माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६


 तेव्हा मात्र फार अवघड असतं...






आयष्यात एकटं चालत रहाणं अवघड नसतं....
पण आयष्यात कधी कोण काही काळ सोबत असतं...
अन अचानक हातातला हात सोडून दूर जातं...
तेव्हा मात्र एकटंच परत मागं येण फार अवघड असतं...


आयष्यात रिलेशनशीपमधे रहाणं अवघड नसतं....
पण आयष्यात आपलं मन कधी कोणात गुंतलं जातं...
पण कोणी ते अचानक बंध सोडून दूर निघून जातं...
तेव्हा मात्र गर्दीतही मन एकटं भटकत असतं...


आयष्यात कोणाच्या प्रेमात पडणं अवघड नसतं....
पण आयष्यात कधी कोणाच्या प्रेमात पडलं...
अन अचानक त्यानं ह्रदयावर खोल जखम केली...
तेव्हा मात्र प्रेमभंगात सावरणं फार अवघड असतं...




गणेशदादा शितोळे 
(०२ डिसेंबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा