माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

चालता चालता...!!!

चालता चालता रस्त्याने एक झुळकेसोबत,
भेटली काही अनोळखी माणसं...
रोजच्या त्याच वळणावरच्या प्रवासात,
नकळत ओळखीची भासू लागली माणसं...

कधी नकळत आपली होऊन गेली,
धावत्या आयुष्यात माझं मलाच कळलं नाही...

कधी झालीच सिग्नलवर ओझरती भेट,
हेल्मेटच्या काचेमधूनच होते नजरानजर...
खुलते गालवर नकळत स्मितहास्य,




गणेश दादा शितोळे
(१५ नोव्हेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा