माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६


दोन क्षणांचा प्रवास



तिच्याकडे बघत बघत, 
रोजच मॉर्निंग वॉक सुरू होतो...
कधी स्मितहास्य करत तर,
कधी नकळत कटाक्ष टाकत चालत असतो...

चालता यावे तिच्या सोबत म्हणूनच जणू,
प्रत्येक पाऊल पुढे झपझप टाकला जातो...
आता या राऊंडला तरी गाठून तिला,
सोबत दोघांनी चालेव म्हणत मॉर्निंग वॉक सुरू असतो...
.
झपझप चालत पावलांनी वेग घेतला की,
ती जशी जशी जवळ जवळ येत जाते...
तसतसा वळणावळणाचा प्रवास करत,
प्रत्येक राऊंड संपत येत असतो...
.
कसातरी आटापिटा करत करत,
एका वळणावर तिला गाठतो...
अन दोन क्षणांचा का होईना,
आमच्या दोघांचा प्रवास सुरू होतो....



गणेशदादा शितोळे
(१३ डिसेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा