माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १० एप्रिल, २०१६

मराठमोळी कुस्ती मैदानाबाहेरच चितपट





भारतीय कुस्ती मधील उगवता तारा आणि महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत घडलेला पठ्ठ्या पैलवान राहुल आवारे ला ऑलिंपिक स्पर्धेकरता डावलले गेले आहे. भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून देणारा हा पैलवान पुन्हा एकदा क्रिडा क्षेत्रातील राजकारणाचा बळी ठरला. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या अगोदर घेण्यात आलेल्या चाचणीत महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने पंजाबच्या संदीप तोमरला अस्मान दाखवून ऑलिंपिक पात्रता फेरीकरता आपली दावेदारी नक्की केली होती. परंतु प्रत्यक्ष ऑलिंपिक पात्रता स्पर्धेकरता राहुल आवारेला डावलून पराभूत संदीप तोमरला भारतीय संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर याची कुणकुण राहुल आवारे याला अगोदर पासून लागली होतीच. आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्ली दरबारी अनेक भेटी घेतल्या. भाजप अध्यक्षांसोबतही भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून राहुल आवारेवरील अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय क्रीडा मंत्री सोनेवाल यांनीही राहुलला आश्वासित केले. परंतु दिल्ली मधे महाराष्ट्राचे काय वजन आहे याची प्रचिती आली आहे. एवढे सगळे प्रयत्न करूनही राहुल आवारेला संधी नाकरून भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेकरता पराभूत संदीप तोमरलाच पाठपाठवले आहे.
.
ऑलिंपिक स्पर्धा म्हणजे तशी क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडू झटत असतो. चार चार वर्षे मेहनत करून जर ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतच असा अन्याय झाला तर महाराष्ट्रात नक्की खेळाडू कसे घडतील. खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून रांगड्या मराठी मातीची चुणूक जगाला दाखवून दिली. त्यांचाच वारसा समर्थपणे चालवण्याचा प्रयत्न करणार्‍या राहुल सारख्या खेळाडूंवर जर अन्याय होत असेल तर ऑलिंपिक च्या पदक तालिकेतील स्थान कायमचं गायब मात्र नक्की होईल.  आज प्रश्न पडतो की प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता महाराष्ट्राचा कैवारी असल्याचा आवेश आणतो. परंतू अशा वेळी तोच महाराष्ट्राचा कैवारी नेमका कुठे कोपर्‍यात अडगळील् पडला समजत नाही. ना कोणता ध्वजाचा रंग कामाला आला. ना कोणी साहेब, ना कोणी डरकाळ्या फोडणारा मराठी वाघ. सगळे शेपटं घालून उघड्या डोळ्यांनी हा अन्याय बघत आहेत. आज जाणीव होती  आहे की नेमका यांना शिवछत्रपतीचा आशिर्वाद कशासाठी हवा होता. महाराजांचा आशिर्वाद अशा लोकांच्या कितीही बोंबल्याने सोबत रहणार नाही.
.
महाराजांच्या आशिर्वादाचा हात...
फक्त सत्यवादी लोगों के साथ...
.
आतातरी शेपटं घातलेल्या वाघांनी आणि जनतेत मिरवणाऱ्या साहेबांनी जागे व्हा. आणि राहुल आवारे ला न्याय द्या.


गणेशदादा शितोळे
(१० एप्रिल २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा