माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

कविता...!!!

 

कधीकधी नव्हे तर कायमच,
कविता आपलेच शब्द बोलतात...
कधी कोणाला बोलायचे राहून गेलेले,
आपलेच शब्द व्याजासह आपल्याच परत देतात...

कधी एकटेपणाता हरवलेली वाट,
आठवणींच्या देशात पुन्हा शोधून देतात...
कधी मनात खोलवर रुतलेल्या जखमा,
हळूवार फुंकर घालून बर्‍या करतात....

कधी प्रेमाच्या गोष्टी तर कधी मैत्रीची आठवणी,
चहाच्या घोटासोबत ताज्या करून जातात...
जुनेच भास असलेले सर्वकाही,
क्षणात भेट घालून देतात...

कविता ह्या अशाच असतात,
निर्जीव शब्दांतही श्वास भरतात...
अन वाचता वाचता नकळत आपल्याशी,
विश्वासाचे वेगळे नाते गुंफत जात असतात...








गणेश दादा शितोळे
(८ नोव्हेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा