आयुष्याच कधी होऊन गेलंय एस ए पी एम एम...
एस ए पी ला अॅडमीशन घेऊन,
वाटलं बसवू आयुष्यात काहीतरी जम...
पण एक नक्की रोज एस ए पी शिकता शिकता समजणारही नाही,
आयुष्याच कधी होऊन जाईल एस ए पी एम एम...
एस ए पीच्या मोड्युलची लिस्ट पाहिली तेव्हा पडला होता प्रश्न,
एस ए पी चा अवघड आहे सगळ्या मोड्युल इंटिग्रेशनचा गेम...
अन आता मोड्युल - टी कोडच्या वाढत्या गर्दीत समजलंच नाही,
आयुष्याचं कधी होऊन गेलंय एस ए पी एम एम...
कधी घेतलंय मनावर आज काही नवीन शिकायच तर,
कधी कोणती एरर येईल कशाचा नाही नेम....
अन रोजच प्राॅब्लेम सोडवत सोडवत समजलंच नाही,
आयुष्याचं कधी होऊन गेलंय एम एम....
कितीही वेळा त्याच त्याच स्क्रीन पाहिल्या तरी,
प्रत्येक वेळी तयार करताना पिओ वाटती सेम सेम...
अन रोज रोज त्याच सायकल पूर्ण करत समजलंच नाही,
आयुष्याचं कधी होऊन गेलंय एस ए पी एम एम...
खुप प्रयत्नानंतर झालीच एखादी अडकलेली सायकल पूर्ण,
तर उशीर झालेल्याचाही कधी वाटत नाही मग गम...
कारण एस ए पी ला अॅडमीशन घेऊन समजलंच नाही,
आयुष्याचं कधी होऊन गेलंय एस ए पी एम एम....
गणेशदादा शितोळे
(४ एप्रिल २०१६)
Ek no dada 😎👍🏻
उत्तर द्याहटवा