माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८


प्रेमाची परिभाषा



भपकेबाज दिखावा मेकअप सारखा असतो...
थोडं काही झालं की गळून पडतो...
शेवटी निखरतं ते असतं सौंदर्य....
प्रेमाचं हे सौंदर्य त्या साधेपणातंच असतं...

कोणत्या ब्रॅण्ड ची कपडे घालता अन
कुठल्या हॉटेल मधे जेवता हे
कधीच प्रेमाची किंमत ठरवू शकत नाहीत....

प्रेम असतं हळूवार स्पर्शात...
प्रेम असतं नजरेच्या कटाक्षात...
प्रेम असतं पापण्यांच्या मिटण्यात..
प्रेम असतं उमलत्या गुलाबात...

प्रेम असतं किंचितशा स्मितहास्यात...
प्रेम असतं एकमेकांवरच्या विश्वासात...
प्रेम असतं एकमेकांना समजून घेण्यात...

तसं पाहिलं तर काहीही किंमत नसते या कशालाही..
तरीही ते अमुल्य ठरतं...
हीच असते प्रेमाच्या साधेपणाची व्याख्या
अन सौंदर्याची परिभाषा....




गणेश सुवर्णा तुकाराम
०१ ऑक्टोबर २०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा