन मारून जगायचं ?

आपला जीव तर केव्हाही कोणत्याही क्षणी जाणारच आहे.  मग तो हाच क्षण म्हणून का घाबरायचं ?
का मी का मला वाटते ते लिहिणे सोडावे अन दुसर्‍याच्या भावनांना लिहावे ?
त्यांना वाटतं म्हणून ?
की मी असं केलं नाही तर माझा जीव घेतील म्हणून ? अरे जीव जायचाच म्हटला ना तर तो कोणाला दवंडी देत बसत नाही मी चाललो मी चाललो म्हणत. त्याला वाटलं तो जातोच. आणि समजा मी लिहिलें असं अभद्र लिखाण अन तेही त्यांना नाही आवडलं तरी ते मला मारणार आहेतच ना. मग कशाला घाबरायचं. जे होतं ते चांगल्यासाठीच ना. मग होऊ दे. 

हो पण शब्दा, मित्रा तू आज या मनावर काळजावर खुप मोठा आघात केला आहे. संकटात सापडलेल्या मित्राला खंबीरपणे उभे राहून साथ करणारा खरा मित्र. अन तू तर मला संकटाला घाबरून हतबल व्हायला सांगतोय. अरे किती विश्वास होता तुझ्यावर.
मी मलाच सोडून जेव्हा आयुष्याच्या या पाऊलवाटेवर आलो तेव्हा आधाराचा हात पाठीशी घालत मला अभिमानाने उभा करणारा तू आज डगमगतोय याचंच दुःख वाटतंय. ज्या मित्रानं मला स्वाभिमानानं उभा राहिला शिकवलं तोच तो स्वाभिमान गहान टाकयला लावतोय याचंच दुःख वाटतंय.

माफ कर मित्रा. आजवर तुझं बरचसं ऐकलं. पण आज मात्र मी माझं , माझ्या मनाचं ऐकणार आहे. माझा निर्णय चूक की बरोबर माहित नाही पण मी तो घेतलाय. सर्व परिणामांची जाणीव ठेवून. तू कितीही म्हटलं तरी मी माझी कला माझा स्वाभिमान गहान ठेऊन आज लिहीणार नाही. मग पुढे काही होऊ. झालंच माझं काही बरं वाईट तर आपली भेटच कधी झाली नव्हती असं समजून जा. वाटलं की नाही आपला मित्र बरोबर होता अन आपण त्याच्यासोबत असायला हवं तर पुढच्या लेखनापासून एक ओळ माझ्याही नावाची आठवण म्हणून ठेव.

मी एकटा आहे.

ना इथं माझा कोणी मित्र आहे ना कोणी शत्रू. असलाच तर फक्त सहप्रवासी. तरीही कोणाला वाटत असेल तर त्याला माझं सांगणं आहे. आहेत माझेही मित्रमैत्रीणी. कारण त्याशिवाय कोणीही असू शकत नाही. जगू शकत नाही. मित्र हा असतोच. या तुमच्या व्याख्येनुसार आहेत माझे मित्रमंडळी.

पहिलं माझं मन. हो माझं मनच आहे माझा पहिला खरा मित्र.
दुसरा माझा अनुभव.  हो माझा अनुभव आहे माझा मित्र.
तिसरा क्रमांक आहे आठवणी. हो आठवणी आहेत माझ्या मैत्रिणी.

खरंतर या सर्वांअगोदर शब्दा तुझा क्रमांक होता. तो तू गमावला की टिकवला तूच ठरवं. माझी अपेक्षा आहे की तो क्रम तू पुन्हा एकदा घेशील. तू म्हणतोस की आपण कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नसतात. कारण अपेक्षाभंगाचं दु:ख अधिक वेदनादायक असतं. पण तू कायम माझ्या सोबत असशील ही माझी अपेक्षाच होती. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही मी भोगतोय. 

पण म्हणतात ना अगर जख्म देनेवालाही मरहम लगा ले.
तो जख्म का दर्द मिट जाता है.
वरना कितना भी मरहम लगा .लो
जख्म भरने के बाद भी दर्द होता है.
म्हणून ही अपेक्षा आहे की तू त्या क्रमांकावर यावं. नाहीतर अशा कितीतरी अपेक्षाभंगाच्या वेदना मनात आहेतच. तशीच ही पण राहिल. विव्हळत. 

तोपर्यंत केवळ मन, अनुभव अन आठवणी हेच आणि हेच आहेत माझे खरे मित्र. खरे सखे. हो. कारण चांगला असो की वाईट, आनंदी असो की दुःखी, काळ परिस्थिती कशीही असली तरी फक्त त्यांनीच मला शेवटपर्यंत साथ दिली आहे. असेल ऋणी कोणाचा तर फक्त यांचाच. आजवर मी जगलो आहे यांच्या सोबतीनेच. अन पुढेही मी असाच जगत राहणार. माझं मन, माझे अनुभव अन माझ्या आठवणीं सोबत...
एकटाच...



गणेश दादा शितोळे
(२० नोव्हेंबर २०१५) 



बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५


शुभेच्छा...



लिहायचं बरंच असतं...
पण प्रत्येक वेळी काहीतरी राहून जातं...
राहिलं की राहून जात असतं...
म्हणून पुन्हा थोडं लिहिवसं वाटत होतं...


शुभेच्छा तर दोन शब्दात द्यायला आलं असतं...
पण जुन्या आठवणीत लिहिलं जात होतं...
मिळाला उजाळा काही क्षणांना तर,
शब्दही दुसर्‍याला आनंद देत असतं...


जाऊद्या शुभेच्छा द्यायचं तर फक्त निमित्त होतं...
बर्‍याच दिवसांनी लिहायला कारण हवं होतं...
आणि तसंही लेखकाचं हेच वैशिष्टय़ असतं...
की कितीही लिहिलं तरी त्याला कमी वाटत असतं...



गणेश दादा शितोळे 
(१८ नोव्हेंबर २०१५)


रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

नाती...


नाती म्हणायला गेलं तर दोन अक्षरं अन म्हणायला गेलं तर आयुष्यातलं सर्वस्व. आयुष्याची व्याख्या नात्यांच्याशिवाय होऊच शकत नाही. कोणी कितीही म्हटलं की माझ्या आयुष्यात नात्यांना फारशी किंमत नाही तरी नात्यांहून अमुल्य गोष्ट आयुष्यात नसतेच. मग ती नाती भले स्वतःशीच असो की दुसर्‍याशी.

आयुष्यात माझं सर्वात जवळचं नातं शब्दांशी आहे. भावनांशी आहे. आठवणींशी आहे. मनाशी आहे. स्वतःशीच आहे. स्वतःच्या अनुभवाशी आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भावना, मन, आठवणी अन अनुभव या गोष्टी सर्वात जास्त जवळचे वाटतात आणि असतातही. परिस्थिती कोणताही असो या गोष्टी कायम आपल्या सोबत असतात. त्यांच्याहून खरा मित्र आपला दुसरा कोणीही असू शकत नाही.
ही झाली नात्याची एक बाजू स्वतःशी असणाऱ्या.

काही नाती असतात दुसर्‍याशी. काही रक्ताने बांधलेली तर काही विश्वासाने जोडलेली. भावनांच्या बंधात अडकलेली. ही नाती आपणास हवीहवीशी वाटतात. जशी मन, आठवणी, भावना, अनुभव ही नाती "बाय डिफॉल्ट" आयुष्यात असतातच, तशी विश्वासाने बांधलेली नाती हवीशी वाटतात. गरजेची वाटतात. रक्ताच्या असो की मग विश्वासाने बांधलेल्या आपल्या नात्यांचा सर्वात मोठा पाया हाच असतो की की आपलं मुळात आपल्याशी , स्वतःशी म्हणजे मन, आठवणी, भावना, अनुभव यांच्याशी नातं कसं आहे. ते नातं घट्ट असेल तर ही नाती टिकतात.

मन, आठवणी, भावना, अनुभव या स्वतःशी असणाऱ्या नात्यांमधेही विश्वास हवाच. कारण
नाती कोणतीही असो विश्वास हा असावाच लागतो, विश्वास या एकमेव गोष्टीवर नात्याची सुरवात अन शेवट होत असतो. कधी काय होतं, आपल्याला एखाद्या विषयी काहीतरी वाटतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीशी आपलं नेमकं नातं कोणतं आहे. अशावेळी आपल्या मनाला निर्णय घ्यायचा असतो. आपला आपल्या भावनांवर आपल्या मनावर विश्वास असेल तर आपल्याला समजतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीशी हे नातं आहे. आपल्या मनात त्याविषयी ही भावना आहे. त्यावरून ठरतं की आपण त्या व्यक्तीशी कोणत्या भावनेने जोडले जात आहोत. त्यावरून नाय्याचे नाव ठरते. हे दोन्ही बाजूंनी वेगळेही असू शकते. म्हणजे एकतर्फी प्रेम नावाचा प्रकार हा यातूनच घडतो.

नात्यात विश्वास हवा पण गृहीत धरणे नसावे. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला एक मित्र म्हणून "ट्रीट" करत असते. पण आपल्याला ती प्रेम आहे वाटतं. म्हणजे आपण तसा गृह करून घेतो. कदाचित हे आपल्याला समजतही नाही. कारण प्रेम आणि मैत्री या गोष्टी विश्वास अन भावनांच्या किंचितशा भिंतींनी वेगळ्या आहेत. त्यामुळे मैत्रीची गाडी कधी प्रेमाच्या मार्गाने धावेल सांगता येत नाही. या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असते ते एखाद्याला गृहीत धरणे. माझा विश्वास आहे की त्याला किंवा तिलाही मला वाटतं असंच वाटत आहे हा विश्वासापेक्षा गृहीतपणा अधिक झाला. कदाचित ते एखाद्या वेळी खरं असू शकतं. पण प्रत्येक वेळी खरंच असेल याची खात्री दोघंही देऊ शकत नाही.

काही वेळा असं होतं, त्याला/तिला माझ्या बद्दल असं वाटतंय ना मग ते खरं असेल. यात विश्वासही झाला अन गृहीतही धरले गेले. पण हे कधी घडतं जेव्हा आपला आपल्या मनावर म्हणजे स्वतःवर विश्वास नसतो. तेव्हा वाटतं समोरच्याला माझ्या बद्दल काय वाटतं हे बरोबर आहे. आपण आपल्याला काय वाटतंय याचा विचार जरा उशीरा करतो. या अशा विचारातून हेच घडतं की आपण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला जसं वाटेल तसं वागू लागतो.

गृहीत धरून चालणे ही भावना जितका कमी वेळ नातं तयार करायला घेते त्याहूनही कमी वेळ त्याचा शेवट करायला घेते. सुरुवातीला आपण गृहीत धरतो की समोरच्या व्यक्तीला माझ्या विषयी जास्त माहिती आहे अन ते माझ्या मनापेक्षा बरोबर आहे तेव्हा ते बरं चांगलं वाटतं. पण काही काळाने समोरच्या व्यक्तीलाही जाणवतं की ही व्यक्ती आपण सांगू तशीच वागते. म्म्हणजे जवळपास आपण समोरच्या व्यक्तीचे गुलाम झालो आहोत. हे गृहीत धरून चालणे पुढे नात्यासोबत वाढत जातं अन अशी एकवेळ येते की आपल्याला समोरचा सांगतोय ते पटत नाही. सुरवातीला असं वाटलं तरी आपण नात्यातल्या विश्वासामुळे टाळत आलो तरी शेवटी गृहीत धरण्याचा फुगा फुटतो. अन नात्याचा शेवटही होऊन जातो. नात्यामधे कधीही कोणीही एकमेकांचे गुलाम नसते. जशी प्रत्येकाला मतं असतात तसंच त्याचा सन्मान ठेवण्याची भावना असावी.

आपणात समोरच्या व्यक्तीला गृहीत धरण्याची भावना जेवढ्या लवकर येऊ शकते तितकेच लवकर नाते संपण्याचा धोका जवळपास येतो. मुळात गृहीत धरण्यापेक्षा नातं निर्माण व्हायला सहवास वाढत रहावा. त्यात प्रेम फुलण्यासाठी जरा वेळ द्यायला हवा. उगाच उतावीळ होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलं तर ना नातं तयार होतं ना नात्यातलं प्रेम मिळतं.

नाती कोणतीही असू त्यात विश्वास हवा. जितका विश्वास आपण समोरच्या व्यक्तीवर दाखवतो तितकाच विश्वास आपण आपल्या मन, भावना, आठवणी, अनुभव यावरही दाखवला पाहिजे. नात्यामधे एकमेकांवर विश्वास असण्याइतकाच "स्पेस" देण्याची भावना असावी. नाती निर्माण होताना ती फुलण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. पुर्ण वाढ झालेलीच नाती टिकतात. नात्यांच्या पोषण काळासाठी लागणारा अधिकचा वेळ दीर्घकाळ आनंद देणारा ठरतो. ही नाती आपण विश्वासाने जपली वाढवली अन जोपासली की त्या नात्यांच्या प्रेमाची गोड फळं चाखून नक्की तृप्त होता येते....


गणेशदादा शितोळे
(१५ नोव्हेंबर २०१५)


शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

सारखं सारखं फेसबुक व्हाट्स अप वापरताना सुचलेली काही शब्दांची मोरपीसं...

सांगायचं प्रत्येकाला काहीतरी थोडंस एक मित्र म्हणून....



फेसबुक व्हाट्स अप वर राहू नका
नुसतःच ऑनलाईन असतो दाखवायला म्हणून.....
काहीतरी पोस्ट्स करत जा...
दुसर्‍याच्या फाॅरवर्डही स्वतःच्या म्हणून...

मोबाईल मधे फक्त सेल नंबर
नुसतःच नका ठेवू सेव्ह करुन...
कधीतरी फोनही करत जा...
आमची आठवण आली म्हणून....

होता एक काॅलेज कट्यावर भेटलेला मित्र म्हणून....
नुसतःच नका लक्षात आहे दाखवून...
कधीतरी आठवण काढलेल्या कळू द्या...
आम्हालाही उचक्या द्या लागून....

आहे आपल्यात सुंदर नात्याचे बंध
जगाला नुसतःच नका दाखवून...
कधीतरी आयुष्यात नाती जपा...
नात्यातल्या प्रत्येक पदराला बघा निभावून...

फ्रेन्ड्स फाॅरेव्हर म्हणणं चालत नाही
नुसतःच फ्रेण्डशिप बॅण्ड बांधून...
कधीतरी आयुष्य मैत्रीसाठी जगा...
दिल दोस्ती दुनियादारी करून...

प्रेम आहे आपल्यात हे चालत नाही
नुसतःच फक्त दुसर्‍याला दाखवून...
कधीतरी वाटू द्या होतं प्रेम केलेलं....
एकदा तरी आयुष्यात कोणाच्या प्रेमात पडून...

शब्दांची गुंफता गाठ कवितेची...
नुसतःच दाखवायचं नव्हतं कविता लिहतो म्हणून....
सांगायचं होतं इथल्या प्रत्येकाला काहीतरी थोडंस...
आयुष्यात भेटलेला एक मित्र म्हणून....




गणेश दादा शितोळे
(१४ नोब्हेंबर २०१५)


शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५


आमच्या भविष्याची, भवितव्याची चिंता...



                          महाराष्ट्रात जरी दुष्काळ पडला असला तरी सध्या आमच्या भविष्याची, भवितव्याची चिंता करणारांचा सुकाळ पडला आहे. आम्ही म्हणजे त्यांच्या भाषेत "वाया गेललो". कारण काय तर एकत्र मित्रांसोबत खेळतो. एकत्र हिंडतो अन पार्टनर पार्टनर फिरत असतो.
सतत व्हाट्सअप फेसबुक सोशल नेटवर्किंग साइट्स वर ऑनलाईन असतो. 

                          हो असतो आम्ही कायम एकत्र. पण आम्हाचा वेळ घालवण्यासाठी.
एकत्र येतो आम्ही खेळण्यासाठी. रोज तेवढा खेळत हिंडत बागडत कसा जातो कळत नाही म्हणून 
आम्ही एकत्र असतो.
आहे आवड. आहे छंद. यांच्या भाषेत "वाया गेलेलो" तर नक्कीच नाहीत आम्ही.

                          खेळ कोणत्याही प्रकारचा असो. तो विरंगुळा म्हणून खेळायचा असतो आणि निदान आम्ही तरी तो तसाच खेळतो. खेळ कोणताही असो. आम्ही तो खेळणार. कारण आमचं ब्रीदवाक्य आहे.  "जिथं कमी तिथं आम्ही".  या खेळात कधी सोबत कधी बरोबर तर कधी विरोधात बसून सगळे खेळतात आणि खेळले. पण टोमणे मारायचे धंदे आम्ही केले नाहीत.  आमच्या भवितव्याची काळजी करत टोमणे मारा खुशाल. आम्हाला त्याची फिकीर मुळीच नाही.

                          हो कारण निदान वयाने मोठे आहात म्हणून म्हणा आम्ही अजूनही आदराने बोलतो. तुमच्या खोचक बोलण्याला चेष्टेने घेतो. पण आमचे शब्द षंड झाले नाहीत हेही लक्षात घ्या. कधी वार करून जातील डोळ्याचं कानालाही कळायचं नाही. लग्न झालं, मुलं झाली अन रोजच रूटीन लाईफ सुरू झालं म्हणजे आयुष्य ही तुमची व्याख्या असेल कदाचित. आमची नाही. 

                          आयुष्य आनंदात जगायचं. वेळ असेल तसं आयुष्य एन्जॉय करायचं. आम्हाला आता वेळ आहे म्हणून आम्ही खेळतो. हे वय आहे खेळायचं. दोन वर्षांनंतर तुम्ही खेळायला बोलावलं तरी आम्हाला वेळ असेलच याची खात्री नाही. आयुष्य प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर बदलत जाते अन प्रत्येकाला त्या त्या फेजमधून जावं लागतंच. आमची तत्व आम्हाला मान्य आहेत. बाकी कोणाला काय वाटते याचे काळजी कशाला. 
ना देवाला मानतो. 
न धर्माला मानतो. 
आम्ही फक्त
आमच्या तत्वांना मानतो.

लबाडीने जिंकण्यापेक्षा, 
तत्वाने हारलेले बरे.

कारण कोणी 
विचारलेच की
"हरला कसा?" 
तर गर्वाने सांगता
 येते की
 "मी लढलो कसा"

आणि आम्ही ही आयुष्याची लढाई आमच्या तत्वांनी अन तत्वज्ञानाने लढतोय..
ना जिंकण्याची चिंता आहे ना हरण्याची भिती...
तो पर्यंत हा खेळ सुरूच...

ना विचार झालेत आमचे बोथट,
ना शब्द झालेत आमचे षंड...
कधीही आव्हान द्या रणांगणात उभे राहू,
थोपटून पुन्हा एकदा तेच मर्दानी दंड...


गणेशदादा शितोळे
(१३ नोव्हेंबर २०१५)


बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५


 खरंच कधी कधी या मनाचं काही कळत नसतं...





खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं...
आपण काय करतोय,
त्याचं त्यालाच कळत नसतं...

ओढ असते की अजून काही पण,
नकळत कुणीकडे धाव घेत असतं..
दुसर्‍याच्या विश्वात रमण्यासाठी,
सारखा सारखा हट्ट धरत असतं...

ते विश्व आपलं नाही अन नसणार,
खरंतर मनालाही ते ठावं असतं...
पण न राहूनही का कळेना,
मन तिकडेच धाव घेत असतं...

काय म्हणावे या मनाला,
स्वतःलाच काही सुचत नसतं,
काय सांगावे त्याला समजावत
आपल्यालाही समजत नसतं...

खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं...
खरंच कधी कधी
या मनाचं काही कळत नसतं......




गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१५)


रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

चिरंजीवचा श्री होतोएस तू...

कोणासाठी सागर होता तू,
कोण तुला भग्या म्हणायचं,
तर कोणसाठी इंद्राचंद्रा होता तू...
आता चिरंजीवचा श्री होणार आहे तू...

आयुष्याची काही वर्षे एकटा जगला तू,
मित्रांच्या गर्दीत रमून गेला तू...
भेटली आहेत तुला अनेक हक्काची माणसं,
आता बोहल्यावर चढत आहेस तू...

मैत्री असू की अजून बरंच काही,
आजवर प्रत्येक नाती निभावत आलायस तू...
याच प्रत्येक नात्याचा अनुभव आहे पाठीशी,
आयुष्यात एका नव्या नात्यात प्रवेश करतोस तू...

आजवर जिथं कमी तिथं आम्ही म्हणत,
कित्येकांच्या पाठीशी उभा राहिला तू...
काळजी घे आता दोघांसह घरच्यांची,
आता दोन जीवांचा होतोएस तू...


आयुष्यात अनेकांना दिले आनंदाचे क्षण तू,
अजून एक आनंदाचा क्षण देतोएस तू...
वहिनींना अन तुला मित्र परिवाराच्या शुभेच्छा,
आता चिरंजीवचा श्री होतोएस तू...



आमचा जीवाभावाचा मित्र सागर (दादा) आज आयुष्याच्या नवीन नात्यात प्रवेश करतोए,
अमृताच्या साथीने त्याच्या आयुष्यात अमृताहून गोड क्षण यावेत हीच सदिच्छा.

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा लग्नसोहळा जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही.  अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे.

विवाहसोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा...!


(सागरसह आम्ही मित्र परिवार. डावीकडून गणेश शितोळे, नंदकिशोर मोरे, राहुल गिऱ्हे, स्वप्निल कोकाटे, सागर भगत, संतोष गाढवे, बाळासाहेब खाडे आणि महेश आडेप.)






गणेश दादा शितोळे
(०८ डिसेंबर २०१५)



मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०१५



वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा श्री...







आमचे जिवाचे जिवलग मित्र,

मित्र कमी पण लहान भाऊच जास्त,

तमाम मुलींच्या ह्रदयाची धडकन,

चॉकलेटबॉय,

लाडाने आम्ही मित्र ज्यांना ममाज बॉय

ज्यांची ताशावरची तर्रीरीरीरी वाजली की आपोआपच पाय थिरकतात असे वादक,

श्रीकांत दादा इंगवले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

आमच्या या भावाला लवकरात लवकर एक सुंदर बायको मिळावी हीच सदिच्छा.
(मैत्रीणी, गर्लफ्रेंड आता भरपूर झाल्या.)

वाढदिवसाच्या क्षणी या भावास इतकंच सांगणं आहे की समोर कॅडबरी असताना पार्ले बिस्किटाचा नाद सोडून द्यावा अन फक्त कॅडबरीच एन्जॉय करावी...

दुसरं म्हणजे भेटणारी प्रत्येक व्यक्ती समजून घेऊन मग त्यावर विश्वास ठेवायला हवा...
(आयुष्यात भेटणारे सगळेच आपले मित्र नसतात)



गणेशदादा शितोळे
(३ नोव्हेंबर २०१५)