माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६


ओळख झाली अन भेटी झाल्या कित्येक तरी...



ओळख झाली अन भेटी झाल्या कित्येक तरी...
नात्यांची गाठ बांधणे अजूनही बाकी आहे....
संवाद घडोघडीचा क्षणांनी वाढत राहिला तरी...
नात्याचा धागा अजूनही सैल आहे...

ओढ वाढत राहिली सहवासाची तरी...
नात्यांची जोड घट्ट होणे बाकी आहे...
जुळत चालले प्रेमाचे बंध रेशमी तरी...
गुंफता वीण पदरांच्या उपेक्षित आहे...

नात्यांच्या प्रेमात भागली क्षणभर विश्रांतीतली तृष्णा तरी...
चातकाला पाण्याची ओढ अजूनही तशीच आहे....
आयुष्यात भेटत राहिले राजहंस किती तरी...
प्रेम अन मैत्रीतले दूधपाणी वेगळे होण्याच्या प्रतिक्षेत आहे...

 गणेशदादा शितोळे
(२१ नोव्हेंबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा