माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

निरोपाचे प्रेमपत्र

तू गेल्यानंतरचा तसा इथला पहिलाच दिवस
पण आज खूप एकटं जाणवलं...
ती खुर्ची आजही तशीच रिकामी राहील असंच वाटलं होतं.
तू नसताना त्यात कुणालाच पाहिल नव्हतं...

पण सकाळी आश्चर्याचा धक्काच बसला...
अन ती खुर्ची पावन झाली होती.
एका आनंदयात्रीची जागा दुसऱ्यानं घेतली
भरभरून आनंद झाला.

इतक्या दिवस बाजूला पडलेला बापमाणूस
आज आपल्यातला होऊन गेला होता.
तसा तो कायम आपल्यातलाच होता.
एक जागा काय अन खुर्ची काय बदलू शकत नव्हती...

आपण आलोही असेच होतो ना
एकमेकाना पाठमोरेच...
कधी ओळख झाली अन कधी मैत्री
बदलत्या क्षणालाही कळंलच नाही...

दिवस तसेच गेले. जसे कॅलेंडरचे महिने बदलले,
पण भूर्रदिशी सहा महिने निघून गेल्यासारखं जाणवलं..
निरोपाच्या प्रेमपत्राचा तुला योग साधता आला..
आमची प्रेमपत्र लिहायला आटलेत बहुतेक शब्द...

तू म्हटलाय ना मग नक्की
येईल तोही काळ लवकरंच येईल...
मोसमात पाऊस पडला नाही तर 
परतीला न गरजताही कोसळतोच ना...

थोडी थंडगार वाऱ्याची झुळक यायचा अवकाश
तो अवचित येणार हे नक्की...
अन तो कोसळलेलाच एक थेंब
लिहीणार निरोपाचे प्रेमपत्र...

गणेश सुवर्णा तुकाराम
०४ ऑक्टोबर २०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा