"अशी माणसं येती पुन्हा,
भेटाया घेऊनी गुज आठवणीचे..."
कालचा दिवस म्हणजे एक संस्मरणीय अनुभवाची
साठवणच होती. जवळपास पाच सहा वर्षांनी झालेली मित्र मैत्रिणींची भेट मनाला
आनंद देणारी होती. काॅलेज संपल्यावर आपापल्याला करिअर मधे गुंतून गेलेला
प्रत्येक जण काल भेटला. त्या भेटीत एकमेकांत झालेला बदल पाहून बाहेर पडणारी
उत्सुकता पहाण्याजोगी होती.
सकाळच्या बाईकवर फिरून आलेला कंटाळा शिवप्रसादला भेटला अन एका क्षणात नाहीसा झाला. त्याच्या एकमेकांची खेचत केलेला प्रत्येक विनोद खळखळून हसू देत होता. संध्याकाळच्या त्याच्या भेटण्यापासून लग्न सोहळ्यानंतर जाईपर्यंत इतके हसलो की त्या हसण्याने पोट भरेल की काय कित्येकदा वाटलं. मनोज होलमचा पोवाडा ऐकण्याचा आनंदही तेवढाच संस्मरणीय होता. लग्नाला तो नसूनही शिव ने त्याची कसर भरून काढली होती.
संध्याकाळच्या मिरवणुकीत एकेका मित्राला भेटताना त्यांच्यासोबतच्या काॅलेजमधल्या आठवणीच डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येकाची भेट ही एक विलक्षण अनुभव देणारी होती. या सगळ्यात जास्त भारवलेली भेट होती. संत्याचा संतोषराव झालेल्या जीवलग मित्राची. इंजिनियरींगच्या अॅडमिशननंतर झालेली पहिली भेट. त्याचं लग्न कधी झालं माहिती नव्हतं त्यामुळे त्याच लग्न मिस झालंच. त्याला भेटून पुन्हा एकदा काॅलेजचा तोच मित्र भेटल्याचं जाणवलं. अगदी तसाच. मितवा सारखा. मित्र, तत्वज्ञ अन वाटाड्या. वयासोबत नवीन नात्यासोबत थोडीफार मॅच्युरिटी आली होती बस्स.
सोबत महेश उर्फ पप्पू अन स्वप्निल यांचाही भेट झाली. स्वप्निल अगदी काॅलेजमधल्या स्वाप्याची तीच काॅपी होती. तरी या मिरवणुकीत अजून दोन व्यक्ती मिसींग भासत होत्या. जसं ऐकायला कान हवा होता तसाच जवळचा मित्र. आजही कधी कानाजवळ हात गेला की डोळ्यासमोर उभा रहाणारा. राहुल. गर्दीत शोधूनही सापडत नव्हता. दुसरा म्हणजे माझ्या नावसरशी आठवणारा नंदू. मला कुणी आवाज दिला तरी त्याचीच आठवण येणारा. गॅदरींग मधे गणनायकाय गणदेवताय गाणं गायलेला गायकमित्र नंदकिशोर मोरे. मित्रांच्या गर्दीतही ही दोन माणसं दिसत नसल्याने कित्येकांना विचारलंही.
मित्रांच्या भेट घेऊन कसतंरी वाट काढत एकदाचं नवरदेवाला भेटलो. शुभेच्छा दिल्या. भेटीगाठी पार पडल्या अन परण्यातला डान्स सुरू झाला. एकमेकांना आत ओढून नाचण्याच्या खेळात मलाही जाऊन यावंच लागलं. मित्रांचा डान्स पाहून एक क्षण वाटलंही प्रभूदेवाही यांच्याकडून शिकला असावा. परण्याची मिरवणूक पुढं पुढं चालली होती.अन एका क्षणी मिसींग माणसं दिसली. दोघांनाही मारलेली मिठी सर्व जूनं आठवण करून देत होती.
लग्नाची तिथी समीप आली. नवरानवरी मंडपाच्या दाराशी येऊन थांबले होते. एवढ्या गर्दीतही नवरदेवासोबत प्रचेता भेटली. पण तेव्हा बोलायला फारसा वेळ नव्हता. गर्दीसोबत आत शिरलो. तुतारीसह वरवधू स्टेजवर पोहचले अन अक्षता डोक्यावर पडल्या. सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता.सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता. तिथेच अबोलीचीही भेट झाली.
उशीर झाल्याने मित्र जेवणाकरता ताटकळलेले होते. त्यामुळे लवकर जेवण करून आलेल्या मित्रांना निरोप द्यायला निघालो असतानाच नाशिक पॅटर्न भेटला. शब्दांची मोरपिसे, कवी लेखक यावरून चेष्टा मस्करीही झाली. काहींनी कौतुकही केलं. अमरने गर्लफ्रेंडसाठी कविता लिहिच्यातही सांगितलं. अमर, सुहास, सुरज, सागर एकेकाशी बोलताना उशीर झाला. बाहेर मित्र वाट पहात होते. बाहेर गप्पा मारत एकमेकांची उडवत मित्रांना निरोप दिला जात होता. मधेच माझ्या कवितांकडेही गाडी घसरत होती.
कित्येकांनी
तर लग्नादिवशी च्या घटनांवर कविता लिहिण्याचा सल्ला ही दिला. आधीच मला
उल्हास त्यातच मित्र म्हणतात म्हटल्यावर लिहिणार हे नक्कीच. गप्पा मारत
मारत कविता लिहिलीही अन फेसबुक वर पोस्टही केली. या गप्पा निरोपाच्या
कार्यक्रमात कधी साडेदहा अकरा वाजून गेले. नाशिककर बाहेर जेवायला निघून
गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं राहिलं ते राहिलंच. अमरला पुस्तकं
द्यायचंही राहिलंच.
आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही.
बाहेरच्या गप्पा संपत नाही तोपर्यंत साडे अकरा वाजून गेले होते. पाठीमागेच आरती, अबोली, प्रचेता घरी निघाल्या होत्या. गाड्यांभोवती निरोपीची चर्चा सुरू होती अन मी पोहचलो. मला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच सेम प्रश्नचिन्ह.
"तू असा कसा झाला...?"
पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर हसून उत्तर दिले.
आता वाटतंय या दिवसाची आठवण, या हॅकर व्हायरसची आठवण म्हणून या प्रश्नाचा विचार सुरू केला आहे. पुन्हा हा प्रश्न पडणार नाही याकरता आता मनावर घेतले आहे. पाहू हा निश्चय किती दिवस पाळला जातोय. राहुलच्या रिलेशन स्टेटसवर काही कमेंट्स होतं तिघींनीही निरोप घेतला. त्यानंतर काही वेळाने जेवण करून आम्हीही स्वप्निलच्या घराकडे निघालो.
रात्रीचे दोन वाजले तरी स्वप्निलच्या घरीही मस्ती चालूच होती. संतोषचा जुना अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला. गप्पांच्या ओघात माझी कविताही लिहून झाली होती. राहुलने पहिल्यांदा वाचली अन नंतर संतोषचा विषय बाळूवरून कवितेवर आला. मोबाईलवर काही कविता, पुस्तकाची सुरवात वाचली. काही त्याला आवडल्या. गप्पा मारत कधी झोपेलो कळलं नाही.
सकाळच्या बाईकवर फिरून आलेला कंटाळा शिवप्रसादला भेटला अन एका क्षणात नाहीसा झाला. त्याच्या एकमेकांची खेचत केलेला प्रत्येक विनोद खळखळून हसू देत होता. संध्याकाळच्या त्याच्या भेटण्यापासून लग्न सोहळ्यानंतर जाईपर्यंत इतके हसलो की त्या हसण्याने पोट भरेल की काय कित्येकदा वाटलं. मनोज होलमचा पोवाडा ऐकण्याचा आनंदही तेवढाच संस्मरणीय होता. लग्नाला तो नसूनही शिव ने त्याची कसर भरून काढली होती.
संध्याकाळच्या मिरवणुकीत एकेका मित्राला भेटताना त्यांच्यासोबतच्या काॅलेजमधल्या आठवणीच डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येकाची भेट ही एक विलक्षण अनुभव देणारी होती. या सगळ्यात जास्त भारवलेली भेट होती. संत्याचा संतोषराव झालेल्या जीवलग मित्राची. इंजिनियरींगच्या अॅडमिशननंतर झालेली पहिली भेट. त्याचं लग्न कधी झालं माहिती नव्हतं त्यामुळे त्याच लग्न मिस झालंच. त्याला भेटून पुन्हा एकदा काॅलेजचा तोच मित्र भेटल्याचं जाणवलं. अगदी तसाच. मितवा सारखा. मित्र, तत्वज्ञ अन वाटाड्या. वयासोबत नवीन नात्यासोबत थोडीफार मॅच्युरिटी आली होती बस्स.
सोबत महेश उर्फ पप्पू अन स्वप्निल यांचाही भेट झाली. स्वप्निल अगदी काॅलेजमधल्या स्वाप्याची तीच काॅपी होती. तरी या मिरवणुकीत अजून दोन व्यक्ती मिसींग भासत होत्या. जसं ऐकायला कान हवा होता तसाच जवळचा मित्र. आजही कधी कानाजवळ हात गेला की डोळ्यासमोर उभा रहाणारा. राहुल. गर्दीत शोधूनही सापडत नव्हता. दुसरा म्हणजे माझ्या नावसरशी आठवणारा नंदू. मला कुणी आवाज दिला तरी त्याचीच आठवण येणारा. गॅदरींग मधे गणनायकाय गणदेवताय गाणं गायलेला गायकमित्र नंदकिशोर मोरे. मित्रांच्या गर्दीतही ही दोन माणसं दिसत नसल्याने कित्येकांना विचारलंही.
मित्रांच्या भेट घेऊन कसतंरी वाट काढत एकदाचं नवरदेवाला भेटलो. शुभेच्छा दिल्या. भेटीगाठी पार पडल्या अन परण्यातला डान्स सुरू झाला. एकमेकांना आत ओढून नाचण्याच्या खेळात मलाही जाऊन यावंच लागलं. मित्रांचा डान्स पाहून एक क्षण वाटलंही प्रभूदेवाही यांच्याकडून शिकला असावा. परण्याची मिरवणूक पुढं पुढं चालली होती.अन एका क्षणी मिसींग माणसं दिसली. दोघांनाही मारलेली मिठी सर्व जूनं आठवण करून देत होती.
लग्नाची तिथी समीप आली. नवरानवरी मंडपाच्या दाराशी येऊन थांबले होते. एवढ्या गर्दीतही नवरदेवासोबत प्रचेता भेटली. पण तेव्हा बोलायला फारसा वेळ नव्हता. गर्दीसोबत आत शिरलो. तुतारीसह वरवधू स्टेजवर पोहचले अन अक्षता डोक्यावर पडल्या. सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता.सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता. तिथेच अबोलीचीही भेट झाली.
उशीर झाल्याने मित्र जेवणाकरता ताटकळलेले होते. त्यामुळे लवकर जेवण करून आलेल्या मित्रांना निरोप द्यायला निघालो असतानाच नाशिक पॅटर्न भेटला. शब्दांची मोरपिसे, कवी लेखक यावरून चेष्टा मस्करीही झाली. काहींनी कौतुकही केलं. अमरने गर्लफ्रेंडसाठी कविता लिहिच्यातही सांगितलं. अमर, सुहास, सुरज, सागर एकेकाशी बोलताना उशीर झाला. बाहेर मित्र वाट पहात होते. बाहेर गप्पा मारत एकमेकांची उडवत मित्रांना निरोप दिला जात होता. मधेच माझ्या कवितांकडेही गाडी घसरत होती.
आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही.
बाहेरच्या गप्पा संपत नाही तोपर्यंत साडे अकरा वाजून गेले होते. पाठीमागेच आरती, अबोली, प्रचेता घरी निघाल्या होत्या. गाड्यांभोवती निरोपीची चर्चा सुरू होती अन मी पोहचलो. मला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच सेम प्रश्नचिन्ह.
"तू असा कसा झाला...?"
पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर हसून उत्तर दिले.
आता वाटतंय या दिवसाची आठवण, या हॅकर व्हायरसची आठवण म्हणून या प्रश्नाचा विचार सुरू केला आहे. पुन्हा हा प्रश्न पडणार नाही याकरता आता मनावर घेतले आहे. पाहू हा निश्चय किती दिवस पाळला जातोय. राहुलच्या रिलेशन स्टेटसवर काही कमेंट्स होतं तिघींनीही निरोप घेतला. त्यानंतर काही वेळाने जेवण करून आम्हीही स्वप्निलच्या घराकडे निघालो.
रात्रीचे दोन वाजले तरी स्वप्निलच्या घरीही मस्ती चालूच होती. संतोषचा जुना अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला. गप्पांच्या ओघात माझी कविताही लिहून झाली होती. राहुलने पहिल्यांदा वाचली अन नंतर संतोषचा विषय बाळूवरून कवितेवर आला. मोबाईलवर काही कविता, पुस्तकाची सुरवात वाचली. काही त्याला आवडल्या. गप्पा मारत कधी झोपेलो कळलं नाही.
आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही.
बहुतेक अजून कोणाच्या तरी लग्नाची प्रतिक्षाच....
काहींचे सुर जुळलेत. काहींचे जुळत आहेत.
बघू आता कोणाचा नंबर...
अमर की सागर...
बहुतेक पुढच्या लग्नाला नाशिकला जावं लागतंय बहुतेक.
भग्याच्या लग्नापेक्षा लक्षात राहील ती ती संध्याकाळ...
किशोर कुमार यांनी प्रेयसीसाठी म्हटलं होतं..
"वो शाम कुछ अजीब थी,
ये शाम भी अजीब है...
वो कल भी पास पास थी,
वो आज भी पास है..."
मला या मित्रांसाठी डेडीकेट करायला आवडलं असतं,
"वो शाम कुछ अजीब थी,
ये शाम भी अजीब है...
वो दोस्त कल पास पास थे,
आज उनकी यादे पास है..."
![]() |
| (विवाहसोहळ्यापूर्वी मंडपात नवरदेवासह सनी कानडे यांनी घेतलेली सेल्फी. डावीकडून विवेक नांगरे, प्रमोद लहाकर, रविंद्र दरावडे, नवरदेव सागर भगत, ऋषिकेश बांडे, हेमंत घोडे, विशाल वागस्कर आणि सनी कानडे) |
![]() |
| (जीवलग सहकारी डावीकडून राहुल गिऱ्हे, गणेश शितोळे, नंदकिशोर मोरे, स्वप्निल कोकाटे, सागर भगत, संतोष गाढवे, बाळासाहेब खाडे आणि महेश आडेप) |
![]() |
| (राहुल गिऱ्हे यांनी काढलेली सेल्फी. डावीकडून आरती दळवी, अबोली पाटील, संतोष गाढवे, स्वप्निल कोकाटे, प्रचेता गवारे, महेश आडेप, बाळासाहेब खाडे, गौरी गाढवे, सागर व वहीनी, नंदकिशोर मोरे आणि राहुल गिऱ्हे) |
![]() |
| (राहुल गिऱ्हे यांनी काढलेली सेल्फी. डावीकडून संतोष गाढवे, स्वप्निल कोकाटे, प्रचेता गवारे, अबोली पाटील, गौरी गाढवे, सागर व वहीनी, , बाळासाहेब खाडे, नंदकिशोर मोरे महेश आडेप आणि राहुल गिऱ्हे) |
![]() |
| ( "जब मिल बैठेंगे तीन यार". डावीकडून स्वप्निल कोकाटे, गणेश शितोळे आणि संतोष गाढवे. ) |
गणेश दादा शितोळे
(१४ डिसेंबर २०१५)
(१४ डिसेंबर २०१५)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा