मुंबई पुणे मुंबई
कधीकधी एखादा चित्रपट आपल्या आयुष्यावर इतका परिणाम करतो की जणू आपण एका वेगळ्या विश्वात रममाण होऊन विचार करू लागतो. असे फार मोजके चित्रपट नसतील तरी ते परिणामकारक ठरलेत हे नक्की. असाच एक म्हणजे मुंबई पुणे मुंबई. आजवर कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा होतेच. आजही तसाच झी टाॅकीजवर चित्रपट पाहिला अन एक वेगळा अनुभव मिळाला. मुंबई पुणे मुंबई च्या पहिल्या भागाइतकाच दुसरा भागही वेगळा ठसा उमटवणारा आणि संदेश देणारा आहे.
चित्रपट आवडण्यामागचं पहिलं कारण अप्रतिम संगीत आणि गाणी. कधी तू असो की का कळेना असो की साथ दे तु मला असो. प्रत्येक गीत तितकेच सुमधूर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि चित्रपटात एक साम्य आहे अन ते म्हणजे चित्रपटातील गौतम म्हणजे स्वप्निल जोशी हाही माझ्या सारखाच कविता लिहिणारा आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटात पहिल्या आणि दुसर्या भागातील अनेक संवाद म्हणजे मला माझेच वाटतात. चित्रपट विनोदाइतकाच विचार करायला लावणारा ही वाटला.
आयुष्याच्या ऐन तारुण्याच्या वळणावर नवी नाती जोडताना येणारे चढउतार आणि त्यातून एकमेकांवर विश्वास ठेवत नाती कशी घट्ट करावीत याचं उदाहरण म्हणजे मुंबई पुणे मुंबई. आज व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी हा चित्रपट पाहिल्याने अधिकच भावला. सतीश राजवाडे यांनी साकारलेली ही कलाकृती मनात घर करून मात्र नक्की गेली.
गणेश दादा शितोळे
(१४ फेब्रुवारी २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा