माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

साक्षगंध...!!!

 

पसंत आहे मुलगी म्हणत,
एकमेकांची मनं जुळत गेली...
जणू मनाचे बंध विणत,
रेशीमगाठ जुळूत आली...

अंगठी सोबत बोटातली सांधच जणू,
एकमेकांनी भरून गेली...
आयुष्याच्या वाटेवरची दोघांची सोबत,
श्वासांसारखीच होऊन गेली..

ह्रदयातली माणसं आज,
मनानेही एक झाली...
जणू आठवण त्याला झाली,
अन उचकी तिला लागली..

मैत्रीच्या पलिकडची नाती,
प्रेमाच्या बंधनात गुंफत गेली...
एक जीव दोन श्वास घेत,
आयुष्याची ही नवी वाट चालू लागली...








गणेश दादा शितोळे
(२० नोव्हेंबर २०१६)



1 टिप्पणी: