माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८


अजून एक झालेला थांबा...!!!

खूप दिवसांनी असा भरभरून आनंद देणारा अन खळखळून हास्य फुलवणारा Weekend गेलाय. कॉलेज संपून आता वर्ष उलटली तरी नाती तशीच निरागस अन आहेत. त्या सर्व मित्रांना पुन्हा भेटून त्या तशाच गप्पा मारता येतील का असा प्रश्न घेऊन काल घराबाहेर पडलो होतो.
A friend is someone who gives you total freedom to be yourself.
There is nothing better than a BEST Friends

दरवेळी येतो म्हणून भेट झाली नाही म्हणून अचानक ठरवलं, चाललोय तर जाता जाता भेटू म्हणून मध्यरात्री मेसेज केल्यानंतर प्रतिसाद येईल का हा प्रश्न होताच मनात. पण दहा मिनिटे गेली नसतील की भाऊ हजर. राहूल ने मी केलेल्या मेसेजला उत्तर दिलं अन शिरूरवरून घरी जाताना अजून एक थांबा झाला कायमचाच.

राहुल अबोलीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच भेटलो आम्ही. अन तेही घरी. पुणेकर झालाच तो शेवटी. आष्टी (बीड) वरून अहमदनगर अन पुणे असा तीन जिल्हांचा झाला. सकाळी घरी पोहचून पाणी पीत नाही की, अबोलीचा पहिलाच बाऊंसर.

“लग्न कधी करतोएस. ?

तसा हा प्रश्न मला आता नवखा उरलाच नव्हता. आणि त्यातही अंपायराच्या भूमिकेची सवय असल्याने चाचपडत वेळ मारून नेली. अबोलीची लवकरंच इच्छा पुर्ण व्हायची दिसतेय. कारण संपुर्ण दिवसभर भेटेल तिथे हाच विषय होता. बहुतेक तिच्या घरी खाल्लेल्या पोह्यानंतर आता फक्त लग्नाचेच पोहे खातोय बहूतेक. मला पुढे जायचं होतं म्हणून जेवायला थांबलो नाही. आता चहाने गोड झाला तरी पुढच्यावेळी नक्की जेवायला येईल. काका, काकूंची भेट पण व्हायचीच होती बहुतेक. तिही त्या दोघांच्या लग्नानंतरच. राहुलसोबत कामामुळे नाही जमलं फार बोलायला. पण तो भेटलास हेच खुप झालं. मनापासून धन्यवाद. राहुल आणि अबोली. आणि एका गोष्टीकरता राहुल आभारी आहे. मी येतोय म्हणून एक दिवस जरा लवकर उठलास.
😊😊😊

संतोष भाऊ कायम खळखळून हसवतोस तू. भेटला तेव्हा तब्बेत बरी नव्हती. काळजी घे जरा. अजून बरंच हसायचंय भाऊ. आणि तू कितीही म्हणाला तरी कवितेची वही संपली असेल पण थांबली नक्कीच नसेल. कदाचित आता पहिल्यासारखे निमित्त राहीले नसेल बस्स एवढंच. गौरी अजून आपली फारशी ओळख नसल्याने बोलणं झालं नाहीच. त्यात संतोषची तब्बेत बरी नसल्याने फार नाही जमलं बोलायला. पण तरी एकदोन पंच झालेच. तसा मी चहा कॉफी फारशी पीत नाहीच. पण कॉफी नाही टाळता आली. गौरी आणि संतोष मनापासून धन्यवाद.

अबोली, गौरी तुमचे नवरे काही वाढणार नाहीत अन मी कमी पण होणार नाही. यात बदल अशक्यच दिसतोय. संतोष, गौरी, अबोली, राहुल पुन्हा एखाद्या निवांत संध्याकाळी भेटू. जमवू परत तीच आपली मैफील.

घाई होती म्हणून लवकर निरोप घेतला. निरोप तसा खुप महत्त्वाचा शब्द दोघांसाठी देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यासाठी सुद्धा. कारण देणारा देतच असतो आणि घेणारा घेतच असतो. कारण निरोप त्यांना द्यायचा असतो जे जाणार असतात. खरतरं निरोप हा निरोप नसतोच मुळी. पण आपली माणसं कुठे आपल्या पासून दुर जात नाहीत किंवा आपण त्यांच्या पासून दुर जात नसतो. कसं असतं ना जीवनाचा हा प्रवास अखंड प्रवास कायम सुरूच असतो.

नुकताच आपल्या गप्पातील नाना सोबत आज फोन झाला. खूप खूप बरं वाटलं. अंगावर जबाबदारी पडली की माणूस आयुष्य घडवत जातो. कुठं नेवाश्यावरुन आलेला तो अन कुठं आज फोनवर बोललेला मुंबईकर झालेला तो. परिस्थिती माणसाला घडवते, शिकवते अन पुढे घेऊन जाते. पिल्लू असतं पिल्लू, लहान असतं तोपर्यंत काहीही करतं. वाट्टेल ते अन तसं वागतं. तेच पिल्लू कालांतराने मोठ्ठ होतं, त्याला पडलेल्या जबाबदार कळायला लागतात. आता पिल्लू कधीच मोठं झालंय, पंख पसरून आकाशी आपली झेप घेतंय. एक फोन होतो अन दहा वर्षांचा काळ चटदीशी डोळ्यासमोर तराळून जातो. मनापासून धन्यवाद. नाना


खरंच कसे होतो ना आपण.
अन आज.?
इतका बदल.?

बिघडलो आहोत का आपण अशी शंका वाटणारे आपण आज आपापल्या आयुष्यात आनंदी आहोत हेच खुप आहे. अजून काय हवं आयुष्याकडून. आजचे अन आठ दहा वर्षापुर्वी असणारे आम्ही सगळे आठवलं की हा इतका बदल जाणवतो. तेच जुने आपले मित्र भेटले की भरून पावतं. कारण मित्र कधीही अन कसेही भेटले तरी आनंदच देत असतात.
ते जूने दिवस आठवले की खळखळून हसत मन भरून येतं.

लवकरंच पुन्हा एकदा सर्वजण भेटू.
पुन्हा त्याच कॉलेजच्या गप्पा.
असंख्य आठवणींची उधळण.

आजारी असतानाही संतोषसह एक सेल्फी...

मी येणार आहे म्हणून लवकर उठला तरी किती फ्रेश आहे राहुल.....



गणेश सुवर्णा तुकाराम
२० ऑक्टोबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा