माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६


 वाढदिवसाच्या शुभेच्छा गोट्या...!



अॅडमीशनच्या दिवशी झालेली ओळख कधी मैत्रीत बदलली कळलंच नाही.
.
मित्र कसला भाऊच माझा...
.
फक्त दोनचारशे लोक आम्हाला मित्र समजतात...
.
.
भावाबद्दल सांगायचं अन बोलायचं काय....
.
सगळच तसं अलेबलच...
.

8055 कुठंही नंबर दिसला की बाऊ डोळ्यासमोर चउभा राहणार...
जगातील नामांकीत कंपन्यांच्या बाॅसला बाॅस असण्याची जितकी क्रेझ नाही इतकी क्रेझ भावाला...
.
मोबाईल फोन मधल्या कॉन्टक्ट एन्ट्री संपत आल्या पण भावाच बाॅस नंबरचं वेड काय जायना...
.
भावाला मधीच पुस्तक वाचण्याचं फॅड सुचतं तर
कधी मोक्कार हिंडायची आवड निर्माण होती..
.
लपवाछपवीत सुरू असलेल्या भलत्याच स्टोरीज गोलमाल प्रकरणं...
तर कधी बेधडक समोर येऊन अंगावर घेण्याचा अंदाज....
 .
बाकी जगाशी कोणत्याही विषयावर बोलणार...
पण गेले काही दिवस ज्या व्यक्तीशी ज्या विषयावर बोलयचं म्हणतोय तर गप्प बसणार....
 .
महाराष्ट्र म्हणु नका जगातल्या कानाकोपर्‍यापर्यंत कुठेही फिरायला गेले तरी घाबरायचं कारण नाही.
सगळीकडे भावेच पाव्हणे आहेत...
अगदी चालती ट्रेन असो की वेटींग लाईन...
.
.
भाऊला व्हाटसअपचं तुफान वेड...
सगळ्या मित्रांचे एकत्रीत केले तरी कमीच पडतील एवढी ग्रुपची संख्या.
.
.
भाऊ अंगाशी येणारेच मॅटर करणार...
अन अंगाशी आलं की बिनधास्त मित्राच्या नावावर खपवणार...
.
असा आमचा मित्र, भाऊ, सखा रोहित ननावरे उर्फ गोट्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन वर्षात पदार्पण करीत आहे. या आमच्या दोस्ताला
दोस्तीची कसम देत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
.
भावाला गेले काही दिवस बोल म्हणतोय ते त्याने बोलावं. अन आयुष्याची नवी इनिंग नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू करावी हीच सदिच्छा व्यक्त करतो.





गणेश दादा शितोळे
(२२ फेब्रुवारी २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा