आठवणींच्या हिंदोळ्यावर...!!!
सुरेल शब्दांनी आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मी माझेच गीत गावे...
क्षणांच्या त्या सुरासोबती,
मनानेही हरवून जावे...
भेटती कुणी देत हर्षाचे जगणे घडीचे,
आठवणीने साद घालत भेटावे...
दाटून येते मग कोणाला उचकी,
उसण्या हसण्यात मी दंग होऊन जावे...
कुठे कोपर्यात भेटती मज माझे,
वाटे मग त्याच्या न सुटणार्या मिठीत जावे...
अन कधी त्याची हळवी जखम सलल्यावर,
नकळत आसवांनी ओघळती गालावरून जावे...
अलगद निघून गेली की मग खपली,
काळासोबत पुन्हा तिने का बसावे....
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मी माझे एकटेच गीत गावे...
मी माझेच गीत गावे...
क्षणांच्या त्या सुरासोबती,
मनानेही हरवून जावे...
भेटती कुणी देत हर्षाचे जगणे घडीचे,
आठवणीने साद घालत भेटावे...
दाटून येते मग कोणाला उचकी,
उसण्या हसण्यात मी दंग होऊन जावे...
कुठे कोपर्यात भेटती मज माझे,
वाटे मग त्याच्या न सुटणार्या मिठीत जावे...
अन कधी त्याची हळवी जखम सलल्यावर,
नकळत आसवांनी ओघळती गालावरून जावे...
अलगद निघून गेली की मग खपली,
काळासोबत पुन्हा तिने का बसावे....
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मी माझे एकटेच गीत गावे...
गणेश दादा शितोळे
(२ डिसेंबर २०१६)
(२ डिसेंबर २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा