मी ‘जिवंत’ असल्याची फार मोठी शिक्षा मला भोगावी लागतेय. या जिवंतपणाची लक्तरं वेशीला
टांगण्यात दुर्देवाने माझी आपली माणसं आघाडीवर आहेत. परिणामी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अन व्यक्तिगत अशा सर्वच पातळ्यांवर
कोलमडलोय अगदी भणंगंच.
पुस्तकांच्या नादाला लागल्याने मला स्वार्थी, मतलबी होवून जगण्यापलीकडचा आयुष्य जगता आले. या
पुस्तकांनी अन वाचनाने काय दिले मला ?
तर मनाच्या संवेदनशीलतेचे पैलू आणि संस्कार.
मी माझी मनस्थिती बदलू शकत नव्हतो ना परिस्थिती बदलू शकत
होती. ज्या दिवशी पुस्तकं अन पुस्तकांची माणसं आयुष्यात आली आणि असंख्य दुःखाची, विचारांची आवर्तने माझ्या मनात सतत सुरु झाली. मी माणूस होण्याचं श्रेय
पुस्तकांनाच.
पण याचा दुसरा कोणता अर्थ होता ?
आपल्याच माणसांना आपलं माणूसपण नकोय. पूर्ण वेडं ठरवण्याचाच
प्रयत्न चालवलाय. जीवनाकडे नकारार्थी दृष्टीकोनातून तयार होतानाही पुस्तक काहीतरी
मला सांगू पाहत होते. आयुष्य नव्याने सुरु करण्यास प्रेरित करीत होते. आमच्या निखळ
मैत्रीचे अनुबंध अजूनही मजबूत होते अन म्हणूनच मी अगदी योग्यवेळी तिथे येवून
पोहचलो आहे.
जीवनाशी आपण अशी हार पत्कारून कशी चालेल? आपल्याला लढावेच लागेल. आपल्या माणसांशी तर आपल्या माणसांशी. आज
पर्यंतच्या आयुष्यात आपण कमी का झगडलो आहोत ?अशा अनेक लढाया
लढलो आहोत आपण. आणि जिंकलो ही आहोत. येथून पुढेही लढू आणि जिंकू सुद्धा !!
आपली माणसं आपल्याला सोडून जातील म्हणून सर्व काही संपणार
आहे असे मुळीच नाही. खरेतर जी माणसं आपल्यावर विश्वास दाखवत नाही अणि ज्यांनी आपली
होळी केली त्यांना आपण परकेच होतो मग भले
ती आपली किती का असेनात. जी जाणार आहेत ती त्यांच्या विचारधारेने वागणार अन.तो
त्यांचा अधिकार होता.
आपणही आता आपल्या विचारांनी वागूया. बास आतापर्यंत खूप गहिवर
मांडला आपण आपल्या विचारांचा आपल्या
माणसांना समजावण्याकरता. पण आता नाही. आयुष्याचा एक अध्याय संपला. संपला तर
संपला. दुसऱ्या अध्यायाला सुरवात करायलाच हवी.!!
आपल्याला आपले अस्तित्व असे
संपवून चालणार नाही आपला तो पिंड नाही.
आपण फिनिक्स आहोत.
या राखेतून पुन्हा भरारी घेऊ.
पुन्हा आपले विश्व.
आपले घर तयार करू.!
गणेश सुवर्णा तुकाराम
११ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा