माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १८ डिसेंबर, २०१६


सैराटच्या निमित्ताने....



कोल्हापुरात घडलेलं ऑनरकिलींग (१७ डिसेंबर २०१५)


                            मुळात सैराट चित्रपट देखील याच कारणासाठी निर्माण झाला आहे. तो समजून घ्यायला हवा. उगाच टिका करायची म्हणून ती करू नये. मुळात सैराट चित्रपट आईवडिलांइतकाच मुलामुलींना करता आहे. सर्वात पहिली गोष्ट की आपण समोरच्या व्यक्तीला जाती, धर्म, पंथ, प्रांत या नजरेने पहण्यापेक्षा माणूस म्हणून पहायला हवे. आपल्या मनातील जाती धर्माच्या जळमटांना काढून टाकण्याकरता सैराट चित्रपट पहावा. अगोदर आपल्या बुडाखालचा हा अंधार दूर केला की माणुसकीच्या वाटेवरचा प्रकाश दिसतो. 
                          दुसरी गोष्ट प्रेम. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे आणि प्रत्येक नात्याची सुरवात प्रेमाने होते आणि ते कायम रहाते. सैराट चित्रपटात हेच दाखवण्यात आले आहे. 
                          तिसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना समजून घ्यायला हवं. मान्य आहे की आर्थिक परिस्थिती बघून मुलीकरता सुयोग्य वर शोधून लग्न केले जावे. परंतु पैसा हीच एकमेव बाब आहे का समाधानाची. पैशाहून अधिक आनंद महत्वाचा. आपल्या मुलीला ज्या मुलासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपण देऊ शकत नाही का याचा विचार केला पाहिजे. पैशापेक्षा आपली मुलगी त्या मुलासोबत आनंदी असायला हवी. कारण एकवेळ आनंदी असल्यावर पैसा कमावता येतो परंतू पैसा कमवून आनंद विकत घेता येत नाही. आपल्या एका चूकीच्या म्हणण्यापेक्षा लादलेल्या निर्णयाने तीन व्यक्तींचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते हेही ध्यानात घेतले पाहिजे. 
                        आपल्या या निर्णयाला आव्हान म्हणून आपल्या मुलामुलींना पळून जाऊन लग्न करण्याची वेळ येते. पुढे त्याने येणारी वेगळी परिस्थिती आणि सुरक्षितता याचा प्रश्न आहे. आणि मुळात कोणत्या इज्जतीचं आणि सन्मानाचं बिरूद मिरवणाची आवश्यकता पडते. आपल्या मुलामुलींच्या मनावर जातीयवादी विचारांचा बलात्कार (बळजबरी ) करून कोणत्या इज्जतीचं अपेक्षा आहे. आपल्या फालतू जातीधर्माच्या आभिमानाची इज्जतीची बिरूदं आपल्या मुलामुलींचे आयुष्य उध्वस्त करणारी असतील तर काय कामाची. फॅन्ड्री आणि आता सैराट चित्रपटातून याच जातीयवादाला ठेवण्याकरता दगड भिरकावला आहे. आणि तो वर्मी लागल्यानेच जातीयवादी पोस्ट फाॅरवर्ड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
                         सैराटमधून मुलामुलींनाही चांगला संदेश दिला आहे. अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय कायम दुःख देतो. जितक्या सहजतेने पळून जाण्याची मानसिकता तयार होते तितक्याच सहजतेने पुढं आयुष्याचा विचार करणे अवघड होते. तेव्हा योग्य निर्णय घेतला पाहिजे. किंवा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि सैराटच्या उत्तरार्धात हाच निर्णय सिद्ध करण्यासाठी केलेला प्रयत्न दाखवला आहे. आणि शेवटी एक कॉमन फॅक्ट आहे की मुलीचं नवर्‍याइतकंच आईवडिलांवरही प्रेम असते.सैराटमधेही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच वडिलांचा विरोध जुगारूनही हैद्राबादला येऊन लग्न होऊन स्थायीक झाले तरी मनात वडिलांबद्दल असणारे प्रेम आहे म्हणून तर त्या चिमुकल्याचं नाव आर्चीने आपल्या वडिलांचे ठेवण्यात आले आहे. 
                         आयुष्यात सुरवातीचा काळ आईवडिलांसोबत घाललला तरी पुढच्या आयुष्य कोणासोबत जगायचे हा निर्णय सर्वस्वी त्या मुलीचा आहे. आणि नात्याची सुरवात प्रेमाने होते आणि ते कायम रहाते. पण केवळ जातीने बुरसटलेली माथी याला विरोध करतात आणि हाच फालतू जातीचा स्वाभिमान जपण्यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून टाकतात हे समाजातील जळजळीत वास्तव सैराटच्या निमित्ताने समोर आले आहे.


गणेशदादा शितोळे
(१७ डिसेंबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा