माझ्या मनातलं...!!!
कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!
शब्दा वाढदिवसाच्या शुभेच्छा...
असतो जेव्हा जेव्हा मी एकटा,
शब्दा तुच साथ दिली मज होती जी हवी...
आधारच्या उसण्या अवसाणाची,
परतफेड ती मी काय करावी...
सोबत केली तू आजवर प्रत्येक वेळी,
आयुष्यात पुढेही तू मज अशीच साथ द्यावी...
जगतो आहे आज नव्याने,
देण तुझी मजला अशीच लाभावी...
या वाढ दिनी लिहितो तुझी गोष्ट,
शुभेच्छा म्हणून हीच भेट समजावी...
आजवर तूच भरभरून दिलं मला,
शब्दा तुजला भेट मी ती काय द्यावी...
गणेशदादा शितोळे
(२१ डिसेंबर २०१६)
Share
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा