माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

सिंगल है इसका यकीन दिलाना बहुत मुश्किल


               आजकाल बरेच मित्र भेटत असतात. अर्थात भेटल्यावर बाकी विषयांपेक्षा कविता आणि शब्दांची मोरपीस हेच विषय चर्चेत असतात. अशाच एका भेटीत मित्राने विचारलं,
"काय हे कविता लिहणं कधीपासून अन कुणासाठी...?😜😜😜😜 नाही आम्हाला पण कळू द्या कोण आहे ती..."❤❤😝😝

                    त्याला मी नेहमीचं तसं काही नाही वगैरे वगैरे उत्तर दिलं. पण या असल्या बांऊसरची सवय असली तरी माझ्या उत्तरानं भावाचं काही समाधान झालं नाही. तो वारंवार विचारत राहिला अन मी सांगत राहिलो. ती भेट अजूनही लक्षात आहे. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा सिंगल असल्याचा पश्चाताप वाटायला लागला. कविता करताना कधी असं वाटलं नाही. कारण प्रेम कविता करायला प्रेमात पडायलाच हवे असं काही गरजेचं नव्हतं. कारण आजवर लिहिलेल्या बहुतांश कविता अशाच मित्रांच्या प्रेमाकरता लिहून दिल्या होत्या. अनेक लेख लिहून दिले. काहींची प्रेम प्रकरणं त्यातून जुळून आली. काहींनी काय झालं कधी कळवलंच नाही. दुसऱ्याच्या भावना आपल्या कविता/लेख यामधून लिहिताना आपल्याला त्या जगायला लागतात एवढंच यामागचं गुपित होतं. पण त्या भावनांमधे प्रेम करायला आणि जगायला लागतं हेच विसरुन गेलो. त्यादिवशी याची जाणीव झाली.

                  सोबत याच कविता लेख यामुळे काही मित्रांची स्टेटस सिंगल मधून इन रिलेशनशिप मधे बदलली. तर काही नव्याने प्रेमात पडले याचा आनंद आहे. काहींनी तर लग्नाचं क्रेडिटच देत लग्नाच्या स्टेजवर ओळखच तशी करून दिली. तेव्हा वाटणारा आनंद अवर्णनीय आहे. मला क्रेडिटची अपेक्षा आणि इच्छा नव्हती आणि नाही अन नसणार. शेवटी इतकंच की आपल्या थोड्याशा प्रयत्नातून कोणची मनं जुळून येत असतील तर त्याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. आणि तसंही मी माझ्या मनाची काळजी करणं केव्हाच सोडून दिलं आहे. माझ्या मनाची काळजी घेणारे भेटेल तेव्हा भेटेल. आणि मन जुळून येईल तेव्हा येईल. पण त्या मित्राच्या भेटीने एक मात्र शिकवलं की....

"सिंगल रहना बहुत आसान काम है,
लेकिन 
लोगो को आप सिंगल है इसका यकीन दिलाना बहुत मुश्किल है...."

😂😂😂👍

गणेशदादा शितोळे
(२८ फेब्रुवारी २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा