माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

शब्दासंगे चालतो वाट...!!!

 

शब्दासंगे चालतो वाट,
शोधतो अर्थ पावलांचे...
सापडताहेत मागही जुनेच,
आप्तस्वकीयांचे...

कुणी भासते आपले,
कुणी परके असुनही ओळखीचे...
गळून जाते पानही पिकण्याआधीच,
वाटसरू असते जणे ते वळणावरचे...

क्षणभर पडते कोडे,
दोन क्षणांच्या होकाराचे...
मिळून येते उत्तर,
आयुष्यभराच्या नकाराचे...

टचकन होते पापणी ओली,
मोल काय त्या आसवांचे...
निशब्द होतो प्रवास पुढचा,
जाणून सार दोन थेंबाचे...

शब्दासंगे चालतो वाट,
शोधतो अर्थ पावलांचे...
गात असतो जीवनगाणे,
आयुष्याच्या प्रवासाचे...








गणेश दादा शितोळे
(२२ डिसेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा