सेशन
रोज सकाळी आम्ही जमतो,
पुन्हा एकदा नवीन सेशनला...
रोज सकाळी आम्ही जमतो,
पुन्हा एकदा नवीन सेशनला...
उत्सुकता असते प्रत्येकालाच,
मिळेल काही नवीन शिकायला...
चेअर्स आणि कंप्युटरची अरेंजमेंट करत,
होते सुरवात नवीन सेशनला...
चेअर्स आणि कंप्युटरची अरेंजमेंट करत,
होते सुरवात नवीन सेशनला...
कधी मराठी, कधी इंग्रजीचा प्रवास करत,
शेवटी गाडी येते हिंदीच्या ट्राकला...
आलंच सेशन मध्यावर की मग,
सामोरं जावं लागतं सिस्टिमच्या नव्या प्राॅब्लेमला...
आलंच सेशन मध्यावर की मग,
सामोरं जावं लागतं सिस्टिमच्या नव्या प्राॅब्लेमला...
गाडी अर्ध्यात अडकली की नसते मग पुढे जायला वाट,
अन शेवटी सिस्टीम प्रॉब्लेम पुढे लागतं सगळ्यांना थांबायला...
दमदार सुरुवातीनंतरही सेशनचा येतो कधी कंटाळा,
मग नकळत वाटते पाहिजे सेशन संपायला...
दमदार सुरुवातीनंतरही सेशनचा येतो कधी कंटाळा,
मग नकळत वाटते पाहिजे सेशन संपायला...
कधी एसी कधी फॅनच्या हवेत झोप येते,
तर कुणी मागच्या मागे सुरवात डुलक्या द्यायला...
शेवटी सोल्युशन काढायचे प्रयत्न करूनही,
प्राॅब्लेम काही तयार नसतो सुटायला...
शेवटी सोल्युशन काढायचे प्रयत्न करूनही,
प्राॅब्लेम काही तयार नसतो सुटायला...
अन मग होतो सेशनचाही नेहमीसारखाच शेवट,
सोडत अर्ध्यावरतीच नवीन सिनॅरियोला...
गणेशदादा शितोळे
(५ एप्रिल २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा