निर्भया बलात्कार खटला आणि आपण
(कृपया कोणी अमक्या एकाची बाजू घेतली असा गैरसमज करून घेऊ नका. ही सध्याची सत्य परिस्थिती आहे. याउपरही कोणाला ही भूमिका तशी वाटत असली तर ते मोकळे आहेत.)
नुकताच निर्भया बलात्कार खटल्यातील बाल गुन्हेगार मोकळा सुटला. खरंतर ही भारतीय न्याय व्यवस्थेबाबत खंत व्यक्त करणारी गोष्ट आहे अन शरमेची गोष्ट आहे. पण त्यावरूनही शरमेची ही बाब आहे की सध्या आमीर खानची पत्नी किरण राव वर पोस्ट फाॅरवर्ड करण्यात येत आहेत.
" डियर अमीर खान जी !!
निर्भया के क्रूर हत्यारे बलात्कारी मोहम्मद अफरोज रिहा हो गया है..अपनी बेगम ''किरण'' से पूछिये डर तो नहीं लग रहा है..?"
मुळात आपल्याला कोणत्याही गोष्टीला सिरियसली घेण्याची सवय नाही. पण जो प्रश्न किरण राव ला विचारणार आहोत तोच कोण्या आपल्या माता भगिनीला विचारला तर येणारं उत्तर एकदा तपासून बघा. आपल्या माणसावर अन्याय करणारी व्यक्ती पुन्हा मोकट सुटल्यावर येणारी चिड अनुभवून बघा.
खरंच आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात महिला सुरक्षित आहेत..?आपलं जर उत्तर हो असेल तर मग रोज पाऊस पडवा तसा महिला अत्याचारांचा सडा का पडत आहे..?रोजच बलात्कार, विनयभंग, छेडछाड असे प्रकार का घडत आहेत..?दिल्लीतल्या निर्भयासारख्या कित्येक निर्भया रोजच बळी पडतात याचं नक्की गांभीर्य आहे का..?
जर रोजच्या वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना वाढत असतील तर भारतात महिला सुरक्षित आहेत या म्हणण्यालाच धक्का पोहोचतो. पण आपल्याला त्याचं गांभीर्य नाही. निर्भयाच्या जागेवर आपलं कुणी असतं तर आपल्याला याची जाणीव झाली असती हेच तथ्य आहे.
मग या अशा असुरक्षितेतच्या वातावरणाबाबत एक अभिनेत्री प्रश्न उभा करते तेव्हा आम्हाला देशद्रोह का वाटावा..?किरण राव ऐवजी आपली कोणी व्यक्ती आपल्याला असं म्हटली असती तर आपल्याला देशद्रोह वाटला असता का..?विचार करा एकदा.
महिला अत्याचारात भारत जगातील एक प्रमुख देश ठरावा यामागचं गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे...
दुसरी गोष्ट ही की आपली न्याय व्यवस्था किती कमकुवत आहे याची नुकतीच ओळख झाली असेलच..चार जणांना चिरडणारा सलमान खान निर्दोष ठरतो अन रविंद्र पाटील सारखा पोलिस निष्कारण मृत्यू पावतो...दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील बाल गुन्हेगार मोकळा सुटतो.
या अशा घटनांनी न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत आहे.अशा घटनांनी न्यायालयापेक्षाही आपली मानसिकता बिघडत चालल्याचंच लक्षात येतं....एखाद्या गोष्टीचा विनोद करण्याअगोदर त्याचं गांभीर्यही लक्षात आलं पाहिजे.
प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या बाबतीत घडल्यावरच आपण जागे होणार का..?आपल्या कोणा व्यक्तीवर किंवा आपल्यावर परिस्थिती ओढावल्याशिवाय आपल्याला गांभीर्य येणार नाही का..?विचार करा...
गणेशदादा शितोळे
(२४ डिसेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा