माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

माझ्या लेखणाच्या गोष्टी....



मुळात मी या क्षेत्रात का आलो आणि कसे आलो हे अनुत्तरीत असले तरी याला खरी सुरुवात झाली ती २००७ लाच. लिहीणे हा छंद होता आहे अन रहाणार. पण सोब आयुष्य जगताना येईल त्या वाटेने चालत गेलो. भेटील ती पाऊलवाट आपली मानत गेलो. ध्येय, स्वप्न अशा मोठ्या शब्दांशी खरंतर यात काहीही योगदान नाही. आयुष्यचं ध्येय म्हणून एखाद्या क्षेत्राला स्विकारणे किंवा पहाटे एखादे स्वप्न पडले म्हणून एक क्षेत्र निवडणे या कशाचाही माझ्या लिहिण्याशी काडीचाही संबंध नाही. दहावी पर्यंत पेपरात लिहण्याचाही कंटाळा यायचा हे आजही आठवले की तो मीच का हा प्रश्न मलाही पडतो. पण आयुष्यात काही चांगले वाचले की आपल्या हातून काही तरी नक्कीच लिखाण बाहेर पडते. फक्त ते मनावर लिहण्यासोबत कागदावर उतरले की लिखाणाची ही पाऊलवाट चालणं सोपं होतं. लेखनाच्या या वाटेवर आपल्याला प्रोत्साहन देणारी मंडळी भेटली की नकळत ते अधिक चांगले लिहण्याचा हुरूप येतो. एका वृत्तपत्रातच्या पुरवणीत लेख लिहीणारी व्यक्ती या वाटेवर भेटली अन हा प्रवास सुकर होऊन गेला. तिच्या पाऊलखुणा आजही या वाटेवर पाठमोर्‍या अस्पष्ट असल्या तरी दिसतात.
लेखन ही अशी गोष्ट असते की त्याला आठवणे अन सुचणे हा प्रकार नसतो असंच वाटतं. आपल्या अवती भवती घडणार्‍या गोष्टी शब्दात मांडल्या की लिखाण होते. राजकारण तसा माझा कायम आवडीचा विषय. राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यात रस नसला तरी त्याविषयी स्वतःची स्पष्ट मतं मांडण मला आवडतं. अनेकदा मित्रांना ते रूचतही नाही. मग फुकटात सल्ले अन शाब्दिक हल्ले नित्याची बाब झाली आहे.
एकदम टोकाचं लिहिणे म्हणजे समोरच्याला संताप यावा असं नाही. पण जहाल, मवाळ ह्या जशा विचारांच्या शैली असतात तशाच लिखाणाच्या शैलीपण असतात. आपण आपल्या विचारांची शैली निवडली की समोरचे विचार अन मतं स्विकारण्याचं अपरिहार्यत्व येत नाही तर ते सहजपणे स्विकारले जाते. सध्या हेच लिखाण क्षेत्र वेगळी ओळख, ठसा निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आवड आणि छंद एकत्र आले की न पाहिलेली स्वप्नंही पूर्ण करण्याची हिम्मत येते. आणि त्यात त्याला प्रोत्साहन देणारी आपली माणसं पाठीशी उभी असली की समाधान वाटतं.

गणेश सुवर्णा तुकाराम
१५ नोव्हेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा