रोहितच्या आत्महत्येच्या निमित्ताने....
नरेंद्र मोदी म्हणाले "आम्हाला लोकांचे दु:ख कळतेय....
खरंच जर यांना लोकांची दु:ख कळली असती तर आज ही वेळ आली नसती. राजकीय व्यक्ती फक्त उसणं रडणं दाखवत आश्वासन देत खोटा आधार देतात अन त्याला मोदीही अपवाद नाहीत. गेल्या वर्षभरात कित्येक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. काय कळलं यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यामागचं दुःख..?
दोन चार लाखाची मदत...
बाकी काय करतात हे..?
ढिम्म नुसते...
अनेक विचारवंत मारले गेले. काय वाटलं, कळलं यांना दु:ख.?
काहीही नाही.
काय प्रयत्न केले शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी...?
काय केलं विचारवंताच्या हत्या रोखण्यासाठी...?
काहीही नाही...
कोणतंही ठोस पाऊल उचलले नाही...
सरकारी कर्मचारी, मंत्री संत्री सहावा वेतन आयोगाचा लाभ घेऊन मोकळे झाले सातवा वेतन आयोग घ्यायला....
पण शेतकऱ्यांना फायदेशीर स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मानसिकताही नाही यांची अन काय कळणार यांना लोकांचं दुःख...?
बळी (शेतकरी) कालही राजा आणि आजही राजा- नाना पाटेकर असं म्हणतात. . . . .
पण नाना ह्यात साम्य एकच, त्याला कालही पाताळात घातले होते आणि आजही त्याला पाताळात घालून त्याचा बळी देण्याचे काम सुरूच आहे...
अन फरक इतकाच की तेव्हा वामन होता अन आता सरकार ती भूमिका वठवत आहे
गणेशदादा शितोळे
(०२ फेब्रुवारी २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा