माझी मलाच पत्र लिहीताना...!!!
कवी ग्रेस यांनी एकदा म्हटलं होतं की, कवी हा निश्चितपणे समाजाशी बांधलेला असतो. पण तो समाजधार्जिणा नसतो तो
समाजशील असतो. त्यामुळे जरी कुणाला पटलं नाही तरी मी ठाम रहाणार माझ्याच
विचारांवर. मी बोलत रहाणार माझ्या विचारांनीच अगदी जगाच्या अंतापर्यंत. कवीचं
लिहिणं म्हणजे एक स्वयंभू झरा असतो त्याचा प्रवाह एका विशिष्ट विचारांच्या
प्रभावाखाली चालू असतो. त्याने फक्त वहात जावं कारण आपला मार्ग निश्चित करणे त्या
झऱ्याच्याही हाती नसतं. मग कवीचं लिहिणं त्याला कसं ठरवता येईल .? वागणं तर मोठ्ठं प्रश्नचिन्हंच.
जे मी आज बोलतोय त्याला किंमत कदाचित नसेलही, पण उद्या ते तसंच घडणारं हे निश्चितंच. उद्याचं सत्य डोळ्यांना दिसून न
दिसल्यासारखे करताही येईल. पण पण सत्य बदलणार नाहीच मुळी. कशात
तरी मी नसणं , म्हणजेच कशाचं तरी मी भाग नसणंच असतं कायमचं.
मी नाकारतो धर्माला. मी कचऱ्यात फेकतो जातीला. मी जाळून
टाकतो प्रथा, रूढी, परंपरांच्या
जळमटांना. देव, ईश्वर थोतांडाला फेकून देतो माझ्या
वेशीबाहेर. कारण या कशाचाही मी कधीचं भाग होऊ शकत नाही. जाती, धर्म, देव अन त्यावर आधीरीत सण उत्सव माझ्याकरता
कालही नव्हते, आताही नाहीत अन पुढेही नसणार. जाती, धर्म, देव अन त्यावर आधीरीत सण उत्सव ही जळमटंच. याबाबती
कुणी नालायक म्हणत असेल तर मी कालपण नालायक होता, आजही आहे
अन उद्याही तसाच नालायक असेल.
आपल्या लोकांकडून किंवा लोकांच्या आपल्याकडून असलेल्या
अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी एकवेळ चालतं. पण आपल्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग
मात्र सगळ्यात जास्त त्रास होतो !!
मी कालही बरोबर होतो, आजही
आहे अन उद्याही रहील. माणसाने स्वतःच्या नजरेत कायम बरोबर असावं. बाकी कुणाला काय वाटतंय देणं ना घेणं. कुणाच्याही
आनंदाकरता चुकीच्या गोष्टी स्विकारणे अन पाठीशी घालणे योग्य नाहीच. चुक हे चुकंच
असते, आपल्या माणसाकरताही ते बदलत नाहीच. माझ्या आयुष्याच्या
वर्तुळात उरणार नसेल भले कुणीच. मी कायम टिकून असेल तेव्हाही एकटाच. मावळतीच्या
सूर्याला न्याहाळत नवी पहाट होण्याच्या आशेच्या किरणाकडे.
अस्त होईल माझा.
अंतही होईल माझा.
पण तोपर्यंत मी बोलत रहाणार
माझ्याच विचारांनी.
गणेश सुवर्णा तुकाराम
२५ ऑक्टोबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा