माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६


व्हॅलेन्टाइन डे


प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे आपुलकी
प्रेम म्हणजे ओढ
अन प्रेम म्हणजे सर्वस्व...


                प्रेम म्हणजे काय हे प्रत्येक जण आपापल्या परीने सांगेलच. पण महत्वाचे हे की प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे. आपण प्रत्येक वेळी फक्त म्हणत असतो, "आम्ही एकमेकांना समजून घेतो." पण वास्तविक खरंच आपण समजून घेतो का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा.
'खरंच आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं समजतं अन आपण ते समजून घेतो का..?'
                 अनेकदा दोघांना आपण प्रेमात पडल्याचं जाणवत नाही. पण भोवताली असणार्‍यांना ते जाणवत रहात. हे न कळण्यासाठी हेच कारण आहे. प्रेमात पडलो आहे अन ते व्यक्त करायलाच हवं असं काही नसतं. प्रेम व्यक्त करण्यापेक्षा ते समजून घेणे महत्वाचे असते. आजची प्रेमाची परिभाषा तशीच टिपिकल गुलाब देऊन प्रपोज करण्यापासून बदलली असेलही. कधी प्रेम डोळ्यातून व्यक्त होते तर कधी आपल्या वागण्यातून. आपण ते समजून घ्यायला हवे. अनेकदा ते समजतंही पण आपलं मन मान्य करत नाही. काही काळ गेला की मनालाही त्याची सवय होते. अन तेही एका क्षणी मान्य करते. अनेक जण म्हणतात प्रेमात ह्रदयाला जिंकावं लागतं. कदाचित ते काही अंशी खरंही असेल. पण 'प्रेमात नेहमी मनाला जिंकावं लागतं.'
                   
आजच्या दिवशी अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करतील. त्याचं उत्तर देताना एकदा मनाला विचारून पाहिलं की सर्व कोडं संपेल. समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊन मनाला थोडा वेळ द्या. उत्तर आपोआप मिळेल. कारण प्रेमातच इतकी ताकद आहे की प्रेमच प्रेमात मनाला जिंकतं...


प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांचा आदर करणं..
प्रेम म्हणजे एकमेकांच्या भावनांना समजून घेणं..
प्रेम म्हणजे एकमेकांच्या ह्रदयात जागा करणं..
अन प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनाला जिंकणं...



व्हॅलेन्टाइन डे च्या सर्व मित्र मैत्रीणींना शुभेच्छा.



गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा