माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८


आदर करणे अन स्विकारणे....
आदर करणे अन स्विकारणे यात तितकाच फरक असतो जितका कानाने ऐकून समजण्यात अन मिटलेल्या पापण्यातून उमजण्यात. भावनांचा आदर करणे, विचारांचा आदर राखणे हे बोलताना काहीच बंधन वाटत नाही. परंतू प्रत्यक्षात ते काटेरी बंधन मनाचा मोठेपणा भेदून आपल्याला विव्हळणं देऊ शकतं.
विचार अन कृती समांतर असू शकत नाही तर समरुप असावी वागते. दोन समांतर रेषा कधीच एकमेकांना भेटत नसतात. अन त्याच रेषांना लंब काढला तर तो छेद देत प्रवास थांबवतो. पण त्याच रेषा परस्परांना विरोधी दिशेने वाटचाल करणाऱ्या असल्या तर लंब फक्त मार्गदर्शक ठरतो...
स्विकारणे अन आदर राखणे हा अशा लंब असणार्‍या रेषा आहेत. म्हणूनच आदर राखणे अन ठेवणे या पेक्षा समर्पण हा समतोल साधतो. समर्पण म्हणजे आदर राखत स्विकारणे. माणूस आहे तसा स्विकारणे तसं कठीणं काम. पण समर्पण असेल तर अशक्य काहीच नाही. आयुष्य म्हणजे वर्तूळ अन समर्पण ही त्याची स्पर्शिका. जगण्याच्या परीघाला स्पर्शून जाणे म्हणजे समर्पण अन हा आयुष्याचा प्रवास फक्त याच करता असतो.

गणेश सुवर्णा तुकाराम
२२ ऑक्टोबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा